Author: Sharad Bhalerao

प्रथम, द्वितीय, तृतीय विजयी संघांना दिल्या सन्मान ट्रॉफी साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, क्रीडा भारती जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त राष्ट्रीय दिन क्रीडा सप्ताहातील १९ वर्षाच्याआतील मुले व मुली आणि १९ वर्षावरील पुरुष व महिला ‘थ्री ऑन थ्री’ बास्केटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केट बॉल मैदानावर नुकत्याच घेण्यात आल्या. १९ वर्षांवरील बास्केटबॉल स्पर्धेत पाचोरा बास्केटबॉल ग्रुप विजेता तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ उपविजेता, युनिटी बास्केटबॉल क्लब, पाचोरा तृतीय स्थानी विजयी झाले. प्रथम, द्वितीय, तृतीय विजयी संघांना…

Read More

योगासह फिटनेस संदर्भात मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राचा गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कु.व्ही. केजो, माजी आमदार मधु जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून केंद्राचा प्रारंभ केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तलवेलकर, फारूक शेख, असोसिएशनचे सचिव विवेक आळवणी, राजेश जाधव, इकबाल मिर्झा आदी उपस्थित होते. असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, सहसचिव सुनील महाजन ह्यांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक आकाश कासार हे सकाळी ६ ते ८ व सायंकाळी…

Read More

नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे पोलिसांचे दुर्लक्ष साईमत/भडगाव/प्रतिनिधी : येथील आदर्श शेतकरी तथा माजी नगरसेवक बांधकाम सभापती नथू भिवा अहिरे हे भडगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन घरी येत होते. तेव्हा भडगाव शहरातील वाळू चोर तसेच वाळू माफियांकडून त्यांना त्यांच्या घराच्या रस्त्यावर असलेले शिवनेरी गेट येथे २५ ते ३० जणांनी अडविले. त्यांच्यावर धक्काबुक्की करत प्राणघातक हल्ला केला. तसेच मारून टाकण्याची धमकी देत त्यांच्यावर हल्ला केला आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाचे भडगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. काही दिवसांपूर्वी जुना पिंपळगाव रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाळू चोर वाळू माफियांवर…

Read More

महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील मतदार याद्यांमध्ये बोगस नावे, दुबार नावे मोठ्या प्रमाणात आहेत. ती नावे कमी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. शहरातील वाकी रोड स्थित माजी नगराध्यक्ष सुभाष (राजू) बोहरा यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, अनिल बोहरा, राजू खरे, जावेद मुल्लाजी, डॉ.मनोहर पाटील, प्रदीप गायके, जीवन सपकाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावे, दुबार नावे व मयत अशी नावे समाविष्ट आहे. ती नावे कमी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या…

Read More

चोपडा शहर सामाजिक, सांस्कृतिक समिती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटातर्फे रोख रकमेसह पुरस्कार प्रदान साईमत/चोपडा/प्रतिनिधी : चोपडा शहर सामाजिक, सांस्कृतिक समितीतर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षातर्फे कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालानिमित्त मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी येथील गांधी चौकात जोशपूर्ण वातावरणात दहीहंडीचे आयोजन केले होते. दहीहंडी विजेत्या पथकास राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोख रक्कम २१ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यात विशाल भाऊ युवा मंच, रामपुरा मंडळ, अरुण नगर मंडळ, दारा क्लब सुंदरगढी, क्रांतीवीर समशेर सिंग मंडळ, न्यू एकता मंडळ, महादेव गणेश मंडळ, शिवदाम मंडळ, शिवबा स्पोर्ट अकॅडमी मंडळ, माँ शेरावाली मंडळ, फुलेनगरचा राजा मंडळ अशा शहरातील ११ गोविंदा पथकांनी सहभाग…

Read More

पाचोऱ्यात शिवसेना-उबाठाने राबविली स्वाक्षरी मोहीम साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. सरकारने कठोर शिक्षेची तरतूद असणारा ‘शक्ती कायदा’ राज्यात लागू करावा, अशा मागणीसाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. बदलापूरच्या घटनेनंतर राज्याच्या विविध शहरात महिला अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सक्षम कायद्याअभावी गुन्हेगारांना कारावासात जाण्याचीही भीती राहिलेली नाही. त्याचा निषेध आणि ‘शक्ती कायदाची’ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यांची होती उपस्थिती यावेळी अरूण पाटील, ॲड.अभय पाटील, पप्पू राजपूत, गजू पाटील, संदीप जैन, पप्पू जाधव, तिलोत्तमा मौर्य, अनिता पाटील, जयश्री येवले, कुंदन पांड्या, लक्ष्मी पाटील, फरदिना…

Read More

जळगाव तालुक्यातील कडगावातील घटना, मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी घेतला पवित्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : म्हशी चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कडगाव येथे घडली आहे. संतोष यादव धनगर (वय ५५, रा.कडगाव, ता. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांनी ही घटना घडल्याचा संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर असे की, कडगाव येथील रहिवाशी संतोष धनगर हे…

Read More

चिमुरड्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ केले दाखल, ट्रक चालकाला घेतले ताब्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना खोटे नगर परिसरातील वाटिकाश्रमाजवळील द्वारकाई अपार्टमेंटकडून जळगाव शहरात बाजारासाठी जात असलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने एका महिलेसह १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला एक तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना मानराज पार्कजवळ बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, धडक देणारा ट्रक हा न थांबता घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी नशिराबाद गावाजवळ…

Read More

आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई साईमत/चंद्रपूर/प्रतिनिधी : चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गांत…

Read More

>> बीएचआर प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकरण भोवले साईमत/पुणे/प्रतिनिधी : पुणे पोलीस दलातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) जळगाव या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी २०२१ मध्ये तीन गुन्हे नोंदवले. त्यावेळी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके कार्यरत होत्या. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात रात्री अंत्यत गुप्तता पाळत हा गुन्हा नोंदवला गेला. यावरून मात्र पुणे पोलिसांसह राज्य…

Read More