Author: Sharad Bhalerao

भारतातील सर्वात उंच इमारत उभारण्याची संकेत अग्रवालला मिळाली संधी साईमत/रावेर/प्रतिनिधी : वरळी (मुंबई) येथे उभ्या राहत असलेल्या सर्वात उंच इमारतीचे काम करण्याची प्रमुख जबाबदारी रावेर येथील युवकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. संकेत अग्रवाल रिअल इस्टेट क्षेत्रात मित्तल ब्रदर्स कन्स्ट्रकशन कंपनीत कार्यरत आहे. या काळात अल्पावधीत त्याने कामाचा ठसा उमटविण्यात यश मिळविले आहे. जगभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असलेल्या ‘ट्रेडफ्लॉग’कडून संकेत अग्रवाल यांची दखल घेत त्यांचा गौरव केल्याने, रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील केळी उद्योजक तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांचे चिरंजीव संकेत अग्रवाल सध्या पुणे-मुंबई येथे बांधकाम क्षेत्रात काम करत आहे. मित्तल ब्रदर्स या कंपनीत…

Read More

शालेय स्तरावरून २२ मुला-मुलींच्या संघांनी घेतला सहभाग साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा व बेसबॉल संघटना बुलढाणा आणि यशोधाम पब्लिक स्कुल अँड ज्यु. कॉलेज, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा नुकत्याच यशोधाम पब्लिक स्कुल अँड ज्यु.कॉलेज येथे उत्साहात पार पडल्या. बेसबॉल क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय स्तरावरून २२ मुला-मुलींच्या संघांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उषा होत्या. कार्यक्रमाचे उद्‌घाटक रमेश उमाळकर, बाळासाहेब जगताप होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे रवींद्र धारपवार, विजय पळसकर, तर उद्‌घाटनप्रसंगी पत्रकार धीरज वैष्णव, संदीप सावजी, कृष्णा मेहसरे, सतीश दांडगे, जमील भाई, समाधान सुरवाडे उपस्थित होते. स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील विविध…

Read More

हरिपुरा राऊंड स्टाफला चौपट बेवारस आढळले साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास १ हजार ६६० रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या पाच चौपट बेवारस स्थितीत असलेल्या हरिपुरा राऊंड स्टाफ यांना आढळून आल्याने साग चौपट नग पाच घ.मी. ०.०८२ अंदाजे किमत १ हजार ६६० रुपयांच्या जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केले. याप्रकरणी प्र. री. क्र.१०/२०२४ अन्वये व.र. हरिपूरा यांनी नोंदविला. यांनी केली कारवाई ही कारवाई जळगाव येथील यावल वनविभाग उपवन संरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक समाधान पाटील, यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनरक्षक हरिपूरा अशरफ तडवी, वनरक्षक सुधीर…

Read More

गणेश भक्तांसह शिवप्रेमींची देखावा पाहण्यासाठी उसळली गर्दी साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : येथील मोठा माळी वाड्यातील शिवबा मित्र मंडळ संचलित सार्वजनिक फुले गणेश मंडळाने यावर्षी बाप्पा विराजमान असलेल्या जागी शिवराज्याभिषेक दिनाचे यंदा ३५१ वर्ष आहे. त्यानिमित्त रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान असल्याचा १२ बाय ८ फुटाची प्रतिकृतीचा देखावा सादर केला आहे. शहरातील गणेश भक्तांसह शिवभक्तांची देखावा पाहण्यासाठी मोठा माळी वाडा येथे गर्दी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातील मनमोहक गणेशमूर्ती आणि देखाव्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवबा मित्र मंडळ संचलित सार्वजनिक फुले गणेश मंडळाचे यंदा ३१ वे वर्ष आहे. शिवबा मित्र मंडळाने यापूर्वीही श्री संत सावता महाराज यांची कांदा, मुळा, भाजी…

