Author: Sharad Bhalerao

विद्यार्थ्यांनी सर्वच भूमिका पार पाडत शिक्षकांप्रती व्यक्त केली ‘कृतज्ञता’ साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिपाई पदापासून ते मुख्याध्यापक पदापर्यंतच्या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनीच पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांसह महात्मा फुले शिक्षण संस्था आणि ग्रामपंचायतीने गुरुजनांचा सत्कार केला. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष शंकर घोंगडे, माजी सरपंच माधवराव घोंगडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. व्ही. घोंगडे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक पदाची धुरा दहावीची विद्यार्थिनी स्नेहल सपकाळ हिने तर उपमुख्याध्यापक पदाची जबाबदारी प्रांजली…

Read More

न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर उत्साहात साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी नुकतेच मार्गदर्शन शिबिर घेण्यात येऊन मान्यवरांनी आरोग्याविषयीचे धडे दिले. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, आशा कुयटे, सिकल सेल कार्यक्रम समन्वयक शिवाली देशमुख उपस्थित होत्या. वय वर्षे १० ते वय वर्ष १९ पर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश किशोरवयीन गटात होतो. किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाची आवश्यकता का आहे, किशोरवयीन अवस्थेत कोणते शारीरिक व मानसिक बदल होतात, किशोरवयीन वयात आई-वडील पालक यांच्यासोबत संवाद साधणे का गरजेचे…

Read More

आनंदयात्री परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून जामनेर येथील आनंदयात्री परिवारातर्फे शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व १९८ विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल सेठ होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश सोनवणे, डॉ. आशिष महाजन, कडू माळी, मुख्याध्यापक पी.टी.पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आनंदयात्री परिवारातर्फे शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल, गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी.टी.पाटील, डॉ. अमोल सेठ यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी आनंदयात्री परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. यांनी घेतले परिश्रम…

Read More

उबाठा शिवसेनेची मागणी, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : मशीदमध्ये घुसून मारण्याची धमकी देत बेताल वक्तव्य करून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या आ. नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी शिवसेना (उबाठा) वतीने हातात कोंबडी घेत “कोंबडी चोर नितेश राणे मुर्दाबाद” “कोंबडी चोर नितेश राणे याची आमदारकी रद्द झालीच पाहिजे” अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही” अशा घोषणा देत कोंबड्या हातात घेऊन विश्रामगृह येथुन उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून बेताल वक्तव्य करणाऱ्या व महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावू पाहणाऱ्या आ.नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यांची होती उपस्थिती यावेळी…

Read More

मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपुजन साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील वरखेडी तांडा येथे विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नुकताच झाला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी येथील महिला भगिनींशी संवाद साधत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री, श्रावण बाळ, तीर्थयात्रा आदी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. वरखेडी तांडा येथील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळाला. याबाबत महिलांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. याप्रसंगी…

Read More

आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश साईमत/बोदवड/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शहराच्या पाणीपुरवठा योजनेस ९५.१४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नगरोत्थान महाभियानांतर्गत बोदवड शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नगरो-२०२४/प्र.क्र.४३५/नवि-३३ मंत्रालय, मुंबई- ४०००३२. दिनांक:- ०५ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्ध परिपत्रकानुसार सुमारे ९५.१४ कोटीच्या निधिसह प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मोठा निर्णय झाला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी योजनेला मंजुरी मिळाली होती.त्यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने योजनेला ९५.१४ कोटी रुपयांच्या निधीसह राज्याच्या नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता…

Read More

यशाबद्दल अनेकांनी केले कौतुक साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फूले माध्यमिक विद्यालयाच्या मुलीच्या संघाने तालुका स्तरीय खो -खो स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. जामनेर येथिल लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कुलच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय शालेय खो -खो स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षाच्या आतील व १७ वर्षाच्या आतील वयोगटातील मुलीच्या दोन संघाने सहभाग नोंदविला. त्यातील १७ वर्षाखालील वयोगटातील मुलीच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत, संघ व्यवस्थापक कल्पना बनकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले तर चंदेश सागर, सुनील पवार…

Read More

दहा वर्षापासून होरपळ तरीही ठेवीदारांच्या ‘मरणकळा’ संपता संपेना साईमत। जळगाव। सुरेश उज्जैनवाल येथील बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजे बीएचआर पतसंस्थेच्या अवसयाक पदावर असलेल्या सहकारातील सहाय्यक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यासह सोबत एकाला लाच लुचपत खात्याने दीड लाखाची रक्कम स्वीकारतांना मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी रंगेहात अटक केली. याच संस्थेच्या संचालकांनी २०१४ मध्ये केलेला घोटाळा सुमारे ९० हजार ठेवीदारांच्या एक हजार ३०० कोटींची रक्कम परतावा अडचणीत आणणारा ठरला. यामुळे संचालकांवर दाखल ९० ठिकाणच्या गुन्ह्यांत त्यांना झालेली अटक त्यात त्यांच्या या तुरुंगातून त्या तुरुंगात झालेल्या वाऱ्या केवळ शिक्षा म्हणून नावापूरत्या ठरल्या.संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर शासनाच्या नियुक्त सहकार खात्याच्या दोनही अधिकाऱ्यांनी घोटाळ्यात घोटाळे केल्याने या संस्थेला…

Read More

शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने आणि त्यावर वारंवार आश्वासन देऊनही आपण आश्वासित मागण्यांवर निर्णयांची अंमलबजावणी त्वरित नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार यावर्षी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यावर्षी शिक्षक दिन ‘अन्याय दिवस’ म्हणून यादिवशी आंदोलन करून सरकारच्या निषेधार्थ राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसिलदारांना धरणे धरून निवेदन देतील. यानिमित्त अमळनेर तालुका जुक्टो संघटनेच्यावतीने अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना अमळनेर तालुका जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश बी. बोरसे, सचिव प्रा. स्वप्नील पवार, जळगाव जुक्टो संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील…

Read More

जामनेरला श्री व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सभा उत्साहात साईमत/जामनेर /प्रतिनिधी : बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाचा, बचत निधीचा वापर उद्योगासाठी करावा. बचत गट आता बचत गट म्हणून मर्यादित न राहता उत्पादक, व्यावसायिक गट म्हणून पुढे यावा, विविध उपप्रकल्पात सहभाग घेऊन गटाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करावी., असे मत व्यंकटेश गटाचे मार्गदर्शक अमोल झाल्टे यांनी व्यक्त केले. जामनेर येथील हाॅटेल राधाकृष्ण, नाकोडा पार्क येथे व्यंकटेश बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संदीप महाजन होते. सभेत मागील वर्षाचा हिशोब, जमा खर्चास मंजूर देवून कर्ज वाटप मर्यादा ७५ ते ८० हजारापर्यंत ठरविण्यात…

Read More