सहकार क्षेत्रात नावलौकीक प्राप्त…! मधुकर कारखान्याची शोकांतिका… भाग १ सुरेश उज्जैनवाल यावल तालुक्यातील न्हावी येथील ‘मधुकर सहकारी कारखान्याचे कामगार थकीत वेतन प्रश्नी संघर्षाच्या पावित्र्यात’ अशा आशाचे वृत्त दै.’साईमत’ने ठळकपणे प्रसिध्द केल्यानंतर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एकच चर्चा सुरु झाली आहे. सहकार क्षेत्रावर ज्यांची निष्ठा आहे अशा जाणकारांनी यासंदर्भात प्रश्न निर्माण केले आहे. त्यात अखंडीतपणे तब्बल ४२ वर्षे गाळप करुन लौकीकास पात्र ठरलेला आणि नियमित व्याजासह कर्जफेड करणारा उत्तम स्थितीतील कारखाना बंद पडणे आणि केवळ ५६ कोटींच्या थकीत कर्ज प्रकरणी अवघ्या दोन वर्षात विक्री व्हावा, त्याचे आश्चर्य ही सहकार क्षेत्रात व्यक्त केले जात आहे. हजारो कामगार व त्यांचे कुटुंबियांचा आधार तसेच यावल,…
Author: Sharad Bhalerao
सहा जणांना अटक, एक लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त साईमत/रावेर/प्रतिनिधी : मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हारजीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रावेर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रावेर शहरातील सुमन नगरातील दत्तू डिगांबर कोळी यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हार जीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करत असल्याची…
रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/रावेर/प्रतिनिधी : तालुक्यातील कुसुंबा येथील पाझर तलावानजिक झालेल्या बकऱ्या चोरीचा शोध पोलीस लावला आहे. याप्रकरणी कुसुंबा येथील चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सतरा हजार रुपये किमतीच्या बकऱ्या हस्तगत केल्या आहेत. मुंजलवाडी येथील मेंढपाळ गोपाल अर्जुन पिसाळ हे त्यांच्या मालकीच्या बकऱ्या कुसुंबा बु. गावी पाझर तलावाजवळ जंगलात चारत असतांना तीन बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला निर्देश दिले. पोलीस पथक मुंजलवाडी, कुसुंबा, लालमाती रसलपूर, अभोडा परिसरात पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुप्त माहिती मिळाल्याने शोध पथकाने तालुक्यातील कुसुंबा खुर्द…
वाहनासह मुद्देमाल जप्त, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, वितरण आणि साठा करणे तसेच वाहतुकीस प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थासह गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करण्यासाठी वाहतूक करतांना दोन आरोपींविरुध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोघे संशयितांना मुद्देमाल, वाहनासह ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अनिल ओंकार पाटील (वय ४० रा.शिवाजीनगर, जळगाव), रोहीत मुकेश बरकले (वय २२, रा.शिवपूर, ता.भुसावळ) हे सुगंधित तंबाखु व गुटखा हा त्यांच्या कब्जात बाळगुन पुरवठा करण्यासाठी वाहतूक करीत असल्याबाबतची गोपनिय बातमी सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ दोघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्याकामी…
मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश, आठवडाभरातच प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया होणार साईमत।अमळनेर।प्रतिनिधी। येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या परिसर विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी मुंबई येथे २४ रोजी सह्याद्री विश्रामगृहात विशेष बैठक घेतली होती, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. निधी प्राप्तीसाठी मंत्री अनिल पाटील यांनी शासनाकडे मागणी पत्र दिले होते. सुरवातीला ७ फेब्रुवारी २०२३ रोजी उपुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर २७ जुलै २०२३ रोजी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री ना.गिरीष महाजन यांना २५ कोटींच्या प्रस्तावाबाबत पत्र दिले होते. त्यानंतरही…
स्थानिक रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले हरकतीचे निवेदन साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। गेल्या दहा वर्षांपासून प्रभाग क्रमांक ९ मध्ये विकासाची कामे थांबलेली आहेत. त्यातच प्रभागात काही स्थानिक समाज बांधवांनी खुल्या भूखंड हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी आक्षेप नोंदवत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना हरकतीचे निवेदन दिले आहे. पाचोरा नगर पालिका हद्यीतील अकृषक सर्वे नं. ४३/१/अ/१ब मध्ये शेकडो प्लॉट धारक आहेत. नगर परिषदेने भुखंडातील खुला भुखंड हा विकसित करण्याचे ठरविले आहे. तो नगरपरिषदेने विकसित करावा. जागेवर भुखंड हा कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्तींना दिला जावू नये, त्यावर कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक मंदीर, मस्जीद, स्तुप, वगैरेसाठी देण्यात येवू नये. भुखंड हा काही व्यक्ती तेथील नागरिक असल्याचे व…
गटविकास अधिकारी दवाखान्यात साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील पंचायत समिती विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ लाभार्थींना मिळत नसून ग्रामसभेतील मंजुरी यादी घेतली जात नाही. घरकुले, गोठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पंचायत समितीत पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा गटविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोप करीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी २४ सप्टेंबर सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी राज्य सचिवांची बैठक न घेता ग्रामसेवकांची बैठक घेत आहेत, असा टोला आ.चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये घरकुल, गोठे, एमआरइजीएस व विविध योजनांचा आढावा…
सोयगाव क्रेडिट ॲक्सेस फायनान्स कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा: निवेदनाद्वारे मागणी साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। तालुक्यातील कोल्हे येथील शरद पाटील यांच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्व. सविता शरद पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सोयगाव येथील क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक व वसूली अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय देण्यात यावा, अश्या आशयाच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील शरद पुंडलिक पाटील हे त्यांच्या पत्नी सविता व मुलगा तुषार ते एकत्र राहत होते. मागील काळात त्यांच्या शेतात पिक न आल्याने व त्यांच्या मुलीच्या लग्नाला खर्च आल्यामुळे ते कुटुंब कर्जबाजारी झाले. त्यामुळे…
सत्कार सोहळा एक संस्मरणीय क्षण ठरला साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : शहरात केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार ना. प्रतापराव जाधव आणि केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे भव्य आयोजन माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केले होते. यावेळी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने महत्त्वपूर्ण कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. संतोष शेकोकार, इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्रा. योगेश सुशीर, तसेच प्रा. जयप्रकाश सोनोने आणि प्राध्यापिका तेजल खर्चे, प्रा. मंजिरी करांडे, प्रा. माधुरी राजपूत, प्रा.…
जामनेरचे जे.बी.चौधरी यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान साईमत।जामनेर।प्रतिनिधी। छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाक्त पद्धतीने २४ सप्टेंबर १६७४ व सत्यशोधक समाजाचा वर्धापनदिन स्थापन २४ सप्टेंबर १८७३ असे दोन्ही दिवसाचे औचित्य साधून टाकळी येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम महापुरुषाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित महिलांनी महापुरुषांच्या प्रतिमा पूजन केले. नंतर सत्यशोधक समाजाच्या प्रार्थना म्हणून सुरवात करण्यात आली. उपस्थितांना जे.बी.चौधरी जामनेर यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. कार्यक्रमाला सरपंच समाधान वराडे, सारंगधर अहिरे, एम.डी.अहिरे, ग्रा.पं.सदस्य शालिग्राम अहिरे, ज्येष्ठ समाजसेवक पवन माळी, निवृत्ती तायडे, गोविंदा माळी, आनंद अहिरे, गोविंदा अहिरे, अर्जुन चवरे, लक्ष्मण तायडे, सुभाष जगताप, भगवान माळी, बापू महाले, राजू जगताप, गजानन अहिरे…