Author: Sharad Bhalerao

सोयगाव तालुका शंभर टक्के पाळला बंद साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : सोयगावसह तालुक्यात सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी शासनाच्या विरोधात निदर्शने करून सोयगाव शहर व तालुका कडकडीत बंद शंभर टक्के यशस्वी करण्यात आला. दरम्यान, दुपारी एक वाजता संतप्त मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दुपारी आंदोलक संतप्त झाल्याने सोयगावात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. सकाळी सात वाजेपासून सकल मराठा समाजाने कडकडीत बंद पुकारला होता. तालुक्यासह ग्रामीण भागातही बंदचे पडसाद उमटले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, शैक्षणिक महाविद्यालये शाळा आदींनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी शहरातील छत्रपती…

Read More

सतर्कता बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : घोसला येथे मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळली. दरम्यान घरात झोपलेल्या महिलेने सतर्कता बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ही घटना बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घोसला गावात घडली.सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने घोसला शिवारात मोठ नुकसान झाले आहे. त्यामध्ये घरात कुटुंब गाढ झोपेत असताना अशोक गडबड पाटील यांच्या घराची भिंत कोसळली आहे. दरम्यान, सुनंदाबाई पाटील या भिंतीला लागून झोपलेल्या असताना त्यांच्या अंगावर भिंत कोसळताच त्यांनी सतर्कता बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. गुरुवारी, सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत घटनेचा महसुलकडून पंचनामा झालेला नव्हता. त्यामध्ये अशोक पाटील यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मागणीस यश साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : मध्य रेल्वे अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील भुसावळ, मलकापूर व नांदुरा येथे विविध रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी नांदुरा स्टेशन येथे १२११३/१२११४ पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस, मलकापूर स्टेशन २२११७/२२११८ पुणे-अमरावती एक्सप्रेस तर सर्वात महत्वाचे भुसावळ स्टेशन येथे २२२२१/२२२२२ मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस अशा तीन गाड्यांना थांबा दिला असल्याने कळविले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मागणीस यश आले असल्याचे खडसे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.

Read More

मधुकर कारखान्याची शोकांतिका… भाग २ लोकप्रतिनिधी, माजी संचालक सर्वच गप्प कसे? सुरेश उज्जैनवाल आपल्या प्रदीर्घ वाटचालीत यावल, रावेर तालुक्याच्या वैभवात भर घालणारा तसेच आर्थिक दृष्ट्या दोन तालुक्यांसाठी आधार ठरलेला कारखाना विक्री होत असतांना किंवा विक्री प्रक्रिया पूर्ण होतांना कुणीही विरोध का केला नाही ? या दोन्ही तालुक्यातील विकासाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी तसेच कारखान्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झालेले माजी संचालक यांची कारखान्याप्रश्नी कोणतीही भूमिका नसावी, त्याचे उस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कामगार तसेच कारखान्यामुळे ज्यांचा व्यवसाय बहरला अशांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. मधुकर सहकारी कारखान्यावरील संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपुष्टात आलेली होती. मुदत संपल्यामुळे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी…

Read More

पारोळा शहरातील घटना, धुळे एसीबीची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शैक्षणिक संस्थेत नोकरी टिकवायची असेल तर प्रत्येक शिपाईला १० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा नोकरीकाळात त्रास होईल अशी धमकी देऊन लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, तक्रारदार हे नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल, पारोळा येथे २०११ पासून शिपाई पदावर कार्यरत आहे. संस्थेचे चेअरमन मिलींद मिसर यांचे भाऊ गौतम मिसर हे संस्थेच्या बॉईज हायस्कुलमध्ये उपशिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली आहे. गौतम मिसर यांनी संस्थेत कार्यरत असलेल्या तक्रारदार यांच्यासह सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावुन घेतले. त्या सर्वांना…

Read More

२८, २९ सप्टेंबर रोजी अधिवेशनाचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील जैन हिल्स येथे २८ व २९ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अधिवेशन आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा.स्मिताताई वाघ पाटील यांच्या हस्ते २८ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी ३ वाजता उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जैन इरिगेशन फाउंडेशन अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा व सत्र न्यायाधीश, आ.सुरेश भोळे, आ.किशोर पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ. शिरीष चौधरी, अमोल जावळे, डॉ.केतकी पाटील, माजी महापौर अश्विन सोनवणे आदींसह अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शाह, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक,…

Read More

प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू साईमत/जळगाव/प्रतिनधी: जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खा. ईश्वरबाबू जैन यांना बुधवारी, २५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या आर.एल. ज्वेलर्स येथे अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यांना तात्काळ आर.एल. हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Read More

आज निघणार अंत्ययात्रा साईमत/जामनेर/प्रतिनिधी  येथील प्रतिष्ठित व्यापारी कचरूलाल चंपालाल बोहरा यांचे बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पंडित मरण/निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जामनेरातील राहत्या घरापासून निघणार आहे. ते माजी नगराध्यक्ष सुभाषचंद (राजू शेठ) बोहरा, प्रवीण बोहरा यांचे मोठे बंधू तर राहुल, नरेश, मुकेश, जय, विजय यांचे मोठे वडील तसेच चंद्रकांत, अभय यांचे वडील होत.

Read More

घरासमोरच झाडेझुडपे, डासांची वाढली उत्पत्ती साईमत/जळगाव/प्रतिनिधी: पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोड जवळील सोनी नगराजवळ हुडकोकडून येणारा सांडपाण्याचा मोठा नाला आहे. हा नाला परिसरातील रहिवासी भीमराव सोनवणे यांच्या घराजवळून जात असतांना नाल्याच्या बाजूला झाडेझुडपे वाढल्याने कचरा अडकल्याने पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते आहे. घरासमोरच झाडेझुडपे, गवत वाढल्याने भीमराव सोनवणे यांच्या घरातच सर्प निघत असल्याने घरातील कुटुंबात भिती‌ निर्माण झाली आहे. सोनी नगरातील काही नागरिकांनी गटारीचे सांडपाणीसाठी पाईप टाकून भीमराव सोनवणे यांच्या घरासमोरील खुल्या प्लॉटमध्ये सांडपाणी सोडल्याने पाणीचा निचराच होत नसल्याने डबक्यात डासांची उत्पत्ती होते. सांडपाण्यामुळे घरात दुर्गंधी पसरत आहे. शहरात डेंग्यूची साथ सुरु असुन सोनी नगरात पण डेंग्यू, मलेरियाची साथ होण्याची शक्यता आहे.…

Read More

बदली न केल्यास भाजयुमोतर्फे आंदोलनाचा इशारा साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची पक्षपाती कामगिरी आणि ठराविक राजकीय पदाधिकाऱ्यांना मानाची आणि अन्य पक्षांच्या लोकांना अपमानास्पद वागणुक मिळत असल्याबद्दल पाचोरा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश ठाकूर यांनी पाचोरा डीवायएसपी कार्यालयासमोर आंदोलन करून पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करण्याचे निवेदन दिले आहे. सविस्तर असे की, पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार हे अनेक दिवसांपासून त्यांच्या पोलीस ठाणे हद्दीत राजकीय पक्षपाती धोरणाने कामकाज करीत आहेत. विविध सामाजिक वादविवाद व किरकोळ भांडण- तंटा प्रकरणी भाजपा पदाधिकारी समन्वयाची भुमिका घेतात. गावात किंवा समाजातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचल्यावर सुध्दा आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्या कर्तव्य…

Read More