Author: Sharad Bhalerao

टोलची तोड-फोड करून टोल बंद करण्याच्या सूचना साईमत।पारोळा।प्रतिनिधी। सबगव्हाण टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या आत पारोळा शहरासह सभोवतालील ग्रामीण भाग हे कार्यक्षेत्र येते. येथे दैनंदिन शालेय-महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, दैनंदिन रुग्ण, आपला उदरनिर्वाह भागविणारे कामगार, वाहन चालक ये-जा करतात. त्यात टोलच्या दरामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खिशाला कैची लागते. त्यामुळे हा टोलनाका सुरु झाल्यापासून दैनंदिन नागरिकांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन प्रवास करणारे वाहन धारक हे स्थानिक असल्याचे आवश्यक ते पुरावे सादर करीत असतात. परंतु तरीही टोलव्यवस्थापकाचा मनमानी कारभारामुळे टोलदर हा भरावाच लागतो. आज या रस्त्यावर दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन धारक यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील…

Read More

मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख पारितोषिकासह पुस्तक देऊन सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्व. बाबासाहेब के.नारखेडे स्मृतीप्रित्यर्थ नुकत्याच शिक्षकांसाठी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक, कवी आर. डी. कोळी यांच्या ‘चला, मैत्री करू या पुस्तकांशी…!’ या कवितेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख पारितोषिक व पुस्तक देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. यापूर्वी श्री.कोळी यांच्या ‘बाप’ या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आर. डी. कोळी हे समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. गेल्या दहा वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी साहित्य कट्टा, पुस्तक प्रदर्शन, फिरते वाचनालय, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, प्रश्नामंजुषा…

Read More

चोरीस गेलेल्या एक लाख ३५ हजाराच्या दोन मोटार सायकली जप्त साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। शहरातील घाट रोड, छाजेड ऑईल मिल परिसरातून गेल्या १३ सप्टेंबर २०२४ रोजी मोटार सायकल चोरीला गेली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोटार सायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील दोन सराईत भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. सविस्तर असे की, फिर्यादी मुबशीर खान मेहमुद खान (वय-२७, रा. घाट रोड, छाजेड ऑईल मिल परिसर, चाळीसगाव) यांनी २० सप्टेंबर रोजी त्यांच्या मालकीची ६५ हजार रुपये किंमतीची सुझुकी कंपनीची बरमॅन स्टीट मॉडेलची मॅट काळया रंगाची मोटार सायकल (क्र. एमएच-१९ ईसी-०५८२) ही १३ सप्टेंबर…

Read More

दोघांना अटक, तीन लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त साईमत।चोपडा।प्रतिनिधी। तालुक्यातील उमर्टी ते हातेड रस्त्यावरील पाटचारीजवळ चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत दोन जणांकडून तब्बल सात गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि दुचाकी असा तीन लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दिली. सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील उमर्टी ते हातेड रस्त्यावर दोन संशयित आरोपी दुचाकीवरून अवैधपणे गावठी पिस्तुलांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता…

Read More

सभेत रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा साईमत/जामनेर/प्रतिनिधी जामनेर विधानसभा मतदार संघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘तुतारी’ आम्ही दिलीप खोडपे सर यांच्यात हातात दिल्याची घोषणा मी करतो, असे सांगून रा.काँ. (एस.पी.गट) ची खोडपे सरांना उमेदवारी जाहीर करण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. जामनेर येथे रा.काँ.ची विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित शिवराज्य यात्रेच्या जाहीर सभेच्या कार्यक्रमात शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी ही घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिवराज्य यात्रेच्या निमित्त आयोजित सभेत प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते दिलीप खोडपे सर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यातच त्यांची जामनेरमधील उमेदवारीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. जयंत…

