>> ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे प्रमुख आंदोलनकर्त्यांना आश्वासन साईमत/मुंबई/प्रतिनिधी : अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अशा घटकांनी संयुक्तरित्या उभारलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी गावागाडा चालविणाऱ्या सर्व घटकांच्या प्रलंबित मागण्या आमच्या सरकारच्यावतीने लवकरच पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे जाहीर केले. तसेच सरपंचांसह ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्णतेसाठी कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनीही आंदोलकांना सामोरे जाऊन मागण्या समजून घेतल्या. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक-प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी, २८ रोजी मंत्रालयावर मोर्चा म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र जमून सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व घटकांनी…
Author: Sharad Bhalerao
सरपंच, ग्रा.पं.च्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला शरद पवार, मविआच्या नेत्यांनी दिली भेट साईमत/मुंबई/प्रतिनिधी : सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सर्व घटकांनी मिळून एक दिवसीय केलेल्या धरणे आंदोलनाला महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्तरित्या भेट दिली. महायुतीचे सरकार असंवेदनशील आहे. सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर तातडीने मार्गी लावण्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या विरोधात रोष अन् वातावरण निवळले राज्यभरातून आलेल्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामविकास मंत्र्यांच्या विरोधात घोषणा सुरु झाल्या.गोपनीय विभागाने त्याची माहिती मंत्रालयात पुरविल्याने मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी भेट दिली. ग्रामविकास…
पहुरमधील आर.टी.लेले हायस्कुलने मिळवून दिली मदत साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : येथील लेलेनगरमधील रहिवासी कै. रामेश्वर राजेंद्र सोनवणे हा विद्यार्थी पहुरमधील आर.टी.लेले. हायस्कुलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत होता. दुर्दैवाने त्याचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व्हावी, म्हणून शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.बी. पाटील, शाळेचे पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे, ज्येष्ठ लिपिक किशोर पाटील, कनिष्ठ लिपिक शरद पाटील यांनी प्रयत्न सुरू केले होते. याकामी संस्थेचे चेअरमन तथा ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, संस्थेचे व्हॉ.चेअरमन साहेबराव देशमुख, जळगाव दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख तसेच माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनीही पुढाकार व विशेष परिश्रम…
चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे निवेदन साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध म्हणून मूक आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात अमळनेरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, त्याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आंदोलन करीत आहे. याप्रकरणात दोषी असणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि वैदिप्यमान शोघांचा इतिहास सांगणारे…
महिला शेतकऱ्यांशी साधला संवाद साईमत/पारोळा/प्रतिनिधी : शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव युवा संसदरत्न खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील संवाद दौऱ्याप्रसंगी पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवरातील थेट शेतीच्या बांधावर पोहचले. त्यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे रक्षाबंधन आनंदात पार पडल्याची भावना महिलांनी व्यक्त केल्या. एरंडोल विधानसभा मतदारसंघांचे आ.चिमणराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमाने मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांचा व शासकीय योजनांचा आढावा दिला. यावेळी पक्ष संघटना मजबुतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या योजना तळागळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहचतील.…
पाचोरा परिसरातील पालकांतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याची समस्या समाजात भेडसावत आहे. त्यामुळे महिलांसह मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशा आशयाचे निवेदन पाचोरा परिसरातील पालकांतर्फे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी महिला, पालक वर्ग उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहे. अशा घटनांचा लहान मुलांच्या बालमनावर दीर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे मुले डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होतात. त्यांच्या पूर्ण आयुष्याचे नुकसान होते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आपल्याकडे विविध कायदे अस्तित्वात आहेत. पण त्यांची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने गुन्हेगार अशा प्रकारचे गुन्हे करायला धजावत आहेत. हे…
चोपडा, अडावद, धानोरा होतोय प्रेताचा प्रवास, शवाची होतेय अवहेलना साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी : सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या धानोरा गावात एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाखो रुपये खर्चुन बांधकाम झालेल्या केंद्रात शवविच्छेदन गृहाचे बांधकामच झालेले नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही शवाची (मयत शरीराची) अवहेलना झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडल्या आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे. धानोरा हे गाव व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिकदृष्ट्या तालुक्यात मोठे आहे. त्यादृष्टीने याठिकाणी शवविच्छेदन गृह उभारण्याची खरी गरज येऊन ठेपली आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत चार उपकेंद्र येतात.त्यात धानोरा, पंचक, देवगाव, बिडगाव यांचा समावेश आहे.…
४२ महिलांची केली थायरॉईडची तपासणी साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र नांद्रा प्र.लो. तसेच पाणी फाउंडेशन पुरस्कृत श्री स्वामी समर्थ शेतकरी महिला गट यांच्यावतीने कै.डॉ.आधार पाटील यांच्या जयंतीनिमित्त महिलांचे आजार व सीबीसी थायरॉईड, एचबी शुगर बीपी, औषध उपचार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात महिलांचे सीबीसी आणि ४२ महिलांची थायरॉईडची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सीएचओ डॉ. फिरोज शेख, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, लॅब टेक्निशन नेहा कोळी यांनी यशस्वी नियोजन केले होते. यशस्वीतेसाठी साधना पाटील, शुभांगी पाटील, आशा स्वयंसेविका, गावातील नवल वाघ, दिवाकर पाटील, दीपक पाटील, रघुनाथ…
सैय्यद कुटुंबियांचा ऐतिहासिक निर्णय साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील सिड फार्ममधील रहिवासी सैय्यद रौशन सैय्यद रौनक यांनी त्यांचा मुलगा सैय्यद जाहीदसाठी मुलगी पाहत असताना त्यांना बऱ्हाणपूर येथील राहणारे तथा हल्ली मुक्ताईनगर येथील रहिवासी शेख सईद शेख जब्बार यांची मुलगी अरबीना ही त्यांच्या मुलाला आवडली. दोघां कुटुंबानी एकमेकांना समजुन घेतल्यानंतर गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी साखरपुडा (मंगणी) करण्याचे ठरले होते. परंतु मुलीचे आजोबा व आजी यांनी मुक्ताईनगर मन्यार बिरादरीचे पंच कलीम मनियार जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर.चौधरी यांच्याशी चर्चा केली. साखरपुडाऐवजी लग्न (निकाह) करा, असे त्यांनी सांगितले. मनियार बिरादरीचे उपाध्यक्ष हकिम चौधरी, मनियार मस्जिद ट्रस्टचे कलीम मनियार, अहमद ठेकेदार यांनी दोन्ही नातेवाईकांशी लग्नाबाबत सविस्तर चर्चा…
शवविच्छेदन करून मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात साईमत/सोयगाव /प्रतिनिधी : माहेरी आईकडे आलेल्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगत असताना आढळून आल्याची घटना गलवाडा येथे गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शालिनी धर्मराज सुरवाडे (वय २८, रा.खांडवे, ता. जामनेर, जि. जळगाव) असे विहिरीत मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सविस्तर असे की, विवाहिता सासरहुन माहेरी आली होती. बुधवारी पहाटे ती घरातून निघून बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोयगाव पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद बुधवारी केली. मात्र, त्या महिलेचा मृतदेह गुरुवारी सोनसवाडी शिवारात विहिरीत तरंगताना आढळून आला. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून…