‘काशीखंड’ ग्रंथात उल्लेख : शिवभक्तांमध्ये चैतन्य साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ‘काशीखंड’ ग्रंथात उल्लेख असलेल्या पहुर पेठ येथील वाघूर नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गरम्य श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरास राज्य शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गंत परिसरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिराला ‘ ब’ वर्गाचा दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून गौरविण्यात आल्याने पहुर परिसरात शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. राज्याचे पर्यटन व ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष समाधान…
Author: Sharad Bhalerao
आपल्याच पक्षाला जागा सुटणार असल्याचा करताहेत दावा साईमत/जामनेर/पंढरीनाथ पाटील जामनेर विधानसभा मतदारसंघातून ना. गिरीष महाजन यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी गेल्याच महिन्यात ना. महाजन यांच्या गोटातील माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांच्या हातात ‘तुतारी’ देऊन त्यांची उमेदवारीही जाहीर करुन टाकण्यात आली. त्यांचा प्रचारही मतदार संघात सुरू झाला आहे. त्यांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गोटातून सांगण्यात आले. अगोदरच मतदार संघाला परिचित चेहरा असल्यामुळे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रचारात त्यांनी निवडणूक लागण्यापूर्वीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. खोडपे सरांसारखा मोहरा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या गळाला लावून ना.महाजन यांच्यापुढे तगडे…
प्रतापराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे केले आवाहन साईमत/भडगाव/प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील राज मंगल कार्यालयात शेतकरी, कार्यकर्ता मेळावा उत्साहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी डी. आर. पाटील होते. सुरुवातीला पिचर्डे येथील राजू पाटील टेलर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तात्यासाहेबांचे तालुक्यावर खूप उपकार आहेत. त्यासाठी सर्वांनी एक व्हा, आपली ताकद दाखवून द्या आणि नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन केले. माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी स्वाभिमान गहाण ठेवू नका आणि निष्ठा काय असते, असे आवाहन केले. कोळगावचे सुरेश बोरसे म्हणाले की, लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. नानासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि त्यांना निवडून आणा.…
विविध कार्यक्रमांसह प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची होणार सांगता साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथील सद्गुरू पादुका, कल्पवृक्ष शिवमंदिर “सद्गुरू धाम” गट न. ३८६ पुरुषोत्तम पाटील नगर, स्वामी समर्थ शाळेच्या पुढे स्वामी समर्थ केंद्राजवळ सालाबादप्रमाणे यंदाही शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज यांचा १५ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पाद्य पूजन, अभिषेक, दासबोध वाचन, सत्संग, कुमारिका पूजन, पुष्पवृष्टी, प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमाचा सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज प्रेमी शिष्य मंडळी, भाविक भक्तांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानचे सचिव जगदीश देवरे यांनी केले आहे.
वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ म्हणून निवड साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथील रहिवाशी डॉ.नेहा बापूराव देवरे-मोरकर यांची वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ म्हणून निवड झाली आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची निवड झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील मुख्याध्यापक बापूराव देवरे यांच्या त्या कन्या आहेत. ‘जेता’ क्लासेसचे संचालक दीपकसिंग मोरकर आणि शोभना मोरकर यांच्या त्या स्नुषा आहेत. पती पोलीस उपनिरीक्षक विक्रांत मोरकर तसेच डॉ.श्रीकांत मोरकर, डॉ. मनीषा मोरकर यांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेने यश मिळाल्याचे नेहा देवरे- मोरकर यांनी सांगितले.
२४ कोटींच्या विकास कामांचा समावेश, क्रीडा संकुलनामुळे खेळाडूंची प्रतीक्षा संपली साईमत/पाचोरा/प्रतिनिधी शहरालगतच्या काकणबर्डीतील खंडेराव महाराज मंदिराचा परिसर विकसित करणे, तालुक्यातील खेळाडूंसाठी क्रीडा संकुल, तालुका कृषी भवन इमारतीचे भुमीपूजन समारंभ अशा २३ कोटी रूपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गिरड रस्त्यावरील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात जिल्ह्यातील पहिले १३ कोटी ९० लाखांचे अत्याधुनिक कृषीभवन उभारण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्राअंतर्गत शहरालगत काकणबर्डी येथील खंडेराव महाराज मंदिराचा परिसर पाच कोटी रूपयांच्या निधीतून विकसित करण्यात येणार आहे. सोबतच तालुक्यातील खेळाडूंचे स्वप्न साकार करण्यासाठी पाच कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक क्रीडा संकुलनाचे विकास काम…
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती, १७६०.४० कोटींच्या विविध विकास कामांचाही होणार प्रारंभ साईमत/अमळनेर/प्रतिनिधी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गंत अमळनेरात शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांचा भव्य मेळावा आयोजित केला असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीफडणवीस, ना.अजित पवार यांची उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा मेळावा प्रताप महाविद्यालयात दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी महत्त्वपूर्ण विविध विकास कामांचाही प्रारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय श्रीमती रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महिला व…
जामनेरातील कार्यशाळेत ॲड.शुभांगी चौधरी यांची माहिती साईमत/जामनेर/प्रतिनिधी गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्र, डॉक्टर किंवा व्यक्तीविषयी माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवल्या जाते. यासाठी आपण १८००२३३४४७५ किंवा www.amchimulgi.gov.in वर तक्रार करू शकतात, अशी माहिती ॲड.शुभांगी चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पंचायत समितीच्या सभागृहात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यासाठी स्त्री भ्रूणहत्येविषयी कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते. कार्यशाळेला पी.सी.पी.एन.डी. टी.च्या सदस्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.नम्रता अच्छा, कायदेशीर सल्लागार ॲड.शुभांगी चौधरी ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित…
राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची पदस्थापना साईमत/यावल/प्रतिनिधी राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी काढला आहे. त्यानुसार यावल नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त गट ‘ब’ चे निशिकांत गवई यांची पदस्थापना केली आहे. आदेशात नमूद केले आहे की, जुम्मा कासम प्यारेवाले यांची तुमसर येथे तसेच अमोल बागुल (एरंडोल), श्रीमती विजया घाडगे (शेवगाव, जि. अहमदनगर), श्रीकांत लाळगे (लोहा, जि.नांदेड), निशिकांत गवई (यावल), रामनिवास झवर (धरणगाव), सचिन पूदाके (बिलोली, जि.नांदेड), सुरज जाधव (जळगाव जामोद, जि.बुलडाणा), अंबादास गर्कळ (मुक्ताईनगर), अविनाश गांगोडे (नवापूर, जि.नंदुरबार), सचिन बच्छाव (मुरुड जंजिरा, जि.रायगड) याठिकाणी मुख्याधिकाऱ्यांची पदस्थापना केली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी…
कृषीकन्या सौ.वैशालीताई सूर्यवंशींनी लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी साधला प्रत्यक्ष संवाद साईमत/पाचोरा/विशेष प्रतिनिधी पाचोरा विधानसभा मतदारसंघात समस्यांचा डोंगर एका बाजूला तर दुसरीकडे सत्तेचा खेळ खेळणारे जुमलेबाज सरकार… त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून मार्ग काढायचा आहे. मतदारसंघाला सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी कै.तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या स्वप्नातील भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त सर्वांगिण विकास आणि त्यासाठीच्या नियोजनासाठी मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आराखडा तयार करावयाचे म्हणून ‘मी येत आहे, आपल्या भेटीला…’ असे आवाहन करत उबाठा शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या कृषीकन्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांनी गेल्या ९ सप्टेंबर २०२४ रोजी काढलेल्या संवाद यात्रेला बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण होत आहे.…