Read More

निर्मल सीडस्‌ला शिवसेना-उबाठातर्फे भव्य स्वागत साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वागत केले. आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यात आले आहेत. ही यात्रा चाळीसगावला होती. त्यानंतर तेथील सभा आटोपल्यानंतर यात्रा जामनेरकडे जात असतांना पाचोरा येथील निर्मल सीडस्‌ येथे शिवसेना-उबाठाच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापक सुरेश पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे स्वागत केले. यांची होती उपस्थिती याप्रसंगी रा.काँ.चे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्याथी…

Read More

महायुती सरकार हद्दपार करा : खा.अमोल कोल्हे साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। शहराच्या भडगाव रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जळगावात जिल्ह्यात पाच मतदार संघांत जनतेशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद यात्रेचे नियोजन केले आहे. शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव, पारोळा, जामनेर येथे यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही यात्रा चाळीसगावचा कार्यक्रम आटोपून पाचोरामार्गे जामनेर जाणार असल्याने माजी आमदार दिलीप वाघ यांनी यात्रेत सहभागी प्रदेशाध्यक्ष, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह पक्षांचे महत्वाचे पदाधिकारी यांचे स्वागत करण्यासाठी भडगाव रस्त्यावरील मुख्य चौकात थोड्या वेळासाठी जिल्हाध्यक्ष यांना विनंती करून पाचोरा तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा पक्षातर्फे स्वागत कार्यक्रम आयोजित केला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

Read More

अडीअडचणी समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याच्या दिल्या सूचना साईमत/यावल/प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची नियोजनबद्ध जय्यत तयारी सुरू झाली आहे. शक्ती केंद्र प्रमुखांनी आपापल्या गावासह शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या काय समस्या, अडीअडचणी आहेत, त्या जाणून घ्या, अशा सूचना गुजरात राज्यातील पूर्व मंत्री विनोदी मोरडिया यांनी शक्ती प्रमुखांना दिल्या. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी, २१ सप्टेंबर २०२४ रोजी शक्ती प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक गुजरात राज्यातील पूर्व मंत्री विनोद मोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. रावेर विधानसभेच्या तयारीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपल्या बूथवरती जाऊन कसे काम करायचे…? काय काय कामे करावे…? आदी माहिती सांगताना मतदारांच्या…

Read More

स्वत:चा फोटो असलेला ‘पोट्रेट’ देऊन तहसीलदार भारावल्या साईमत/भुसावळ/प्रतिनिधी तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत नीता लबडे यांचा उत्कृष्ट तहसीलदार म्हणून नुकताच सन्मान केला होता. याबद्दल भुसावळ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने निता लबडे यांचा तहसील कार्यालयात त्यांना त्यांच्या फोटोचे ‘पोट्रेट’ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांनी त्यांचे स्वतःचे ‘पोट्रेट’ पाहून भारावून गेल्या होत्या. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, जळगाव जिल्हा सचिव सुनील अंभोरे, रावेर विभागीय अध्यक्ष संतोष माळी, कैलास उपाध्याय, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, संघटक ईश्वर…

Read More

जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहसंमेलनाचा लुटला आनंद साईमत।चोपडा।प्रतिनिधी। येथील प्रताप विद्यामंदिर येथील १९९१ ते १९९२ यावर्षी बारावी सायन्सला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहसंमेलनाचा अनोखा सोहळा अत्यंत आनंदमयी वातावरणात चोपडा येथील हॉटेल योगानंद येथे नुकताच पार पडला. यावेळी केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्या वेळचे प्राध्यापकही उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त प्रा. डॉ.एस.बी. कुलकर्णी, सेवानिवृत्त प्रा.ए.डी.माळी, सेवानिवृत्त प्रा.एच.ए.पाटील, सेवानिवृत्त प्रा.आर.ए.पाटील, दोंडाईचा कॉलेजचे प्राचार्य डॉ.पी.एस.लोहार, सेवानिवृत्त प्रा.एस.एस.जैन, सध्या प्रताप विद्या मंदिराचे प्राचार्य पद भूषवत असलेले गुजराथी सर, प्रा.डी.एस.पाटील आदींसह जवळपास २३ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापकांनी त्यांचे अनुभव सांगुन मार्गदर्शन केले.…

Read More