Author: Sharad Bhalerao

मराठी विषयाच्या चर्चासत्राप्रसंगी प्रा. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : मानवी जीवनातले साहित्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये साहित्यातून प्रतिबिंबीत होता. त्या अनुषंगाने साहित्य हे मानवी जीवनात मूल्यवर्धनाचे काम करत असते. माणसाला व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचे बळ हीच मूल्ये आपल्याला देतात, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांनी केले. येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या चर्चासत्राप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ होते. याप्रसंगी विचारधारा प्रशाळेचे…

Read More

कार्यकर्त्यांशी संवादात युवानेते अब्दुल समीर यांचे आवाहन साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे हात बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी केले आहे. शिवसेनेच्या गाव संवाद दौरा अभियान अंतर्गत अब्दुल समीर यांनी तालुक्यातील विविध गावात भेटी देवून येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, उपसभापती कृउपा दारासिंग चव्हाण, नॅशनल सूतगिरणीचे संचालक मारुती वराडे, विठ्ठल सपकाळ, शहरप्रमुख संतोष बोडखे, राजू गौर, अकिल देशमुख, सावळदबारा सरपंच शिवाप्पा चोपडे, नगरसेवक अक्षय काळे, राजु दुतोंडे, सांडू तडवी, मोहंमद आरिफ, रुपेश जैस्वाल, राहुल महाजन, सुनील दुधे, हर्षल देशमुख, सरपंच सुरेश…

Read More

मूक अभिनय करून नागरिकांचे मन हेलावणारे केले नाट्य साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ढोलताशा व लेझिमच्या गजरात गणरायाला निरोप दिला. शाळेची मिरवणूक सोयगाव शहरातील दुर्गा भवानी मंदिर येथून प्रयाण होऊन मार्गे जुना बाजार चौक, महर्षी वाल्मिकी मंदिर, छत्रपती शिवाजीमहाराज चौकातून बेलेश्वर नाल्यात गणपती बाप्पाचे विसर्जन केले. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी ढोल पथक, लेझिमच्या तालात नृत्य केले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्रातील क्रांतिकारक यांचा पेहराव केलेला होता. जल सुरक्षा व बेटी बचाव यावर मूक अभिनय करून शहरातील नागरिकांचे मन हेलावणारे नाट्य केले. मिरवणुकीत संस्थेचे संचालक शिवदीप रंगनाथराव काळे, रवींद्र काळे, विजय गव्हाड, कृष्णा जुनघरे, संस्थेचे प्रतिनिधी प्रा. कमलेश काळे, शाळेचे…

Read More

रेडक्रॉस सोसायटीतर्फे सन्मानपत्रासह स्मृतिचिन्ह देऊन प्रतिष्ठानचा सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रजत महोत्सवी जयंती वर्ष व छत्रपती राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष यानिमित्त समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल रेडक्रॉस सोसायटीतर्फे सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदात्यांनाही पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. शिबिरात कवी किशोर नेवे यांनी ६५ वे रक्तदान केले. यावेळी किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी, रेडक्रॉस सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. उज्ज्वला वर्मा, डॉ. राजेश सुरळकर, डॉ.उल्हास तासखेडकर, तिलोत्तम जोशी, किरण बाविस्कर, महोत्सव समितीचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव…

Read More

खजिनदारपदी मनीष पाटील यांची निवड साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील जळगाव रस्त्यालगत स्थित प्रकाश नगरातील सप्तश्रुंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळ मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत देवीची स्थापना करण्यासोबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश बाबुराव सोनार, उपाध्यक्ष प्रसाद संजय पाटील, सचिव ॲड.आशुतोष चंदले, सहसचिव मनोज महाजन, खजिनदार मनीष पाटील, सल्लागार अविनाश मराठे, सहसल्लागार उदय पाटील यांच्यासह सदस्यांचा निवडीत समावेश आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More

कंपोझ खत तयार करुन प्रतिष्ठानद्वारे लावलेल्या वृक्षांना देणार साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील नगरपालिकेच्या चौकात मंत्री गिरीष महाजन, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, आतिष झाल्टे तसेच सर्व माजी नगरसेवक यांच्या उपास्थितीत निर्मात्य संकलनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी बैठकीचे ‘श्री’ सदस्य उपस्थित होते. जामनेर शहरात निर्माल्य संकलनासाठी दोन गटात विभाजन होते. सकाळी १० ते ६ व सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यत अशी श्रीसेवा आठ ठिकाणी स्टॉल लावून प्रत्येक ठिकाणी साधारणत ३० ‘श्री’ सदस्य उपस्थित राहणार आहेत. गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून अतिशय नम्रतेने निर्माल्य घेऊन ते कलशांमध्ये संकलित करतात. ते निर्माल्य टाकळी येथे 6×6 चा मोठा खड्डा तयार केलेला आहे. त्यात कंपोझ…

Read More

खेळाडूंनी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पध्दतीने प्रवेश नोंदविण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे ३० सप्टेंबरपासून आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे स्पर्धा ४ ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या अधिपत्याखाली दरवर्षी पाच राज्य स्पर्धा घेण्यात येतात. त्यापैकी ही ह्या वर्षाची चौथी स्पर्धा आहे. विविध सात गटात मुले आणि मुली ह्यांच्यात सामने होतील. मिडजेट, कॅडेट, सब ज्युनियर, ज्युनियर, युथ, पुरुष व महिला अशा विविध गटात राज्यातील एकूण जवळपास आठशे मुले, मुली, पुरुष, महिला खेळाडू सहभागी होतील. सर्व गटातील विजयी, उपविजयी तसेच उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत पात्र खेळाडूंना राज्य असोसिएशनने दिलेल्या तक्त्यानुसार…

Read More

पारोळा तालुक्यातील शिवरेतील घटना साईमत/पारोळा/प्रतिनिधी तालुक्यातील शिवरे येथे गणेशोत्सवनिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडारा देण्यात आला. त्यातून शाळेतील ७० विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली. त्यात १२ ते १५ वयोगटातील एकूण ७० विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या…

Read More

मतदारसंघात अवैध व्यवसाय बोकाळले तर, मुली- महिलांची सुरक्षा ऐरणीवर ! नगरदेवळा येथील शेतकरी मेळाव्यात जनतेची सेवा करण्याचे अभिवचन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : माझे वडील तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदार संघाचा समग्र विकास करणे हाच माझा संकल्प असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी नगरदेवळा येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला.शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात आली या निमित्ताने नगरदेवळा येथील पाटील मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर वैशालीताई सूर्यवंशी, केळी तज्ज्ञ राहुल भारंबे, उध्दव मराठे, रमेश बाफना, राजेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, बाळु पाटील, अरुण पाटील, ॲड. अभय…

Read More

जामनेरला इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या श्रीगणरायांचे विसर्जन साईमत।जामनेर।प्रतिनिधी। इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय गणेशोत्सवानिमित्त सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला. सुरवातीस श्री आरती तथा पूजन इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिव किशोर महाजन, संचालक गुरुजी विष्णू पाटील, संजय महाजन, के.व्ही.महाजन, भगवान बेनाडे, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, ज्येष्ठ शिक्षक प्रा.डी.झेड.गायकवाड, कला समन्वयक प्रा.विजय पाटील, शालेय सांस्कृतिक समिती अध्यक्षा प्रा.सविता महाजन तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी तथा शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी गणेश भक्तांची उपस्थिती होती. त्यानंतर डीजेच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांनी नाचत गाजत बाप्पांना विसर्जन मिरवणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाघूर बॅक…

Read More