Author: Sharad Bhalerao

दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम साईमत/जळगाव/प्रतिनिधी: येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी -भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात प्रथम क्रमांक चेतना दिलीप सुतार, द्वितीय तृप्ती महेंद्र माळी, तृतीय तेजस्विनी शरद कंडारे, उत्तेजनार्थ पियुष युवराज मगरे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार तसेच सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पिंपरकर यांनी केले. स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक आर.डी. कोळी, आर. डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील, गणेशोत्सव समिती प्रमुख संगीता पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.डी. पाटील तर आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.

Read More

राज्यभरातील ५३५ खेळाडूंचा सहभाग निश्चित साईमत/जळगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जळगावात सोमवारी, ३० सप्टेंबरपासून आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे स्पर्धा ४ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. जळगावच्या स्पर्धेसाठी विविध गटांचे मानांकन राज्य असोसिएशनने जाहीर केले आह. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू व अर्जुन पुरस्कार मिळविणारी मधुरिका पाटकर (ठाणे) हिला महिला गटात अव्वल मानांकन मिळाले आहे. रेगन अलबुकर (पुरुष गट, मुंबई उपनगर), १९ वर्ष वयोगट मुले- कुशल चोपडा (नाशिक) मुली- अनन्या चांदे (मुंबई उपनगर), १७ वर्ष वयोगट मुली- नायशा रेवस्कर (पुणे), मुले- पार्थ मगर (मुंबई शहर), १५ वर्ष वयोगट मुले- मयुरेश सावंत…

Read More

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश साईमत/जळगाव/न.प्र. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने रावेर लोकसभा अंतर्गत बोदवड, रावेर व यावल तालुक्यातील विविध रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा ३) अंतर्गत २२ किमी लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती ना. खडसेंचे स्वीय्य सहाय्यक तुषार राणे यांनी दिली. या कामांमध्ये यावल तालुकांतर्गत कासारखेडा – किनगाव – चुंचाळे – दहीगांव–कोरपावली ते प्रजिमा १८ (लांबी ८.३४ किमी) ८३४ रुपये लाख, कोळवद–सांगवी बु.–बोरखेडा–हिंगोणा ते विटवा रस्ता (लांबी ३.१५ किमी) २७५ लाख रुपये, बोदवड तालुकांतर्गत साळशिंगी ते जलचक्र बु. ते प्रजिमा…

Read More

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार,️ पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्त्याचे श्राद्ध घालून आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. चार महिन्यांपूर्वी तयार झालेला भोकर ते पळसोद, जामोद, आमोदा बु., गाढोदा रस्ता हा कात टाकायला लागला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जळगाव ग्रामीणचे शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांना समस्या सांगितल्यावर त्यावर रस्त्याची लांबी ११.९३ किलोमीटर आहे. त्याचा एकूण खर्च ८१८.३२ लाख रुपये इतका आहे. हा रस्ता भोकर-पळसोद-जामोद-आमोदा बु.-गाढोदा असा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार केला आहे. या रस्त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे, असा संशय आम्हाला आहे. म्हणून रस्त्याची चौकशी करून कार्यकारी अभियंता प्रधान मंत्री…

Read More

रावेर-यावल मतदार संघातील उच्चशिक्षित व्यक्तीमत्त्व साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी सध्या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चेत विविध राजकीय पक्षांच्या इच्छूक, संभाव्य उमेदवारांची नावेही पुढे येत आहेत. या चर्चेतच फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांचे नावही मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. पांडुरंग सराफ एक उच्चशिक्षित व्यक्तीमत्त्व असून रावेर-यावल मतदार संघातील सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील एक विनम्र चेहरा म्हणून त्यांची या भागात ओळख निर्माण झाली आहे. फैजपुरचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याहीपेक्षा त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम दैदिप्यमान असून अनेक नवीन अभ्यासक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून सुरु केले आहेत. फैजपूर, यावल,…

