Author: Sharad Bhalerao

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा चाळीसगाव येथील समृध्दी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीश साहेबराव सूर्यवंशी यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डॉ.एन.एम. काबरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र काबरा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनात प्रदान करण्यात आला. पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेत सतीश सूर्यवंशी हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून ते विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना कृतीशील अध्यापन करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उपक्रमाचे ‘सेल्फी विथ सक्सेस’ हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते…

Read More

सुवर्णाताई स्मृती उद्यान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जलतरण तलाव नूतनीकरणासह सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय व वीज अशा पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. मात्र, त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्णताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव सुशोभीकरण प्रकल्पाचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल विकासाच्या दूरदृष्टीकोनातून आरोग्य हिताकडे चालली आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याचे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. त्यांच्या हस्ते सुवर्णाताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरणाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चाळीसगाव शहरातील…

Read More

जामनेरातील कार्यशाळेत समुपदेशक चंद्रशेखर गुलवाडे यांचे प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद साधणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय ट्रेनर चंद्रशेखर गुलवाडे यांनी केले. जामनेरातील पारसनाथ देवस्थान आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी ‘बेटीयों का सक्षमीकरण स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा त्यागी भवन, पारसनाथ देवस्थान येथे नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यासाठी बी.जे. एस. पुणेतर्फे अमरावती येथील राष्ट्रीय ट्रेनर चंद्रशेखर गुलवाडे तसेच कोल्हापूर येथील रमेश पाटील हे प्रशिक्षक म्हणून लाभले होते. कार्यशाळेत १३ ते २१ वर्ष वयोगटातील पुणे कार्यालयात नोंदणी झालेल्या ३४ मुली सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेत स्व-जागृती, संवाद कौशल्य, मासिक पाळी स्वच्छता…

Read More

उपस्थित मान्यवरांनी केले अंकाचे कौतुक साईमत/चोपडा/प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात वार्षिक नियतकालिक अंक संपादक मंडळातर्फे ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्वरा प्रशांत अनवर्दकर, साक्षी रवींद्र पारधी, निकीता या विद्यार्थिनींनी गायलेल्या सुरेल स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील, माजी शिक्षणमंत्री कै.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी होते. याप्रसंगी उद्घाटक व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक…

Read More

प्राथमिक चर्चेतून त्यांच्या नावाला मिळतेय बळ…! साईमत/मुंबई/का.प्र. जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून चार जण इच्छूक असले तरी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांचे नाव प्रदेशस्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या गोटातून चर्चेत आल्याचे समोर येत आहे. पक्षाचा सामान्य कर्ता ते सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्या नावाला प्राथमिक चर्चेतून बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या प्रदेश स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांवर संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यातही निवडून येण्याचे ‘मेरीट’ हा देखील निकष महत्त्वाचा मानला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भाजप अंतर्गंत जळगाव शहर, जामनेर, भुसावळ आणि चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित…

Read More

आश्रय फाउंडेशनतर्फे बसची मोफत सेवेचा स्तुत्य उपक्रम साईमत/यावल/प्रतिनिधी खान्देशचे कुलदैवत, सातपुडा निवासिनी श्री मनुमातेच्या दर्शनासाठी रावेर, यावल तालुक्यातील मातृशक्तीने दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून रावेर, यावल तालुक्यातील महिलांना मनुमातेच्या दर्शनाला नेण्यासाठी मोफत एस.टी.बस उपलब्ध करून देण्याच्या अभिनव कल्पनेला माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रावेर, यावल बस स्थानकातून बसेस भरभरून मनुदेवी येथे आल्या. सर्व महिला भाविक अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आल्या होत्या. सर्व महिलांचे स्वागत डॉ.जागृती फेगडे यांनी केले. सुमारे एक हजारापेक्षा जास्त महिलांनी मोफत दर्शन योजनेचा लाभ घेतला. यांनी केले सहकार्य दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या महिलांसाठी श्री मनुदेवी संस्थानचे सचिव नीलकंठ चौधरी, विश्वस्त…

