Author: Sharad Bhalerao

महिला अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांंच्या विशेष सहभागाने जामनेर आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय जामनेर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामीण भागातील शंभरावर अधिक महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गौरी-गणपती, महालक्ष्मीसारख्या सणा-सुदीचे दिवस असतांनाही जामनेर आरोग्य विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया डॉ.जयश्री पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.समाधान वाघ यांनी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.कोमल देसले, डॉ.किरण पाटील, डॉ.चारुशीला ठाकूर, डॉ.प्रियांका बंडवाल, आशा तायडे, मीरा कांबळे, निर्मला बालोद, माया गहिरवर, सुषमा धनगर, कल्पना पालीवाल, आशा कुयटे, राजश्री पाटील, सुरेखा…

Read More

ग्रामस्थ, मित्रमंडळी, नातेवाईकांनी ‘वैभवची’ गावातून मिरवणूक काढून केले भव्य स्वागत साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : परिस्थिती संघर्ष करायला शिकवते. कष्टाची भाजी, भाकर नवनवीन अनुभव देते. अशाच शेतकरी आई-बापाच्या कष्टाच्या फळामुळे मुलाने सीमा सुरक्षा बल (BSF) कॉन्स्टेबल पदाला गवसणी घातली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना गुजरातमधील गांधीधाम येथील ग्राउंडमध्ये यशस्वी होऊन, लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवून सीमा सुरक्षा बलमध्ये निवड झालेल्या पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील वैभव ईश्वर चौधरी युवकाची ग्रामस्थ व नातेवाईकांच्यावतीने मिरवणूक काढून भव्य सत्कार करण्यात आला. ईश्वर फकीरा चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या काळ्या आईची सेवा करीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन मुलांना शिकविले. मुलगी खासगी कंपनीत इंजिनियर आहे.…

Read More

कंजरभाट समाजातर्फे अभिषेक, महाआरतीसह शोभायात्रा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राजस्थान जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथील भगवान श्री रामदेव बाबा यांच्या उपवासाची शुक्रवारी, १३ सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे. त्यानिमित्त पांडे चौकाजवळील श्री रामदेवबाबा मंदिरात पहाटे साडे पाच वाजता पंडीत ओमप्रकाश तिवारी यांच्या हस्ते श्री रामदेव बाबा मुर्तींचे अभिषेक त्यानंतर महाआरती करण्यात येणार आहे. तसेच कंजरभाट समाजातर्फे सायंकाळी साडे सात वाजता संजय गांधी नगरातील कंजरवाड्यातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. राजस्थान जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा येथील भगवान श्री रामदेव बाबा यांची भाद्रपद शुक्ल पक्ष रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसापासून भव्य यात्रा सुरु होते. या यात्रेत देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शहरातील पांडे चौकाजवळील श्री रामदेवबाबा मंदिरात महिनाभर…

Read More

कौटुंबिक वादातून खून झाल्याचा संशय, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : वरणगाव फॅक्टरीच्या क्वार्टर थ्री टाईप ४४ मध्ये एका कर्मचाऱ्याचा निर्घूणपणे खून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. खूनाच्या घटनेचे रहस्य गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने फॅक्टरीच्या वसाहतीत खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर कार्यरत प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४४) बुधवारी दुपारी लंच टाईमच्या वेळेला त्यांचे कर्मचारी निवासस्थान असलेल्या थ्री टाईप ४४ मध्ये जेवणासाठी घरी आले होते. मात्र, दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज शेजारील रहीवाशांना आल्याने त्यांनी काही वेळाने जावून पाहिले असता प्रदीप इंगळे…

Read More

भाविक महिलांना ९०० बास्केट केल्या वितरित साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : येथील जीपीएस मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दररोज विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सपत्नीक श्री गणेशाची व आरास उभारलेल्या विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविक महिलांना ९०० बास्केट वितरित केल्या. यावेळी झालेल्या भजन संध्या कार्यक्रमात ह.भ.प.मयूर महाराज, दिनेश महाराज, परमेश्वर महाराज, कृष्णा महाराज यांच्या मधुर वाणीतून भजन संध्या सादर करण्यात आली. यशस्वीतेसाठी जीपीएस मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

