Author: Sharad Bhalerao

सहा दिवसांपासून ‘धनंजय’ची रुग्णालयात सुरु होती मृत्यूशी झुंज साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या धनजंय बडगुजर या विद्यार्थ्याला सर्पदंश झाला होता. गेल्या सहा दिवसांपासून धनंजय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याची आई मजुरी करुन कुटुंब सांभाळते तर वडील अपंग आहे. घटनेची माहिती माजी.आमदार दिलीप वाघ यांना समजल्यावर त्यांनी धनंजयच्या घरी भेट देवून त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याला पुढील उपचारार्थ आर्थिक मदत केली. याप्रसंगी सर्पमित्र, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड, विजु पाटील, मौजुलाल जैन, गोविंदराव पाटील, तुषार काळे, सुरेश बडगुजर, आबा बडगुजर, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

Read More

रेल्वे विभागाने विजेच्या गरजांसाठी सुरू केला सौर ऊर्जेचा वापर साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : मध्य रेल्वेने आपली विजेची गरज भागविण्यासाठी हरित आणि अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे . त्यामुळे भुसावळ विभागाने सौर ऊर्जेचा वापर करून एक कोटी नऊ लाख रुपयांची बचत केली आहे. यामुळे भुसावळच्या जंक्शन स्थानकात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेने अक्षय ऊर्जाचा सध्या ट्रैक्शन व नॉन-ट्रैक्शन वापर करीता हरित व नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा उपयोग सुरू केला आहे. मध्य रेल्वेच्या जुलै – २०२४ पर्यंत सर्व पाच विभागांमध्ये २०५ ठिकाणी सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत . यामध्ये मुंबई विभागातील ४७ ठिकाणी तर नागपूर ५८, पुणे ५० ,…

Read More

अनेकांनी सोहळा केला मोबाईलच्या ‘कॅमेऱ्यात कैद’ साईमत/जामनेर /प्रतिनिधी : शेकडो वर्षांपासूनची परंपरा जोपासत जामनेर शहरातील माळीगल्ली परिसरात पाचोरा रोड ते गांधी चौक तर बजरंग पुरा भागातील १४ वर्षानंतर मार्गात बदल करुन पोलीस स्टेशन समोरुन ते भुसावळ रोड तसेच श्रीराम पेठ भागातील दसरा मैदानावरील मंमादेवी ते हनुमान मंदिर जवळील श्रीराम मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्याची प्रथा आजच्या युगात टिकून आहे. बारागाड्याचा सोहळा अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला. शहरातील श्रीराम पेठ भागातील पुरातन काळातील “खंडेराव महाराज” यांचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पोळ्यांच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढल्या जातात. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो. आजच्या इंटरनेट युगात किंचीतही…

Read More

नियमित होणार पुरुष नसबंदी शिबिर साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात जुने व लौकिक मिळवलेले आरोग्य केंद्र आहे. वाकडी येथे मदर पीएचसी आहे. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बैलगाडीने उपचारासाठी येतात. १९५८ मध्ये केदारशेठ देहाडराय, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने आणि आबाजी नाना पाटील यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अठ्ठावीस ते तीस जणांचा स्टाफ येथे होता. महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पूर्वीपासूनच आरोग्य केंद्राचा मोठ्या प्रमाणात लौकिक आहे. यानंतरही वाकडी येथे नियमितपणे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर होणार असल्याचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रास डॉ.वाय.एच.शहा, डॉ.जयश्री पाटील, डॉ.गौतम खिल्लारे, डॉ.महेश…

Read More

कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या घोडगाव आऊट पोस्ट पोलीस चौकीचे जिल्हा नियोजन निधी २०२३/२४ अखेर प्राप्त निधीमधून बांधकाम केलेल्या घोडगाव आऊट पोस्ट पोलीस चौकीचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. घोडगाव आऊट पोस्ट पोलीस चौकीस कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आगामी काळात होऊ घातलेल्या गणेश उत्सव, दुर्गा उत्सव व सर्व सणांच्या शुभेच्छा देऊन सर्व सण आनंदासह शांततेने साजरे करण्याचे आवाहन करून गृहखात्यास सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी डीवायएसपी कुणाल सोनवणे, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पी.आय.कावेरी कमलाकर, सरपंच इंदुबाई भील, राजू महाजन, सुनील कोळी…