Read More

शासन स्तरावरुन प्रश्न मार्गी लावण्यास सहकार्य करण्याची मागणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या तफावतीत सुधारणा करुन शासन निर्णय पारित करण्याच्या शिफारसीचे निवेदन मुक्ताईनगर येथे आ.चंद्रकांत पाटील यांना रविवारी, ६ ऑक्टोंबर रोजी जय महाराष्ट्र शासकीय, निमशासकीय लिपिक संवर्ग वेतन त्रुटी व जुनी पेन्शन योजना संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिले. ग्रामसेवक, तलाठी, ट्रेसर, शिक्षक व अशा इतर संवर्गाच्या वेतनश्रेणी १९८६ च्या ४ थ्या वेतन आयोग होण्यापूर्वी लिपीकवर्गीय संवर्गाच्यापेक्षा कमी व काहींच्या समकक्ष होत्या. आजची परिस्थिती पाहिली तर तत्कालीन प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांपेक्षाही व तुटपुंज्या पगारावर लिपीकवर्गीय कर्मचारी आपल्या कुटुंबाची उपजिवीका भागवत आहेत. लिपीकवर्गीय संवर्गाच्यापेक्षा कमी व काहींच्या समकक्ष असणाऱ्यांचे वेतनामध्ये भरमसाठ वाढ…

Read More

गावात अस्वच्छतेमुळे पसरली दुर्गंधी, रस्त्यावरच थांबतेय पाणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील नागरिकांना वारंवार गावातील अस्वच्छता तसेच गटारी नसल्याने गावात होत नसलेला पाण्याचा निचरा यामुळे पाणी रस्त्यावरच थांबत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. कामे होत नसल्याने चक्क निमखेडी खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. ग्रामपंचायत निमखेडी खु. येथे अस्वच्छतेविषयी नागरिकांनी ग्रामपंचायतीला दोन महिन्यांपासून तक्रारी करून काही उपयोग झाला नाही. सातोड रोडवरील गटार, मुतारी आणि हौदाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिणामी रस्ता पूर्णपणे घाण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी तीव्र भावनेने रस्ता खोदला.ग्रामपंचायत सदस्य…

Read More

दिव्यांगांच्या प्रश्नांसह मागण्या सोडविण्याची केली मागणी साईमत/जामनेर/प्रतिनिधी येथील मंत्री गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिव्यांगांना पगार नाही. नगरपालिकेकडून पाच टक्के निधी अद्यापही मिळालेला नाही. पगार वाढ झालेली नाही. यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करावी, यासाठी लवकरात लवकर दिव्यांगांना पाच टक्के निधी, सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मंत्री ना.गिरीष महाजन यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन माळी यांनी मंत्री महाजन यांच्याशी चर्चा करुन दिव्यांगांचे प्रश्न आणि मागण्या त्वरित सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली. यावेळी रवी झाल्टे, मोहन…

Read More

मनपासह संबंधित नगरसेवकांचे झाले दुर्लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळ्यातील सहयोग कॉलनीतील हरीकृष्ण मंदिराजवळच गेल्या पंधरा दिवसांपासून अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध आजारांना आमंत्रण द्यावे लागत आहे. तसेच अस्वच्छतेमुळे परिसरात डासांची उत्पत्तीही प्रचंड वाढली आहे. याकडे मनपाच्या स्वच्छतेसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात येणारी मनपाची घंडागाडीही अवेळी येत असल्याने नागरिक नाईलाजास्तव केरकचरा रस्त्यावर टाकत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावरच अस्वच्छता पसरल्याचे चित्र आहे. यासोबतच परिसरातील गटारींचीही वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने त्याचाही परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. वार्ड क्रमांक दहाच्या संबंधित नगरसेवकांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Read More