निरीक्षकांच्या उपस्थितीत लॉटरी सोडतीव्दारे इन-कॅमेरा ७६१ लाभार्थ्याची निवड साईमत। जळगाव।प्रतिनिधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज मागविले होते त्यात एकूण ११७७पात्र अर्ज होते. त्यातून लॉटरी सोडतीतून ७६१ जणांची निवड करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे,त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात…
Author: Sharad Bhalerao
कामगारांचे शिष्टमंडळ उद्या सहकार आयुक्तांना भेटणार साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी कारखान्यातील कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी संघर्षाचा पावित्रा घेतला आहे. कारखान्यातील कामगारांचे शिष्टमंडळ राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेण्यासाठी उद्या पुण्याला जात आहेत. तेथे काय चर्चा होते. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे मधुकरच्या राष्ट्रीय कामगार संघटनेचे सचिव सुनील कोलते यांनी दै. ‘साईमत’ला सांगितले. श्री.कोलते यांनी सांगितले की, मधुकर साखर कारखाना घाईघाईत विकला गेला असून त्यामुळे एक हजार २०० कामगार देशोधडीला लागले आहे. कामगारांची घामाची देणी देण्यापूर्वीच कारखाना विकून टाकला गेला. कामगारांचे तीन वर्षांचे वेतन थकलेले असून वेतनासह भविष्य निर्वाह निधी व इतर अशी ५२ कोटींची रक्कम…
ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी राजकीय दबाव प्रभावाचा प्रयत्न साईमत/यावल/प्रतिनिधी : शहरात खुलेआम अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह महसूल पथकाने पकडल्याने राजकारणात, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव आणि प्रभाव आणून ट्रॅक्टर सोडवू टाकू, असेही दबक्या आवाजात चर्चिले जात आहे. यावल शहरात साई ॲक्वा पाणी लघु उद्योग फॉर्मजवळ २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दीड ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. ट्रॅक्टरवर काही कारणांनी डबल दंडाची कारवाई होणार असल्याचे शहरात चर्चिले जात आहे. वाहन यावल तहसील…
गोंडखेलला मंगळवारी अंत्यसंस्कार होणार साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील गोंडखेल येथील प्रगतशील शेतकरी तथा अण्णा हजारे यांचे समर्थक जयराम लक्ष्मण पाटील (वय ७६) यांचे सोमवारी, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी, २४ रोजी सकाळी १० वाजता गोंडखेल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते अजय, विजय पाटील यांचे वडील होत.
शहरात कुत्र्यांचा हैदोस, नगरपालिकेचे दुर्लक्ष साईमत/यावल/प्रतिनिधी : शहरात जुन्या भुसावळ नाक्याजवळ माजी नगराध्यक्ष शिर्के यांच्या घराजवळ बीएसएनएल कार्यालयासमोर मोकाट श्वानांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन जणांना चावा घेतला. त्यामुळे संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या भुसावळ नाक्याजवळ माजी नगराध्यक्ष शिर्के यांच्या घराजवळ बीएसएनएल कार्यालयासमोर प्रशांत मनोहर बर्गे (वय ४२), माऊ मयूर कानडे (वय ६), राजू बळवंत देशमुख (वय ४८) अशा तीन जणांना त्या भागातील मोकाट श्वानांनी चावा घेतला. त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरू केला आहे. यावल शहरात ठिकठिकाणी मोकाट श्वान आले कुठून..? मोकाट श्वान हे मोटर सायकल चालकांच्या मागे सुसाट वेगाने धावून चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नगरपालिकेने तात्काळ कारवाई…
आंदोलकांनी पोलीस निरीक्षकांना दिले मागण्यांचे निवेदन साईमत।चोपडा।प्रतिनिधी। तालुक्यातील सकल धनगर समाजाने त्यांच्या जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एस टी) अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी ११:३० वाजता येथील तिरंगा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज जमातीच्यावतीने, अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर येथे समाज बांधव १५ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. शासनाने अद्यापही त्यांची दखल घेतलेली दिसून येत नाही. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी व तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने महात्मा गांधी उद्यानाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांमार्फत पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, मोर्या क्रांतीचे आर.सी.भालेराव, चोसाकाचे व्हा.चेअरमन गोपाल धनगर, अरुण…
स्वयंसेवकांना ‘माय भारत’चा लोगोच्या टोपीचे वाटप साईमत/बोदवड/प्रतिनिधी : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टीक मुक्त महाविद्यालय- प्लास्टीकमुक्त भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. अभियानाची सुरुवात रासेयोच्या लक्ष गीताने तर उद्घाटन स्वयंसेवकांना स्वच्छतेचे साहित्य देऊन करण्यात आले. याप्रसंगी स्वयंसेवकांना ‘माय भारत’चा लोगो असलेले टोपी वाटप करून स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसर, महाविद्यालय ते तहसील कार्यालय परिसरातील स्वच्छता करून ४६ किलो प्लास्टीक कचरा जमा करून नगरपंचयातीच्या कचरा गाडीत पुढील विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हा संदेश गावातील नागरिकांना दिला. उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ११० स्वयंसेवक उपस्थित होते.…
अमळनेर पोलिसांसह एलसीबी शाखेच्या पथकाची यशस्वी कामगिरी साईमत।जळगाव/अमळनेर।प्रतिनिधी। अमळनेर शहरात गांधलीपुरा भागात रविवारी महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा छडा अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे लावला आहे. नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर सासूच्या जागेवर सून लागू नये, तिच्या जागी आपणच लागावे म्हणून सुनेच्या नणंदेनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सविस्तर असे की, शितल जय घोगले (वय ३५, रा. मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या पती, सासू यांच्यासह राहत होत्या. रविवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान मेहतर कॉलनी…
दोन्ही बिबट्यांचे डीएनएचे नमुने नागपुरला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। तालुक्यातील गणेशपूर येथे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी वन्यप्राणी बिबट्याने कुमार अनिल नंदू मोरे (वय १४) या मुलास हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर लगेच घटनास्थळी वनविभागाची टीम दाखल झाली होती. घटनास्थळी कॅमेरे बसविण्यात आले. आजूबाजूच्या गावांमध्ये जनजागृती व हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना याबाबत सूचना दिल्या. मृत मुलाच्या वारसदार आई, वडील यांना १६ सप्टेंबर रोजी तात्काळ धनादेशाद्वारे १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वन्यप्राणी बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. सर्व उपाययोजना करूनही वन्यप्राणी बिबट नैसर्गिक अधिवासात परतत नसल्याने बिबट्यास जेरबंद करणे, बेशुद्ध करण्याची…
लाडशाखीय वाणी समाजाच्या महामेळाव्यात नेत्यांची भूमिका जाहीर साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी। येथील मालेगाव रस्त्यालगतच्या विशाल वंदन नगर येथे रविवारी, २२ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळावा घेण्यात आला. मेळाव्यात व्यासपीठावरील उपस्थित नेते मंडळीपैकी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. त्यात गोविंद शिरोळे यांनी “पारोळा” व मयूर अलई यांनी “नाशिक पश्चिम” विधानसभा मतदार संघातून राजकीय पक्षाने उमेदवारी न दिल्यास “अपक्ष” म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. शिरोळे यांनी गेल्यावेळी पारोळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती, असे त्यांनी सांगितले. रेखाताई कोतकर (नाशिक) यांनी मुलीचा विवाह झाल्यावर मुलीच्या आईने मुलीची मैत्रीण न बनता मुलीला सासूची मैत्रीण बनू द्या, असा सल्ला देऊन मुलीच्या वैवाहिक…