Author: Sharad Bhalerao

साखरपुड्यातच आटोपला विवाह सोहळा, समाज बांधवांनी पुढाकार घेण्याचे आवाहन साईमत/वरणगाव/प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी हाजी मुस्ताक शेख इसहाक यांच्या परिवारातील मुलीचा मंगळवारी साखरपुड्याचे नियोजन केले होते. मात्र, यावेळी समाजातील उपस्थित पदाधिकारी मंडळी यांनी दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई व इतर अनिष्ठ प्रथांना फाटा देत साखरपुड्यातच विवाह सोहळा आटोपून घेतला. त्यामुळे वरणगाव शहरात प्रथमच खाटीक समाजाने एक आदर्श पाऊल उचलत एक नवीन पायंडा रचल्याने वधू आणि वर पक्षाकडील मंडळीचे कौतुक केले जात आहे. वरणगाव शहराच्या गंगाराम कॉलनी भागातील रहिवासी हाजी मुस्ताक शेख इसहाक, हाजी अखलाख शेख इसहाक, हाजी इकबाल शेख मुसा, हाजी शफी शेख मुसा यांच्या परिवारातील मुलीचा मंगळवारी जळगाव येथील…

Read More

धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी : लाभार्थ्यांची मागणी साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी येथे सप्टेंबर महिन्यातील रेशन मालापासून ५० टक्के लाभार्थी वंचित असल्याने ऐन सणासुदीच्या काळात मनस्ताप करावा लागत आहे. धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. जामनेर तहसील कार्यालया अंतर्गत पुरवठा अधिकाऱ्यांकडून पहुर कसबे येथे २८ सप्टेंबर रोजी धान्य उपलब्ध झाले. स्थानिक रेशन धान्य दुकानदारांनी दोन दिवस धान्य वितरण केले. मात्र, १ ऑक्टोबरपासून पॉस मशीनवर सप्टेंबरचे धान्य वितरण बंद झाल्याने सुमारे ५० टक्के लाभार्थी वंचित आहेत. शंभर टक्के लाभार्थ्यांचे धान्य उपलब्ध झालेले असले मुदत संपल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याने सप्टेंबर महिन्याच्या धान्य वाटपास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.…

Read More

विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप साईमत/चोपडा/प्रतिनिधी येथील इनरव्हील क्लबतर्फे नवरात्रीनिमित्त ‘गरबा नाईट’ चे आयोजन केले होते. गरबा नाईटसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. वैशाली सौंदाणकर, सचिव पूनम गुजराथी यांनी परिश्रम घेतले. गरबा नाईटला प्रमुख पाहुण्या म्हणून इंदिरा पाटील, ज्योती पावरा होत्या. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर, आशिषभाई गुजराथी, व्ही. एस. पाटील, एम. डब्ल्यू. पाटील, संजय बारी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट जाॅइंट सेक्रेटरी तथा गरबा नाईटचे प्रायोजक नितीन व रश्मी अहिरराव उपस्थित होते. याप्रसंगी विविध गटात पारितोषिके देण्यात आली. ६ ते १५ वयोगटातून गरबा प्रिन्स आरव गुजराथी व गरबा प्रिन्सेस धनश्री पाटील यांची निवड करण्यात आली. बेस्ट कॉस्च्यूमचे बक्षीस…

Read More

माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप साईमत/फैजपूर/प्रतिनिधी सध्या नवरात्रीचा उत्सव सर्वत्र जोरदार सुरू आहे. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. न्हावी दरवाजाजवळील भवानी पेठ दुर्गोत्सव मित्र मंडळांनी दहावी, बारावीमध्ये यश संपादन केलेल्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून सखोल अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. यश संपादन करून आई-वडिलांसह गुरुजनांचे नाव आपण उंचावर नेण्याचे प्रयत्न करावा. अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा जोमाने आपण अभ्यास करावा, असे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी मनोगत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, महिला, पुरुष, भक्तगण यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी…

