Author: Sharad Bhalerao

गुलाबराव पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षण सन्मान सोहळ्यात प्रा. गणेश शिंदे यांचे शिक्षकांना आवाहन साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : शिक्षक होणे हा व्यवसाय नसून तो एक प्रामाणिक पेशा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यातील समाजभान जागृत करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. हे करत असताना शिक्षकांनी स्वाभिमानी पिढी निर्माण होण्यासाठी संस्कारांचे बिजारोपणही करायला हवे. तसेच शिक्षकांनी सामाजिक भान जोपासणारा विद्यार्थी घडवायला हवा, असे आवाहन व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. यावेळी जळगाव तालुक्यातील ८५८ व धरणगाव तालुक्यातील ७९३ अशा…

Read More

मंत्री गिरीष महाजन यांच्यासह टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केले कौतुक साईमत/जामनेर/प्रतिनिधी : मुंबई येथील बॉम्बे आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये नेपाळ दुर्घटनेतील उपचार घेणाऱ्या जखमी भाविकांची जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रमचे प.पू.श्याम चैतन्यजी महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल येथील भाविकांचा काठमांडू नेपाळ येथे भीषण अपघातात जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ मुंबई येथे आणून त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. जखमी भाविकांची भेट घेऊन श्याम चैतन्यजी महाराज यांनी विचारपूस केली. वेळेवर व योग्य उपचार होत असल्याने जखमी भाविकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील रुग्णांची काळजी घेण्यासाठी आ. संजय सावकारे, भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष…

Read More

मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द,पारशी, जैन समुदायाच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन-प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहु महाराज संशोधन – प्रशिक्षण मानव विकास संस्था, महात्मा फुले संशोधन -प्रशिक्षण संस्था, आदिवासी शिक्षण – प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र उन्नती – प्रशिक्षण प्रबोधनी आदी स्वायत्त संस्थाच्या धर्तीवर अल्पसंख्यांक संशोधन -प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. संस्थेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. कार्यालयासाठी ११ पदे निर्माण करण्यासह साडे सहा कोटी रूपयांचा निधीची तरतूद केली आहे. मौलाना आजाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MARTI) संस्थेमुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आता संस्थेद्वारे जेईई, नीट यासारख्या स्पर्धा परीक्षासाठीचे प्रक्षिशणासह संशोधनासाठी आर्थिक मदत शक्य होणार आहे. मार्टी कृती समितीचे…

Read More

वेतन देयकांवर शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी सणांच्या आनंदावर पडले ‘विरजण’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर एक आठवडा उलटूनही शासनाद्वारा कुठल्याही अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती न झाल्याने जिल्ह्यातील दोन हजार २०० उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन रखडले आहे. वेतनाचा तिढा सुटण्यासाठी तात्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कायमस्वरूपी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या पोळा, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन देयकांवर शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी सणांच्या आनंदावर ‘विरजण’ पडले आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची देयकेही स्वाक्षरीअभावी प्रलंबित आहेत. शिक्षकांचे नियमित वेतन रखडल्याने गृहकर्ज हप्ते तसेच आजारपणाचा खर्च यासंदर्भात आर्थिक संकटाचे मळभ गडद झालेले आहे. जिल्ह्यातील सुमारे १०२ अंशतः अनुदानित…

Read More

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग लोकांच्या सुविधेसाठी आहे का जीव घेण्यासाठी ? तुम्हाला सुविधा देता येत नसतील, ठेकेदारांवर नियंत्रण नसेल तर काय उपयोग काय ? असा संतप्त सवाल करत ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांनी न्हई म्हणजे राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी संचालक शिवाजी पवार यांना फोन करून येत्या तीन दिवसात राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे दुरुस्त करा अन्यथा माझ्याशी गाठ असल्याचा अल्टीमेटम देऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले. गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 29 रोजी खोटेनगर जवळ खड्ड्यात गाडीचे चाक अडकल्याने कंडलून दुचाकीवरील दोन महिलांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतांना आज 31 रोजी पुन्हा वाटीका आश्रमाजवळ भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर…

Read More

महामार्गाच्या स्थिती संदर्भात ३ सप्टेंबरला बैठक घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती साईमत/ जळगाव/प्रतिनिधी : शहराच्या हद्दीतील महामार्गावरील लागोपाठ प्राणघातक अपघाताच्या घटनेमुळे शहरवासियांत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. जनक्षोभ लक्षात घेवून आ.सुरेश उर्फ राजूमामा भोळे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. त्यांनी शहराच्या हद्दीतील समांतर रस्ते आणि बायपासचे काम त्वरित सुरु करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. महामार्गाच्या स्थितीसंदर्भात ३ सप्टेंबर रोजी बैठक घेण्याची ही विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, समांतर रस्ते आणि नवीन बायपासचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण जास्त वाढले आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या…

Read More

संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’ ; आश्वासनानंतर आंदोलन मागे साईमत/जळगाव/प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त परिसरात समजताच संतप्त झालेल्या नागरिकांनी आहुजानगर जवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यामुळे दोन तास वाहनांची कोंडी झाली. तर ठेकेदारावर कार्यवाहीसह महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे दोन तासांनी रास्ता रोको…

Read More

>> कोरोना काळातील सेवक योद्ध्यांचा सन्मान साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी  ग्रामीण विकासात अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या घटकांच्या संबंधी महायुती सरकार संवेदनशील नाही,शासनाने अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा वर्कर यांना मानधन वेतनाऐवजी रोजगाराच्या कक्षेत आणावे, अशी मागणी आ.शिरीषदादा चौधरी यांनी केली.काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांसाठी कार्य तत्पर राहून सेवा देणाऱ्या सर्व परितात्र्यांचा कृतज्ञता सन्मानाचे आयोजन फैजपूर येथे शुक्रवारी करण्यात आले होते यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. रावेर यावल मतदार संघातील सर्व आशावर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस, आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील सर्व डॉक्टर अशा सर्व परितात्र्यांचा यावेळी कृतज्ञता पूर्वक सन्मान केला गेला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतधिकारी बबनराव काकडे,तहसीलदार बंडू कापसे,रावेर बीडीओ दीपाली कोतवाल,यावल बीडीओ…

Read More

पोळा सणावर पसरले दुःखाचे सावट साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी पोळा सणासाठी बैलाची तयारी करत असताना बैलाखाली दबल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची दुर्घटना पहूर कसबे येथे शनिवारी (ता. ३१)दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पोळा सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. रविवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिसात माहिती देण्यात आली आहे. पहुर कसबे येथील शेतकरी विठ्ठल देवचंद भडांगे (वय ६२) हे त्यांच्या खर्चाणे रस्त्यावरील माणकी शिवारातील शेतात पोळा सणासाठी बैलाची तयारी करत होते. बैलाच्या शिंगांचा जुना रंग काढत असताना बैलाखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

Read More

पत्रकार परिषदेत राज्यप्रमुख रामहरी राऊत यांची माहिती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : राज्यातील प्रत्येक घटकासाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने आरोग्य वारी व आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष पवन सोनवणे यांनी मुक्ताईनगर येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने रुग्णांच्या मदतीसाठी तीनशे कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरीत केला आहे. ना वशिला, ना ओळख थेट मदत मिळते. गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आशेचा किरण ठरलेला आहे.…

Read More