Author: Sharad Bhalerao

अर्जुन पुरस्कारार्थी मधुरिका पाटकर, राष्ट्रीय खेळाडू स्वरदा साने यांचा गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित आमदार चषक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला.जळगावच्या एकलव्य क्रीडा संकुल येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कु. व्ही. केजो ह्यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी महापौर सीमा भोळे, प्रा. चारुदत्त गोखले, शिव छत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, माजी नगरसेवक नितीन बर्डे, असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजु खेडकर, कोषाध्यक्ष संजय शहा, रवींद्र धर्माधिकारी, सॉफ्टबॉल प्रशिक्षक किशोर चौधरी,गिरीश कुलकर्णी, अरुण गावंडे,…

Read More

सुदैवाने जीवितहानी टळली साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. पिकअप चालकाने समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी बारा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. सविस्तर असे की, कन्नड विधानसभा मतदारसंघासाठी संजना जाधव या इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने त्या मतदारसंघातील गावांना भेटीगाठी देण्यासाठी सोमवारी सकाळी घरातून निघाल्या होत्या. त्या बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गरजे या कार्यकर्त्यांसह धुळे-सोलापूर महामार्गावरून चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथून जात होत्या. यावेळी भरधाव एक पिकअप (क्र.एम. एच ४२ बी.एफ.…

Read More

पहुरला आदिवासी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन, पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी : आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतरांना समाविष्ट करू नये, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांना समाविष्ट करण्यासाठी गठीत केलेली समिती बरखास्त करून त्या समितीला दिलेले अधिकार रद्द करावेत, यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सोमवारी (ता. ३०)आदिवासी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखल्या गेला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. बसस्थानकाजवळ मोठ्या संख्येने परिसरातील आदिवासी समाज बांधवानी एकत्रित आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने आदिवासी समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा गाठ…

Read More

अनिल चौधरी यांच्यामार्फत शिबिरात शासनाच्या विविध योजनांची माहिती साईमत/निंभोरा बु., ता.रावेर/प्रतिनिधी : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पार्टीची परिवर्तन यात्रा अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निंभोरा गावात येऊन पोहचली.यात्रेचे निंभोरा ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन गरजुंना योजनांचा फायदा कसा घेता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कामगार मजुरांना, महिलांना भाड्यांचा संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी हर्षदा चौधरी यांनी महिलांना रोजगार, बचत गट यांची सविस्तर माहिती दिली. शिबिर घेण्याविषयी मार्गदर्शन केले. परिवर्तन यात्रेस लोकांचे अतुट प्रेम आणि पाठिंबा विशेष म्हणजे महिलांचा पाठिंबा जास्त प्रमाणात जाणवला. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, माताभगिनींचे बळ, प्रोत्साहन व त्यांचे प्रेम हे यात्रेला चालना देते. त्यांच्या…

Read More

स्पर्धेत सामाजिक समस्यांवर आधारित रांगोळींचा सहभाग साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’- २०२४ ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. रांगोळी स्पर्धेचा मुळ विषय जरी स्वच्छतेवर आधारित असला तरी या रांगोळी स्पर्धेत स्त्री भ्रूणहत्या, बदलापूर घटना, आत्मनिर्भर भारत आणि स्त्री सशक्तीकरण अशा अनेक वैश्विक आणि राष्ट्रीय, सामाजिक समस्यांवर आधारित रांगोळींचा स्पर्धेत सहभाग होता. संबंधित सर्व रांगोळीचे परीक्षण केल्यानंतर परीक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकात विभाजन करत त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका मृणाल काळे, रोशनी चौधरी व…

