चोरटे झायलो गाडीसह चोरीच्या गायी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : बनोटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास झायलो गाडीत आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोयगावमधील आमखेडा गावातून तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील चोरी केलेल्या दोन गायी झायलो गाडीत गायींना बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन धूम ठोकली. मात्र, ही घटना पिंपळगाव हरेश्वर येथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी परिसरात चोरट्यांचा तपास सुरू केला. परिसरातील इतर गावातील नागरिकांनाही याबाबत माहिती दिली. झायलो गाडीत चोरीच्या गायी कोंबून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांनी तिडका गावाजवळील पोलिसांनी नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेट उडवून भरघाव वेगाने नागद रस्त्याने निघाले. मात्र, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार राजू बर्डे,…
Author: Sharad Bhalerao
शाळा प्रशासनासह ग्रामस्थांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील पिलखेडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांत जिल्हास्तर व विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यस्तरावरील आदर्श उपक्रमाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यावरील मुल्यांकन जाहीर झालेले असून त्यात जळगाव तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे जिल्हा परिषद शाळेने प्राथमिक गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादित केले आहे. पिलखेडे…
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आ.किशोर पाटील यांना निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : येथील माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी शासनातर्फे जागा उपलब्ध करून त्या जागेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आ.किशोर पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना माऊली बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार, उपाध्यक्ष युवराज महाजन, सचिव कैलास महाजन, सहसचिव शांताराम चौधरी, खजिनदार नाना महाजन, संतोष पाटील, मन्साराम महाजन, छगन पाटील, आबा तुकाराम पाटील, चंदनसिंह तोमर, अरुण जोशी,रमेश मिस्त्री, सुनील झोपे, जगन महाजन, प्रकाश महाजन, गायकवाड आप्पा, सर्व सदस्य उपस्थित होते. आ. किशोर आप्पांनी दिले आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी मनोगतात माऊली…
भाजपाच्या बैठकीत मंत्री गिरीष महाजन यांचे एकनाथराव खडसेंना आव्हान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जिल्ह्यात विकासाची कामे ‘मी’ केले आहे. जामनेर तालुक्यात धरणांची कामे ‘मी’ केली, रस्ते ‘मी’ केले असे, ‘मी’ केले म्हणणारे एकनाथराव खडसे यांच्यात ‘मी’ पणा ठासून ठासून भरला आहे. अशा ‘मी’ पणाचे एक वेळा गर्वहरण होते. मग तुमच्या बोदवड तालुक्याला महिनाेन् महिने पाणी का मिळत नाही. अगोदर पाणीटंचाई सोडवा, मग विकासाच्या गोष्टी करा. स्वतःची ग्रामपंचायत सांभाळू न शकणारे खडसे जामनेरच्या विकासावर बोलतात ही मोठी शोकांतिका आहे. जर मला पराभूत करायचे असेल तर जामनेरातच मुक्काम ठोका आणि मला पराभूत करुन दाखवा, असे थेट आव्हान मंत्री गिरीष महाजन यांनी आ. खडसेंना दिले…
चार वर्ष पूर्ण केल्यानंतर कृषी पदवी मिळणार साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील कृषी महाविद्यालयात येथील कृषी पदवी अभ्यासक्रमात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील होते. समारंभात महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव प्रशांत नागे आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना आपला परिचय करून देतांना त्याच्याकडे असलेच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंतर्भूत केलेल्या सत्र प्रथम ते आठव्या सत्रात समाविष्ट केलेल्या विषयांची सखोल माहिती महाविद्यालयाचे विद्या शाखा प्रभारी डॉ. आर. डी. चौधरी यांनी दिली. तसेच त्यांनी प्रथम वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कृषि प्रमाणपत्र व द्वितीय वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर…
कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले संकल्प पक्के करण्याबाबत व सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे प्रा. विजय डांगे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या महत्त्वपूर्ण कार्याची चर्चा केली. त्यांनी समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा दिली. देशातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनासारख्या चळवळींची आवश्यकता स्पष्ट केली. प्रास्ताविकात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी नामदेव धुर्वे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विषद केली. स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा…
अमळनेर शहरातील सराफ बाजार भागातील घटना साईमत/अमळनेर /विशेष प्रतिनिधी : शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढायला गेलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला शिवीगाळ करत महिलांनी अंगावर इंधन ओतून घेत स्वतःला जाळुन घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून अमळनेर पोलिसात तक्रार दिली आहे. नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील सराफ बाजार भागातील नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांना नगरपरिषदेने त्यांना वेळोवेळी नोटीस बजावून ही अतिक्रमण काढले नाही. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी यांनी २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला सुरुवात केली. त्यावेळी नागराज चोरडिया, त्यांची पत्नी इंदुमती…
पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : गावातील गाव नमुना आठ ‘अ’मध्ये नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवळा येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६ ) आणि खासगी पंटर बलराम हेमराज भील (वय ४६, दोन्ही रा. खडकदेवळा बु., ता.पाचोरा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील रहिवाशी आहेते. तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ…
सुरेश उज्जैनवाल तत्कालीन लोकनेते कै.मधुकरराव चौधरी आणि सर्वच समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले तत्कालीन नेते जे.टी.दादा महाजन या दोन नेत्यांच्या कल्पकतेतून उभारला गेलेला यावल तालुक्यातील न्हावीचा मधुकर सहकारी साखर कारखाना आपल्या प्रदीर्घ वाटचालीनंतर अखेर खासगी कंपनीच्या घशात गेला. यावल, रावेर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या अर्थचक्राचा कणा ठरलेला हा सहकारी उद्योग अडचणीत का आला? त्याचे उत्तर या उद्योगाच्या गर्भातच दडलेले आहे. तथापि, वेळीच या कारखान्याला सावरण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते तर ही वेळी आली नसती. त्यामुळे ‘मधुकर’ राजकीय इच्छाशक्तीचा अभावाचा बळी ठरला आहे. सहकार क्षेत्रातील आघाडीचा हा कारखाना विक्री होणे हीच मोठी शोकांतिका आहे. साधारणपणे सन २००० पर्यंत हा कारखाना पक्षीय राजकारणापासून…
बदलीचे कारण गुलदस्तात, राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत यशवंत चौधरी यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली झाली आहे. वर्षभराच्या कालावधीतच नेमकी कोणत्या कारणामुळे बदली झाली, त्याचे कारण पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट झाले नसले तरी वर्षभरातील कारकीर्द आर्थिक देवाण – घेवाण, गुन्ह्यांचा तपास, विनाकारण शासकीय कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करणे अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची अचानक बदली झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. सविस्तर असे की, वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची आपल्या चांगल्या कारकिर्दीमुळे तब्बल साडेतीन वर्षांनी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बदली…