Author: Sharad Bhalerao

जामनेरात नागरी सत्कार कार्यक्रमात मंत्री गिरीष महाजन यांचे प्रतिपादन साईमत।जामनेर।प्रतिनिधी। सरकारच्यावतीने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोहरागड येथे ७०० कोटींचे विकास कामे, मुंबई येथे बंजारा समाज कल्याण भवन आणि गोरबंजारा साहित्य अकादमीचे कामही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनेही बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना केली आहे. यानिमित्त सकल बंजारा व लमाण समाजाच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला. हा सत्कार विनम्रतापूर्वक स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे सत्काराला उत्तर देताना मंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले. बंजारा आणि लमाण समाजातर्फे जामनेरातील शिवाजी नगरातील एकलव्य माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ना.गिरीष महाजन यांचा रविवारी भव्य नागरी सत्कार…

Read More

मंत्री गिरीष महाजनांचा खडसेंवर पलटवार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जामनेर येथील शनिवारी झालेल्या रा.काँ.च्या जाहीर सभेत आ.एकनाथराव खडसे यांनी भाजपा प्रवेशासंदर्भात केलेले वक्तव्य तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात रविवारी, २२ रोजी मंत्री गिरीष महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एक वेळ येईल तेव्हा मी त्यांचा सर्व हिशोब चुकता करेल, असा पलटवार मंत्री महाजन यांनी केला आहे. मंत्री महाजन पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी राजकारणात एवढी लाचारी पहिल्यांदा पाहत आहे. अशा मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेत्याची अशी लाचारी अतिशय लाजीरवाणा हा विषय आहे. त्याची मला खंत वाटते. एकीकडे म्हणता भाजपाचा प्रचार केला. दुसरीकडे ते रा.काँ.चे आमदार…

Read More

जरंडीला जलजीवन मिशन योजना वांध्यात साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : जलजीवन योजनेत उभारण्यात येत असलेल्या ७० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभासाठी केवळ सहा ते आठ मी.मी.च्या आसारीवर बांधकामाचा पाया रचण्यात येत असल्याचा प्रकार रविवारी ग्रामस्थांनी जरंडी येथे उघडकीस आणला आहे. दरम्यान, जलकुंभाच्या अर्धवट झालेल्या कामावर पाणीही मारले जात नाही. त्यामुळे हा जलकुंभ उभा होण्याच्या आधीच अडचणीत आला आहे. संबंधित ठेकेदार केवळ ‘बोल बच्चन’ गप्पा मारत आहे. जरंडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत गावाच्या शुद्ध पाणी पुरवठासाठी जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन ही मोठी योजना मंजूर केली आहे. मात्र, योजनेचा जलकुंभाच्या कामात ठेकेदाराकडून हात आखडता घेऊन बांधकाम सुरू आहे. सत्तर हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या कामासाठी गावठी रेती…

Read More

डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांचा रा.काँ.पक्षात प्रवेश पंढरीनाथ पाटील जामनेर: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, मेहबूब शेख, आ.एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा २१ सप्टेंबर रोजी पार पडला. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डी.के पाटील, सुभाष बोहरा (राजू काका), डॉ. प्रशांत पाटील, सौ.वंदना चौधरी, व्ही.पी.पाटील सर, डॉ. मनोहर पाटील यांच्या अथक प्रयत्न आणि मेहनतीने व त्यागाच्या भूमिकेमुळे खोडपे सरांचा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कारण याच तालुकास्तरावरील नेत्यांचा जामनेर विधानसभा निवडणुकीत प्रमुख…

Read More

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : पाच वर्षांत कावळ्यांची लक्षणीय घट साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी कावळ्यांचे स्मरण होते. मात्र, मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे. सोयगाव तालुक्यात पितृपक्षात कावळ्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे. तालुक्यात काही परिसरात बागायती क्षेत्र असल्याने पूर्वीच्या काळात पक्ष्यांची व कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र, गेल्या पाच ते सात वर्षांपासून पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. मानवाचे निसर्गावर अतिक्रमण, बदलती जीवनशैली आणि वातावरणात बदलामुळे कावळ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे कावळ्यांचे दर्शनच दुर्लभ झाले आहे. स्वच्छतादूत म्हणून ओळख नैसर्गिक स्वच्छतादूत असणारे कावळे पर्यावरणाची साखळी चालविण्यासाठी अत्यावश्यक असून, कावळा हा सर्व पक्ष्यांमध्ये…

Read More

एलसीबीच्या पथकाकडून तपासाला सुरुवात साईमत।अमळनेर।प्रतिनिधी। शहरातील गांधलीपुरा भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्ह्याचा शोध घेण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शीतल जय घोगले (वय २८, रा. गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका मोकळ्या जागेच्या आवारात शीतल घोगले या महिलेचा मृतदेह रविवारी, २२ सप्टेंबर…

Read More

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आ. एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी जीवनात खेळाचे खूप महत्त्व आहे. निकोप शरीरातच निकोप मन असते. खेळामुळे शरीर व मन दोघे स्वस्थ राहून मन व बुद्धीचा विकास होतो. खेळामुळे मनोरंजन तर होतेच. शिवाय मनाची एकाग्रता साधता येते. त्यामुळे खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. निरोगी शरीरासाठी नियमित व्यायामासोबत खेळ खेळणे आवश्यक आहे. खेळांमुळे शिस्त, परिश्रम,संघभावना,नेतृत्व यासारखे गुण विकसित होऊन यशस्वी जीवनाचा पाया रोवला जातो. म्हणूनच जीवनात क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्राविण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे यांनी केले. निमखेडी खुर्द येथील नवीन…

Read More

यावलला साने गुरुजी विद्यालयाजवळ घडली घटना साईमत/यावल/प्रतिनिधी : शहरातील गाडगेनगर भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या घरात विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी, २२ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, येथील यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागील गाडगेनगर वस्तीत राहणारी निर्मलाबाई शंकर वडर (वय ५६) यांना रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातच त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मध्यभागी विषारी सापाने दंश केला. तेव्हा त्या तात्काळ बेशुद्ध पडत्या.कुटूंबातील मंडळीच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांना रहिवाशांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉ.प्रशांत जावळे…

Read More

भोणेतील जि. प. शाळेत पालकमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल रूमचे लोकार्पण साईमत।धरणगाव ।प्रतिनिधी। ग्रामस्थांची साथ आणि शिक्षकांची मेहनत असेल तर शाळेसह गावाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान शाळेच्या सर्वांगिण विकासाठी वरदान ठरत आहे. शाळा हे ज्ञान मंदिर असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांना सुविधांची कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे लोकार्पण स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांनीनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले.…

Read More

‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल गौरव साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश साहेबराव सूर्यवंशी लिखित व नाशिक येथील ज्ञानसिंधु प्रकाशनद्वारा प्रकाशित झालेल्या माझी शाळा… माझा उपक्रम ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. याबद्दल जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा आदर्श उपक्रमशील प्राध्यापक सुनील निकम आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रा.डॉ.माधुरी निकम यांनी सपत्नीक नुकताच सत्कार केला. याप्रसंगी समृध्दी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, संस्थापक-सचिव दिनेश चव्हाण, संस्थापक सहसचिव महेंद्र पवार उपस्थित होते.

Read More