Read More

३२६ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे काढले निकाली साईमत/धरणगाव/ प्रतिनिधी : येथील तालुका विधी समिती व तालुका वकील संघाच्यावतीने न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यावेळी कोर्टाचे ३२६ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आले. तसेच बँका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, नगरपालिका, बी. एस. एन. एल. यांच्याकडील ९९४ प्रकरणांपैकी ४५ प्रकरणे निकाली काढण्यात आले. अदालतीत ३३ लाख २० हजार ६४२ रूपयांची वसूली करण्यात आली. पॅनल प्रमुख म्हणून धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश अविनाश ढोके तसेच पंच म्हणून ॲड. अक्षय दवे यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.एस.शिंदे, उपाध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे, सचिव ॲड. मनोज दवे, ॲड.राहुल पारेख, ॲड.शरद माळी, ॲड.डी.ए.माळी, ॲड. संदीप सुतारे, ॲड. प्रशांत…

Read More

जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा साईमत/जामनेर/प्रतिनिधी : संचालक आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यात जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रेबीज विषयक सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना प्राणी किंवा कुत्रा लावल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळीव प्राण्यांना रेबीज लस देऊन प्राण्यांचे रेबीजपासून स्वरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात आली. पूर्वी बेंबीच्या बाजूने १४ इंजेक्शन यासाठी देण्यात येत होते. परंतु आता संशोधन होऊन साध्या इंजेक्शनप्रमाणे त्याचे ३ ते ५ डोस देण्यात येतात. डॉक्टरांनी दिलेल्यानुसार डोस पूर्ण करावे कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर…

Read More

पोस्को कायद्याअंतर्गंत तरुणाविरोधात गुन्हा दाखल साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणा विरोधात पोस्को कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या घरात मुलगी अंगावरचे कपडे बदलवित असताना मुलीच्या आईला मुलीचे पोट मोठे दिसल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईला धक्काच बसला. कारण मुलीच्या पोटात सहा महिन्याचा गर्भ असल्याचे मुलीने सांगितले. पीडित मुलीने घटनेबाबत हकीकत सांगितल्यानुसार घराशेजारील राहणारा निलेश संजु निळे या तरुणाने सात महिन्यांपूर्वी (दिवस वेळ निश्चीत माहित नाही) त्याच्या घरात मला जबरदस्तीने घरातील हॉलमध्ये नेऊन अत्याचार केला.…

Read More

सात स्पर्धेतील ३५ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : येथील धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी विभागतर्फे ‘हिंदी दिना’ निमित्त आयोजित ‘हिंदी सप्ताह’ चा समारोप समारंभात बक्षीस वितरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे हिंदी विभागातर्फे हिंदी सप्ताहानिमित्त सात दिवस निबंध, रांगोळी, मेहंदी, वादविवाद, चित्रकला, काव्यवाचन व सामान्य ज्ञान अशा विविध सात स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. सर्व स्पर्धात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३५ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिकसाठी निवड केली होती. सर्व यशस्वी विजेत्या विद्यार्थ्यांचा ‘समारोप समारंभात’ पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.हरीश नेमाडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.जगदीश पाटील…

Read More

निंभोरा येथील पोष्टमन मनोहर ठाकरे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना साईमत/निंभोरा,ता.रावेर/प्रतिनिधी : सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाचा अंत नसून कामाच्या व्यापामुळे आपल्याला जे करायला मिळाले नाही ते करण्याची संधी असल्याने आपल्या आवडीची पुस्तकांचे वाचन, आपले आवडते संगीत ऐकणे, पर्यटन, आपला छंद जोपासणे, अजून बरेच काही करण्याची संधी मानून आपले उर्वरित जीवन बहरदार ठरावे, अशा शुभेच्छा मनोहर ठाकरे यांना निंभोरा येथील माजी उपसरपंच व सरपंच संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी दिल्या. निंभोरा गावातील अत्यंत सेवाभावी पोष्टमन म्हणून परिचित असलेले मनोहर लोटू ठाकरे हे तब्बल ४२ वर्षाची अखंडित सेवा देत नियत वयोमानानुसार वयाच्या पासष्टव्यावर्षी नुकतेच निंभोरा पोष्ट ऑफिसमधून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त मनोहर…

Read More