सतपंथ मंदिरातही सामूहिक पूजन साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी : शहरात हरतालिका पूजनानिमित्त ठिकठिकाणी सामूहिक पूजन करण्यात आले. दत्त डेअरीचे संचालक माधव हरी भोई यांच्या निवासस्थानी परिसरातील सर्व महिलांनी सामूहिक हरतालिका पूजन केले. यादिवशी महिला दिवसभर निरंकट उपवास करतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी प्रार्थना करून परिवाराला सुख-शांती समृद्धी मिळावी, अशी प्रार्थना करतात. हरतालिकेची विधिवत पूजा पुरोहितद्वारे करून दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ती प्रथा कायम हरतालिकेला महिला उपवास व्रत करून करत आहे. सुनिता भोई यांनी पुढाकार घेऊन सामूहिक हरतालिका पूजनासाठी सहकार्य केले. लक्ष्मी नगरमधील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक हरतालिका पूजन करण्यात आले. भवानी माता मंदिरात…
Author: Sharad Bhalerao
भाजपाच्या नेत्यांची लाभली उपस्थिती साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील जंगलातांडा तांडा येथे भाजपाच्या जाहीर प्रवेश कार्यक्रमात जंगलातांडा येथील तरुणांसह तालुक्यातील शेकडोच्या संख्येने तरुणांनी गुरुवारी भाजपा प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसज मुलतानी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे,जयप्रकाश चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष बद्री राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी मा.पं.स. सदस्य संजीवन सोनवणे, नगरसेवक राजेंद्र जावळे, रऊफ देशमुख, धनराज राठोड, दिलीप पाटील, संजय पाटील, सुनील गव्हांडे, मयूर मनगटे, सुनील ठोंबरे, मंगेश सोहनी, संजय मोरे, राहुल परदेशी, रवींद्र चव्हान, उखा चव्हाण, विष्णु पंत, पांडुरंग जाधव, आण्णा तांगडे, योगेश…
बिबट्याने सहावेळा केलेल्या हल्ल्यात आठ जनावरे ठार, वन विभागाचे दुर्लक्ष साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी : शेतकऱ्याच्या जवळील खळ्यात बांधलेल्या गोऱ्ह्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्यात गोऱ्हा जखमी झाला आहे. ही घटना पुनगाव, ता. चोपडा येथे गुरुवार रात्री लहानु जीवराम सोनवणे यांच्या खळ्यात घडली. त्यात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने सहा वेळा परिसरात हल्ला करून आठ जनावरे ठार केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. बिबट्याने गुरुवारी रात्री गोऱ्ह्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना घडत असताना काहीतरी आवाज होत असल्याने गावांना जवळील निवृत्ती जगन्नाथ सोनवणे व रामकृष्ण सुखदेव बाविस्कर यांनी तात्काळ…
स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातील संघाने मिळविले अजिंक्यपद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नंदुरबार जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशनद्वारा दोंडाईचा येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान झालेल्या फ्लोअर बॉल स्पर्धेत खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलने घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेसाठी शाळेतून १९ वर्ष वयोगटातून गेलेल्या संघाने अजिंक्यपद मिळविले. संघातील इ.नववीचा विद्यार्थी विवेश चौथनकर विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी गोलकीपर म्हणून निवड झाली. १४ वर्ष आतील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त करत ब्रांझ पदक मिळविले. तसेच १४ वर्षाच्या आतील मुलींच्या गटाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत रजत पदक प्राप्त केले. संघाला मार्गदर्शन…
जळगावला राज्यस्तरीय मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन, कृतज्ञता सोहळ्यात सन्मानपत्र, गणेश मूर्ती देवून भव्य सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जलजीवन मिशनमुळे पाणीपुरवठा विभागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. पाणी पाजणे हे खरोखरच पुण्यकर्म आहे. त्यामुळे केवळ दुसऱ्यांना मदत होत नाही तर आपल्यालाही आत्मिक समाधान मिळते. अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनता आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहे. म.जी.प्रा. च्या सुमारे 450 अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेश केले आहे. राज्यातील एक हजार 74 हातपंप/वीजपंप कर्मचाऱ्यांचा 45 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना सेवेत कायम सामावून घेता आल्याचे आत्मिक समाधान आहे. मंत्रीपदाचा बडेजाव न करता पदाची गरीमा राखण्याचा सतत प्रयत्न…
