भावी पिढ्या घडविण्यात शाळा ठरतेय अग्रेसर साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात श्री. गो.से.हायस्कुल भावी पिढ्या घडविण्यात ही शाळा सदैव अग्रेसर राहिली आहे. शहरातील सर्वात जुनी व गौरवशाली इतिहास प्राप्त असलेली जिल्ह्यातील नामांकित शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. पाचोरा शहरात सर्वात मोठी व सर्वात जास्त विद्यार्थी संख्या शाळेचे वैभव आहे. तसेच शाळेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा सदैव उंचावत राहिला आहे. चित्रातील विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या क्रियेतून आमची गती दिसत आहे. शाळेच्या केलेल्या रेखांकनाच्या सर्वत्र घडलेली पिढी प्रतिकात्मक चित्रांच्या रुपात काढलेली दिसून येत आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्टिस्ट, वैज्ञानिक, खेळाडू, कॉम्प्युटर तज्ज्ञ, गायक, अशा विविध क्षेत्रातून १९३६ पासून विद्यार्थी घडत आहेत. यासोबतच संस्कारांची मूल्य…
Author: Sharad Bhalerao
फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नापुर्णासिंग यांचे आवाहन साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : येथे गणपती उत्सवात स्पर्धापेक्षा सर्वसमावेशकता दिसल्याने आनंद होत आहे. सर्वांनी एकत्रितपणे येवून कायद्याचे पालन करुन सावदा शहरातील सर्व गणेश मंडळानी भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन डीवायएसपी अन्नापुर्णासिंग यांनी केले आहे. येथील संभाजी महाराज मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे चावडी परिसरात “मोरया रे बाप्पा मोरया रे” च्या गजरात आकर्षक व भव्य श्री गणेशची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मान यंदा फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नापुर्णासिंग आणि माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांची कन्या सिमरन वानखेडे यांना मिळाला. यावेळी मान्यवरांसह गणेश भक्त उपस्थित होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी वरणगाव येथील देवदर्शनासाठी गेलेल्या भक्त गणांवर ओढवलेल्या…
पर्युषण महापर्वाचा सांगता सोहळा, मोबाईल सूचीचेही होणार प्रकाशन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील दिगंबर जैन बहुद्देशीय मंडळातर्फे जळगाव जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पर्युषण महापर्वाची सांगता आणि समाजाच्या मोबाईल सूचीचे प्रकाशन सोहळा येत्या रविवारी, २२ सप्टेंबर रोजी बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील दहावी, बारावी व पदवीधर विध्यार्थ्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षात 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेचा फोटो दीपक जैन यांच्या 9595536079 या नंबरवर 20 सप्टेंबरपर्यंत टाकावा. अधिक माहितीसाठी गणेश डेरेकर 7276729880, महावीर सैतवाल 9370132064, अजय सूर्यवंशी 9309195073, विश्वनाथ चतुर 9823287161, धन्यकुमार जैन 9422779989 यांच्याशी संपर्क…
ग्रामस्थांनी दिले जळगाव विभाग नियंत्रकांना निवेदन साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : येथूनच जवळील पाळधी गावात जलद, अति जलद एस.टी.महामंडळ बसला थांबा असल्यावरही बस थांबत नसल्यामुळे विभाग नियंत्रक यांना ग्रामस्थांनी बस थांबा द्यावा, अशा आशयाचे नुकतेच निवेदन दिले. यावेळी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम महाजन यांच्या सहकार्याने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट झाली. यावेळी निवेदन देताना पाळधी गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण उपस्थित होते. जामनेर तालुक्यातील पाळधी गाव छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर आहे. यापूर्वीपासून जलद व अति जलद गाड्यांना थांबा आहे. परंतु आता वाहक व चालक यांच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, शालेय शिक्षणासाठी जिल्ह्यावर…
रक्तदात्यांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पूज्य साने गुरुजी यांचे शतकोत्तर रजत महोत्सवी जयंती महोत्सवी वर्ष तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्थेतर्फे वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातच रविवारी, १५ सप्टेंबर रोजी काव्य रत्नावली चौक, भाऊंच्या उद्यानाजवळ संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, महोत्सव समितीचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव चव्हाण, सिंधुताईंचे मानसपुत्र डी. बी. महाजन, कवी निवृत्तीनाथ कोळी, प्रा. प्रकाश महाजन, संतोष मराठे, नारायण पवार, वर्षा अहिरराव, ज्योती राणे, सचिव शालिनी सैंदाणे, रंजना सोनवणे यांनी…