Read More

बारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात साईमत/चोपडा/प्रतिनिधी : झपाट्याने बदलणाऱ्या काळात आताच्या तरुण पालकांनीच आता आपल्या मुलांसाठी रोल मॉडेल बनावे. स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून मुलांवर चांगले संस्कार रुजवावे. मुलांसाठी स्वतः वाचनाची सवय लावावी, मुलांसमोर मोबाईल कमी वापरावा, मुलांना आपल्या वस्तू, भावना वाटण्याची सवय लावावी. साध्या राहणीचा अंगिकार करावा, असा सल्ला उपस्थित पालकांना देत नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे (बारी) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. ते चोपडा येथील बारीवाडा येथे समस्त सुर्यवंशीय बारी समाज पंच मंडळ, बारी समाज महिला मंडळ व नागवेल मित्र मंडळातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी मंचावर शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक…

Read More

सचिवपदी राहुल गायकवाड यांची निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील शिवतांडव मित्र मंडळाची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत गणेशाची मूर्ती स्थापन करुन विविध उपक्रम राबविण्याचे नियाेजन करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मंडळाची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निखिल कोळी, उपाध्यक्ष घनशाम अहिरकर, सचिव राहुल गायकवाड, खजिनदार आकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंडळाच्या सदस्यांमध्ये कार्तिक पाटील, गौरव पाटील, सागर गायकवाड, प्रेम सोनवणे, ओम सपकाळे, सत्यम ठाकूर, रेहान पठाण, अक्षय रोडे, चिराग इंगळे, मयूर तायडे, सौरभ सानप, हितेश सानप, हितू पाटील, गुणवंत सोनवणे, रुपेश वाणी, मोहित जावळे, आदित्य पाटील, गौरव पाटील यांचा समावेश आहे. १५…

Read More

बंदला अनेक प्रवासी संघटनांनी दिला पाठिंबा, शासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष साईमत।चोपडा।प्रतिनिधी। एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यव्यापी संप पुकारला आहे. राज्यस्तरावरील तेरा संघटनेची कृती समितीने संपाची हाक दिली होती. त्यानुसार हा संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर चोपडा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संपाच्या ठिकाणी प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिल्यावर बस आगार हे मंगळवारी अंशतः सुरू दिसून येत होते. काही प्रवासी स्थानकावर ताटकळत बसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी शुकशुकाट होता. संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आमच्या मागण्यांचा पाठपुरावा संघटनेमार्फत वेळोवेळी केलेला असतानाही शासनाने त्या मागण्या पूर्ण न करत त्याकडे दुर्लक्ष केले आहे.…

Read More

खादगावातील शालेय मुलीचा मृतदेह सापडला, दोन जण बेपत्ता साईमत/जामनेर/प्रतिनिधी: तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून जाऊन तीन जणांचा मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्यात इंदिराबाई ललवाणी विद्यालयात बारावी सायन्समध्ये शिक्षण घेणारी १८ वर्षीय विद्यार्थिनी पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर ही खादगाव येथील मुलगी भुसावळ रोड कांग नदीवर असलेल्या पुलावरून जात होते. ती पा ण्याचा प्रवाह पाहून चक्कर येऊन कांग नदी पात्रात पडून वाहून गेली होती. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर मुलीचा मृतदेह खादगाव गावाजवळ नदीपात्रात अाढळून आला. तसेच शहापूर येथील ४० वर्षीय युवक तर मुंदखेडा येथील एक २० वर्षीय तरूण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, तालुक्यातील शहापूर येथील खडकी नदीवरील…

Read More

भडगावात उत्साहात पार पडली निष्ठावंतांची ‘दहीहंडी’ साईमत/पाचोरा/प्रतिनिधी: निष्ठावंतांची ‘दहीहंडी’ चा कार्यक्रम स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला आहे. दहीहंडीच्या थरांप्रमाणेच आपला पाया तत्वनिष्ठा व संस्कारांनी मजबूत असला पाहिजे. पाया मजबूत नसल्यानेच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रतिपादन उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी केले. क्रेनला लटकावलेली उंच दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांनी प्रयत्न केले. अखेर चाळीसगाव येथील महावीर गोविंदा पथक मंडळाने बाजी मारत निष्ठावंतांची दहीहंडी फोडली. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून भडगाव येथे आयोजित निष्ठावंतांच्या दहीहंडी कार्यक्रमाला भडगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमापूर्वी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी…

Read More