सेवा काळात उत्कृष्ठ कामगिरी करून उमटविला ठसा साईमत/निंभोरा,ता.रावेर /प्रतिनिधी : पुरी गोलवाडे येथील ग्रामसेवक आर.पी. तायडे यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात त्यांनी शासन नियमाच्या अधीन राहुन आपल्या सेवेच्या काळात अनेक ठिकाणी त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करून आपला ठसा उमटविला आहे. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारतर्फे त्यांना गौरविले आहे. यापूर्वी २००९ मध्ये सांगवी, ता. यावल येथे सेवा बजावित असतांना संपूर्ण गाव हगणदारी मुक्त होणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नसल्याचा संकल्प केला होता. तो संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करण्यास यश आले होते. याबद्दल तत्कालिन बीडीओ यांनी त्यांच्या पायात चप्पल घालून त्यांचा सत्कार…
संस्थेअंतर्गत संजय चौधरी ठरले ‘आदर्श शिक्षक’ साईमत/यावल/प्रतिनिधी : येथील बालसंस्कार विद्या मंदिरात शिक्षक दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय असे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच संस्थेअंतर्गत आदर्श शिक्षक म्हणून शिक्षक संजय नारायण चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा रुमाल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार केला. वकृत्व स्पर्धेत प्रथम गट एक ते चार यात प्रथम क्रमांक रिद्धी पंकज गडे इयत्ता पहिली, द्वितीय गट पाच ते सात प्रथम सानवी पंकज गडे इयत्ता सहावी, द्वितीय स्वराली सुरेश तायडे इयत्ता पाचवी, तृतीय निकिता उमाकांत भोगे…
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांची सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील बस स्टँड परिसर सध्या ‘रोडरोमिओंचा’ अड्डा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी हा परिसर चिंतेचा विषय बनला आहे. बस स्टँडवर नियमितपणे प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोर मुलांच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात मुलींवर होणाऱ्या हत्याचार आणि अत्याचारांच्या घटनांचा आलेख वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरच्या भागातही विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बस स्टँडजवळ टवाळखोर मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलांचा उद्देश फक्त चेष्टा-मस्करी न करता, विद्यार्थिनींचा त्रास वाढविणे असा आहे. यासंदर्भात…
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी निभावली ‘मास्तरची’ भूमिका साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आदर्श गाव जवखेडे येथील ग्रामस्थांनी ग्रामस्तरीय शिक्षक पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा कविता प्रफुल्ल पाटील होत्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, ईशस्तवन तसेच स्वागत गीताचे नियोजन केलेले होते. यावेळी शाळेचे उपशिक्षक मुकेश मुरलीधर पाटील, उपशिक्षिका अर्चना मनीलाल बागुल यांना ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त करुन कृतज्ञता व्यक्त…
विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण, उपाय योजनाबाबत जाणून घेतली माहिती साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : येथील श्री.गो.से.हायस्कुल येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा दोन शाळा मूल्यांकन समितीचे प्रमुख विनोद धनगर, रवींद्र शिंदे, श्री.ठोके यांनी नुकतीच शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजनाबाबत माहिती जाणून घेतली. समितीने विद्यालयातील स्वच्छता परसबाग, क्रीडांगणावर कबड्डी, खो-खो, बास्केटबॉलचे मैदान, व्यायामशाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह, रंगमंच, विज्ञान /गणित प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय, ई लर्निंग रूम, संगणक कक्ष, चित्रकला गृह, मुख्याध्यापक कक्ष, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक दालन, शिक्षक बंधू-भगिनी यांचे दालन, हॅन्ड वॉश, सुरक्षा ऑडिट, सूचना/तक्रार व प्रथमोपचार पेटी, ऑटोमॅटिक…