राज्यस्तरीय रॅंकिंगला जळगाव ग्रामीण विधानसभा प्रथम ; पश्चिम जिल्ह्याने सर्वोत्तम संघटनात्मक जिल्हा म्हणून सलग तिसऱ्यांदा पटकावला मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी थेट संवाद साधतात. समाजातील प्रेरणादायी घटना, सकारात्मक उपक्रम आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देत ते जनतेला प्रेरित करतात. उपक्रमात देशभरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बूथस्तरीय कार्यक्रमांद्वारे नागरिकांना “मन की बात” ऐकण्याची संधी उपलब्ध करून देतात. रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या १२७ व्या संस्करणात जळगाव पश्चिम जिल्हा भाजपने संघटनात्मक उत्कृष्टता दाखवत राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जळगाव पश्चिम जिल्हा भाजप अंतर्गत ८ तालुके, ५ विधानसभा आणि २० मंडळातील एक हजार…
Author: Sharad Bhalerao
तरुणाईच्या सर्जनशीलतेसह कलागुणांना महोत्सवातून व्यासपीठ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित केलेल्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव “इंद्रधनुष्य २०२५” स्पर्धेच्या लोगोचे मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, विद्यापीठ परिषद सदस्य नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. राम भावसार, प्रा. उज्ज्वल पाटील आणि उपवित्त लेखाधिकारी एस. आर. गोहिल उपस्थित होते. लोगोची संकल्पना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची आहे.…
समाजातील सर्व घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचावा तसेच एकाच व्यासपीठावर सुयोग्य विवाहस्थळांची माहिती उपलब्ध व्हावी, अशा सामाजिक हेतूने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय निःशुल्क आंतरराज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिसमागे, एस.टी.स्टँड मागे, जिल्हा पेठ, जळगाव (खान्देश) येथे पार पडणार आहे. उपक्रमात चर्मकार समाजातील विविध जाती-पोटजातीतील युवक-युवतींसोबत घटस्फोटित, विधवा, विधुर, अंध, अपंग, मूकबधिर आदी सर्वसमावेशक घटकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील,…
महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहराजवळील नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या बसच्या भीषण अपघातात महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली आहे. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात होती. तेव्हा अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर फुटला. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस भरकटली आणि थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर आदळली. धक्क्याने खिडकीत बसलेली एक महिला प्रवासी बाहेर फेकली गेली आणि ती बसच्या मागील चाकाखाली आली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत महिलेचे…
शाळेला १६ पंख्यांची भेट, वृक्षारोपणातून अभिवादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सध्या सर्वत्र माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे उत्साहात होत आहेत. जुन्या आठवणी जागवणे, शिक्षकांशी संवाद साधणे, गप्पा-गोष्टी, खेळ यामधून स्नेहबंध दृढ केले जातात. मात्र, मेहरुण भागातील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयातील १७ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला तब्बल १६ पंख्यांची भेट देऊन तसेच शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक स्व. एस. एम. खंबायत यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून अनोखी गुरुदक्षिणा अर्पण केली. अध्यक्षस्थानी सदाशिव सोनवणे होते. स्नेहभेट कार्यक्रमाच्या चर्चेवेळी मुख्याध्यापक खंबायत यांनी शाळेत पंख्यांची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु काही दिवसांनंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे माजी…
जळगावात वरिष्ठ-निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास प्रारंभ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःच्या ज्ञानात भर घालून बदल स्वीकारावा. अन्यथा, व्यवस्था तुम्हाला प्रवाहाच्या बाहेर टाकेल, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ए.टी. झांबरे विद्यालयात आयोजित सेवातंर्गंत वरिष्ठ वेतनश्रेणी-निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. शिवाजी ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे उपस्थित होत्या. याप्रसंगी बालभारतीचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा’ विषयावर सखोल…
पं. दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाने सामाजिक कार्याची घेतली दखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भगीरथ शाळेचे उपक्रमशील शिक्षक आर. डी. कोळी यांना पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन (उत्तर प्रदेश) तर्फे मानद डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भव्य सोहळ्यात मुख्य पाहुणे पद्मश्री डॉ. अरविंद कुमार (मध्य प्रदेश) यांच्या हस्ते हा सन्मान कोळी यांना बहाल करण्यात आला. पदवीदान समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मवीरांचा गौरव करण्यात आला. शिक्षण, साहित्य, समाज प्रबोधन तसेच सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आर. डी. कोळी यांना ही मानद पदवी देण्यात आली आहे. डॉ. कोळी यांनी अनाथ, आदिवासी, दलित,…
जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयातील १९९७ ते २००५ दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त महाविद्यालय परिसरात नुकताच स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. स्नेहमेळाव्यात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रंथालय कट्ट्यावर सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले होते. महाविद्यालयीन जीवनातील गप्पा, गोष्टी, किस्से आणि आठवणींना उजाळा देत आनंदाने वेळ घालवला. स्नेहमिलनाने “त्या काळातील महाविद्यालयीन दिवस पुन्हा जिवंत झाल्याची” भावना सर्वांच्या चेहऱ्यावर उमटली. याप्रसंगी भूगोल विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक गणेश सोनार यांची सदिच्छा भेट घेऊन महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत चर्चा केली. स्नेहमेळाव्याचे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद मोरे (मामा)…
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ; ५५ विद्यार्थ्यांची उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेम नगरातील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २००२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. मेळाव्यात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, मुख्याध्यापिका साधना शर्मा, शिक्षिका सुनीता मांडे, शिरसाठ, कवी प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील सकारात्मक विचार, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकी यांवर मार्गदर्शन केले. कवी प्रकाश पाटील यांनी आपल्या खास शैलीत “भ्रूणहत्या” आणि “मुलांनो अपसेट होऊ नका” या कविता सादर करून वातावरण रंगतदार केले. सभागृहात…
खा.ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते बळीराजाचे पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील अभियंता भवनात बळीराजा स्मृतीदिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेचे खा.ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात नुकतेच पूजन पार पडले. याप्रसंगी जळगाव जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीचे संस्थापक चेअरमन तथा आजीव अध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील, इंजि. प्रकाश पाटील, सुरेंद्र पाटील, इंजि. कमलाकर धांडे, हर्षल पाटील, रितेश निकम, सुरेश पाटील, शिवलाल बारी, भास्कर पाटील, इंजि. शेषराव पाटील, मालोजीराव पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात खा.ॲड. उज्ज्वल निकम यांनी बळीराजाच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजा केली. त्यानंतर त्यांनी पतपेढीच्या वाचनालय व ग्रंथालयास भेट देत तेथील पुस्तक संपदेची माहिती घेतली. तसेच अभियंता…