Read More

बालोद्यान पुन्हा सुरू करण्याची मागणी साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : शहराच्या भडगाव रोड परिसरातील उच्चभ्रू रहिवाशी भागातील आणि विशेषतः विद्यमान आमदार, माजी आमदार यांचा रहिवास असलेल्या व राजकीय केंद्रबिंदू असलेल्या प्रभागातील शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड बालोद्यानाच्या सद्यस्थितीत झालेली दुरावस्थेकडे प्रभागातील आजी- माजी नगरसेक आणि नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील पंधरा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी साकारलेल्या उद्यानाला अवकळा आली आहे. गतकाळात दिलीप वाघ आमदार व नगराध्यक्ष असतांना २०१० मध्ये त्यांनी या प्रभागातील रहिवाशी नागरिकांच्या मागणीचा विचार करून प्रभागातील (तेव्हाचा प्र. क्र.१ तर आताच प्र. क्र.८) नगरपरिषदेच्या ओपनस्पेस जागेचे सुशोभीकरण सोबतच याठिकाणी २८…

Read More

तापीवर पाडळसरेला ८४१ कोटींचा प्रकल्प, थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचविण्याची ‘संजीवनी योजना’, मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. त्यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे ८४१.७४ कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे. ज्यापद्धतीने घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळते, त्याचपद्धतीने थेट प्रत्येकाच्या शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचविण्याची ‘संजीवनी योजना’ ही संजीवनी योजना असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. हा प्रकल्प मार्गी लावून मंत्री अनिल पाटील यांनी खरोखरच शब्दपूर्ती केली आहे. त्याचा लाभ अमळनेरच नव्हे तर पारोळा, धरणगाव व चोपडा तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला…

Read More

वंचितच्या नेत्याने जाहीर पत्रक काढून केला निषेध साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत एकही विधानसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही. अशातच मलकापूर शहरात एका एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्ष नगरसेवक शहजाद खान याने वाढदिवसानिमित्त शहरात वंचित बहुजन आघाडीचे भावी आमदाराचे फलक लावल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. ‘वंचित’ने कुठलाही उमेदवार जाहीर न केल्याचे ‘वंचित’चे जिल्हा उपाध्यक्ष बाळा दामोदर यांनी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात विधानसभेसाठी आतापर्यंत उमेदवार घोषित केलेले नाही तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या आदेशाने जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले की, जिल्ह्यातील घाटाखालील तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा महासचिव हे पद खालीच…

Read More

वाघोड येथील वारकरी मेळाव्यात संतांचे प्रतिपादन साईमत/रावेर/प्रतिनिधी : समाजाला योग्य दिशा आणि संस्कार संतच देत असतात. जेव्हा जेव्हा समाज भरकट असतो तेव्हा तेव्हा संत समाज प्रबोधन करून समाजाला योग्य दिशा देतात. धर्म आणि संस्कार टिकवण्याचे जबाबदारी सर्वांची आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या जोडीने राष्ट्र मजबूत होऊ शकतो, असा सूर वारकरी मेळाव्यात संतांच्या मार्गदर्शनातून समोर आल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील यांनी सांगतले. ह.भ.प.संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वारकरी मेळावा, सद्गुरु श्री कुवरस्वामी वाघोड, ता. रावेर येथे आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुनील नेवे होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ह.भ. प.सुभाष महाराज पातोंडी, ह. भ.प. दुर्गादास…

Read More

स.पो.अधीक्षकांनी गणेश मंडळाला दिली धावती भेट साईमत/निंभोरा बु., ता.रावेर/प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत विवरा निंभोरा बु. आदी गावाच्या गणपती उत्सव मंडळाला पोलीस सहाय्यक अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस स्टा‌फ, होमगार्ड यांनी निंभोरा व विवरा यासह गावांमध्ये पथसंचलन करत गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या. शांततेत व उत्साहात सण साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी तानाजी मालुसरे गणपती उत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी आरती करण्याचा मान मंडळातर्फे सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांना देण्यात आला. तसेच भवानी चौकातील जय भवानी गणेश उत्सव मंडळालाही धावती भेट सर्व स्टाफकडून देण्यात…

Read More