Read More

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले स्वागत साईमत/पारोळा/प्रतिनिधी : तालुक्यातील रताळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) युवा जिल्हा चिटणीस उद्धव धुडकु पाटील, संजय बुधा पाटील, अनिल महादु पाटील, सचिन तुळशीराम वाघ, प्रल्हाद उखा पाटील, शांताराम बारकु पाटील, सतिष रघुनाथ गढरी, हिरामण बारकु पाटील, हरचंद धुडकु पाटील, सुकलाल फुलसिंग भिल, राकेश हसरत पाटील, शामराव बापु भिल, आबा संजय भील, अनिल विनायक भिल, दादाभाऊ युवराज पाटील, वाल्मिक एकनाथ पाटील, प्रवीण सुकलाल भील, समाधान वाल्मिक पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आ.चिमणराव पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि गावांचा होत असलेला झपाट्याने विकासाला प्रेरित…

Read More

वैशालीताई सूर्यवंशी यांचे ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात स्वागत साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : मतदारसंघातील सर्वसामान्यांसह देशाचा पोषणकर्ता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी आणि थेट बळीराजाशी संवाद साधण्यासाठी शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी पाचोरा – भडगाव मतदारसंघांत शेतकरी शिवसंवाद यात्रेचे नियोजन केले आहे. शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची ९ सप्टेंबरपासून पाचोरा तालुक्यातून सुरूवात झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी शिवसंवाद यात्रा’ नगरदेवळा- बाळद जिल्हा परिषद गटातून सुरू झाली. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात पाचोरा तालुक्यातील निपाणे, मेहुलाई तांडा, बदरखे, बदरखेतांडा व आखतवाडे या गावांमध्ये शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. दुपारच्या सत्रात पिंपळगाव, संगमेश्वर, चुंचाळे, नगरदेवळा सीम आणि…

Read More

फुलगावातील घटना, अखेर १८ दिवस मृत्युशी झुंज ठरली अपयशी साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : सद्यस्थितीत मोकाट श्वानांनी शहर व प्रत्येक गाव परिसरात धुमाकुळ घातला आहे. अशातच एका पिसाळलेल्या श्वानाने एका युवकासह दोन इसमांना चावा घेतला होता. त्यामुळे युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचारानंतरही युवकाची मृत्युशी झुंज मंगळवारी अपयशी ठरल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील फुलगाव येथे गेल्या २२ ऑगष्ट रोजी एका मोकाट पिसाळलेल्या श्वानाने भल्या पहाटे फुलगाव उड्डाण पुलालगत चौहान बुट हाऊस समोर झोपलेल्या एका ६० वर्षीय इसमाच्या तोंडावर चावा घेवून जखमी केले होते. यानंतर मोकाट श्वानाने आपला मोर्चा फुलगाव गावाकडे वळविला. पिसाळलेल्या श्वानाला…

Read More

निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/रावेर/प्रतिनिधी : तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रस्त्यावरील विवरे शेत शिवारात एका शेतातील पाॅवरग्रिटच्या टाॅवरवर चढून एका २५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना विवरे गावाजवळ घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबड उडाली. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या पाॅवर ग्रिटच्या अतिउच्च विद्युत क्षमतेच्या टाॅवरवर सुमारे शंभर ते सव्वाशे फुटवर चढून ब्रिजेश कुमार बायगा (वय २५, रा. भरतपूर, छतीसगढ) याने कापडाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे याठिकाणी विवरेसह खिर्डी परिसरातील नागरिकांसह…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते धनादेश सुपूर्द साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील नांदा येथे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या तुकाराम मोहन चव्हाण यांच्या वारस ललीताबाई तुकाराम चव्हाण यांना चार लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच सुपूर्द करण्यात आला. नांदा तांडा येथील शेतकरी तुकाराम मोहन चव्हाण हे घरी पोळा सण करून शेतात गेले होते. शेतातून रात्री ८ वाजेच्या सुमारास ते परत घरी येताना पाऊस सुरू झाल्याने ते वाटेतील एक झाडाखाली थांबले. यावेळी झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.…

Read More

पाचोऱ्यात मनसेची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : येथील शासकीय विश्रामगृहात मनसेची जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच पार पडली. आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व विधानसभेनिमित्त कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले तसेच इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारही केला. बैठकीत नगरदेवळा आणि तांदुळवाडी येथील काही तरुणांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवून जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यांची लाभली उपस्थिती यावेळी जिल्हा सचिव शुभम पाटील, उपजिल्हाध्यक्ष प्रज्ज्वल चव्हाण, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, भडगावचे तालुकाध्यक्ष सागर पाटील,…

Read More