Read More

पहुरला वार्षिक सभा उत्साहात, गुणवंतांचा गौरव साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : येथील विश्वासाला पात्र ठरलेली भारत माता महिला पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात घेण्यात आली. सभेत पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंगला पवार होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. संस्थेचे संचालक मंडळ, तज्ज्ञ सल्लागार मंडळ, उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्लन व प्रतिमा पूजन करण्यात आले. अहवाल वर्षात संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, देशभक्त, नेते मंडळी, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, संत-महंत, कीर्तनकार मयत झाले असतील, अशा थोर व्यक्तींना सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेमार्फत इतर महत्त्वपूर्ण गुणगौरव व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा…

Read More

चार मतदार संघातील उमेदवारही जवळपास निश्चित साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चिती संदर्भात महाविकास आघाडी अंतर्गंत जागा वाटपाचा अंतीम निर्णय अद्याप व्हायचा आहे. तथापि, जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ जागांपैकी सहा जागांवर रा.काँ.(शरद पवार गट)ने दावा सांगितलेला आहे. एवढंच नव्हे तर सहापैकी चार जागांवरील उमेदवारही निश्चित असल्यासारखे आहेत. विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आता प्रत्येक जिल्ह्यात सुरु झाली आहे. पितृपक्ष आटोपल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान होतील. मात्र, तत्पूर्वी रा.काँ.तर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांशी तसेच निवडून येण्याची क्षमता किंवा तुल्यबळ व्यक्ती म्हणून काही नावांची पक्षांतर्गंत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रा.काँ.मध्ये जे पूर्वीपासून आहेत आणि पक्षातर्फे निवडणुका लढविल्या आहेत. तसेच पक्ष फुटीनंतर जे शरद पवारांबरोबर…

Read More

ग्रामसेवकांवर राजकीय दबाव ? विकास कामांना बसतोय खोडा साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : तालुक्यातील आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झालेल्या फुलगाव येथील ग्रामपंचायतीच्या कारभारातील राजकारण तापले असुन अपक्ष असलेले लोकनियुक्त सरपंचावर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. यामध्ये त्यांनी वर्षभराच्या कालावधीत राजकीय दबावापोटी तीन ग्रामसेवकांची बदली झाली आहे. गावातील विकास कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कारण स्पष्ट करीत आजपासून ग्रामपंचायतमध्ये उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परिसरात फुलगाव ग्रामपंचायतमधील राजकारणाचा विषय चर्चेचा ठरत आहे. तालुक्यातील माजी सैनिकांचे तसेच आदर्श गाव पुरस्कार प्राप्त असलेल्या फुलगांवच्या ग्रामपंचायतीचे राजकारण मागीलवर्षी झालेल्या निवडणुकीनंतर चांगलेच तापले आहे. मागीलवर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून…

Read More

संस्थेतर्फे केलेल्या सन्मानाने शिक्षक, कर्मचारी भारावले साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : जिल्ह्यात अग्रगण्य पाचोरा तालुका सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलने ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ अंतर्गत पाचोरा तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्थेच्यावतीने शाळेचे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा मतदारसंघांचे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तर पुणे येथील पुरोगामी विचारवंत विकास लवांडे, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, सचिव ॲड.महेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराच्या सारोळा रस्त्यावरील श्री समर्थ लॉन्स येथे रविवारी सकाळी ११ वाजता शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केला होता. तालुक्यात व जिल्ह्यात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गो.से. हायस्कूल शिक्षकांनी संस्था आणि शाळेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी घेतलेल्या परिश्रमाची सत्कार रुपात…

Read More

माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते मोफत वाटप साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सोयगाव तालुक्यातील विविध गावात युवानेते तथा माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे मोफत वाटप करण्यात आले. आनंद शिधासाठी लागणारे १०० रुपये शुल्क पालकमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्यावतीने भरण्यात आले. त्यामुळे सोयगावच्या ३८ स्वस्त धान्य दुकान अंतर्गत १३ हजार ६०० लाभार्थ्यांना गावोगावी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद शिधा वाटप करण्यात येत आहे. त्यासोबतच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना गृहपयोगी साहित्य भांडेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांना कुठलेही…

Read More