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांची पत्रकार परिषदेद्वारे मागणी साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : राज्य शासनाने खासगी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांनी केली आहे. जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला शिक्षण मानद संचालक प्रा. सुनील गरुड, प्रा.डॉ. यु. वाय. गांगुर्डे, प्राचार्य आर. एस सानप, एस. एन. महाले, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, खासगी शिक्षण संस्थांना १२ टक्के व्यतनेत्तर अनुदान द्यावे म्हणून उच्च न्यायालायाने शासनाला पाच वर्षे आधी आदेश दिले आहे. परंतु…
तीस मिनिटात ‘होत्याचे नव्हते’ झाले; खटकाळी नदीला ‘महापूर’ साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : घोसलासह शिवारात सोमवारी, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अचानक तीस मिनिटाच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. तीस मिनिटात ढगफुटी सदृश पावसाने ‘होत्याचे नव्हते’ झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात वाचवून जगविलेले पिकांची ढगफुटी सदृश पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारावर अचानक सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने घोसला गावाच्या खटकाळी नदीला ‘महापूर’ आल्यामुळे सोयगाव-बनोटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पूराच्या पाण्याने सायंकाळी थैमान घातले होते. रात्री उशिरापर्यंत घोसला शिवारात आपत्तीग्रस्त स्थिती उद्भवली होती. मात्र, महसुलचे आपत्ती निवारण पथक गायब होते. त्यामुळे पूरग्रस्त स्थितीत ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना जीव मुठीत घेत रहावे…
बाजार समिती समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने सक्रीय साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे सर्व जाती – धर्मीय मिळून एकत्रित असलेला परिवार आहे. त्यामध्ये पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असो., पाचोरा मार्केट यार्ड आडत असो., हमाल-मापाडी पुरुष व महिला कामगार संघटनासह कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी वर्षभर धार्मिक व समाज हिताचे उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने सक्रीय असतात. अशा उपक्रमांसाठी पाचोरा बाजार समितीचे सभापती, उपसभापती पी.ए. पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ प्रोत्साहन देतात. असा उपक्रम यावर्षापासून गणेशोत्सोव प्रारंभ करण्याची कल्पना सुचली आणि त्याचे अध्यक्षस्थान व्यापारी असो.चे अध्यक्ष सचिन येवले यांना देण्यात आले. त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपरोक्त सर्व असो.संघटना यांना विश्वासात घेऊन गणेशोत्सव उत्साहाने…
मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हा सचिव हेमंत गायकवाडांची मागणी साईमत/चोपडा /प्रतिनिधी : माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यास २८ सप्टेंबर २००८ पासून सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यात हे उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेर सादर करावा, अश्याही सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाचा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,मुंबई २० सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार, २८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात यावा. यादिवशी शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण…
अल्पवयीन मुलीच्या डोक्यात दगड टाकून केला होता खून साईमत/चोपडा /प्रतिनिधी : तालुक्यातील विरवाडा शिवारात शनिवारी, ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास शेतमजुराच्या १३ वर्षीय मुलीवर २० वर्षीय नराधमाने शेतात ओढून नेत अमानुषपणे अत्याचार करून मुलीचा डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपिताला चोपडा शहर पोलिसांनी चोपडा न्यायालयात हजर केल्यावर त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. कावेरी कमलाकर करीत आहेत.