Read More

फैजपुरला ठेवीदारांनी केले लाक्षणिक उपोषण साईमत/फैजपूर/प्रतिनिधी महाराष्ट्र शासन जनतेच्या हितासाठी प्रचंड प्रमाणात कल्याणकारी योजनांची घोषणा करीत आहे. बहुतांश त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व ठेवीदारांना एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या मागणीसाठी खान्देश ठेवीदार कृती समितीतर्फे फैजपूर प्रांत कार्यालयासमोर गुरुवारी, १० रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पतसंस्थांचे यावल, रावेर तालुक्यातील ठेवीदार उपस्थित होते. ठेवीदारांना एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज कोणत्याही अटीशिवाय देण्यात यावे, ठेवीदारांच्या फसवणूक करून प्रचंड मालमत्ता जमा केलेल्या पतसंस्था चालकांविरुद्ध १९९९ च्या कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याच्या मागणीसाठी तसेच कलम ८८ अन्वये निश्चित जबाबदारीच्या रकमा वसूल करण्यासंदर्भातील मागणीसाठी…

Read More

माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या पाठपुराव्याला यश साईमत/मलकापूर/प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मलकापूर, नांदुरा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे मोदी आवास घरकुल योजनेचे हप्ते थांबलेले असल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लाभार्थ्यांच्या घरकुलांचे हप्ते तात्काळ जमा करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती. बुलडाणा जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी १७ हजार ५५ एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार १७ हजार ५५ लाभार्थ्यांना मंजूरात प्रदान केली आहे. त्यापैकी एक हजार ९३५ घरकुले पूर्ण झाली आहे. १५ हजार १२० घरकुले निधीअभावी अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे मलकापूर मतदार संघातील मलकापूरला एक हजार १९५ आणि नांदुराला एक हजार…

Read More

तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नांना यश साईमत/यावल/प्रतिनिधी गेल्या ३ ऑक्टोंबरपासून यावल पंचायत समितीसमोर अनु. जाती-जमातीच्या लोकांना न्याय मिळविण्याकरीता संघटनेच्यावर्तीने आंदोलन सुरू करण्यात आले. परंतु पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यामुळे ठिय्या आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात ५ ऑक्टोंबरपासून संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष यांनी सुरु केले होते. आमरण उपोषण तात्काळ मिटावे, यासाठी यावल तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांचे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना गुरुवारी, १० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी यश मिळून उपोषणाची सांगता करण्यात आली. आमरण उपोषण प्रामुख्याने भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत टेंभीकुरण गाव ते पाटसरी रस्त्याचे काम तात्काळ करून घेण्याचे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आश्वासन दिले होते. तसेच टेंभीकुरण गावातील अनु -…

Read More

सुमारे ४५ कोटी निधीतून रस्त्यांची होणार दर्जोन्नती साईमत/अमळनेर/प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. सुमारे ४५ कोटी निधीतून रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाच्यावतीने प्रशासकीय मान्यतेचे आदेश ८ ऑक्टोबर रोजी निघाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर मतदारसंघांत नवीन रस्त्यांची मालिकाच अवतरली आहे. शहर व ग्रामीण भागात दळणवळणास वेग आला आहे. मारवड ते बोहरा, मारवड ते शहापूर, कळमसरे ते शहापूर, खेडी खवशी रस्ता आणि पळासदडे ते रामेश्वर जुनोने रस्ता अशा रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी अशा…

Read More

महाराष्ट्र सुवर्णकार सेना, समस्त सोनार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे घडलेल्या लहान चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र सुवर्णकार सेना आणि जळगाव शहरातील समस्त सोनार समाजाच्यावतीने गुरुवारी, १० ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या गंभीर घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.निवेदन सादर करण्यासाठी सोनार समाजातील असंख्य कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी अशा घृणास्पद घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने निष्णात वकीलाची नेमणूक करावी आणि त्वरित न्याय प्रक्रिया पार पडावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात…

Read More

मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संचाचे वाटप साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे दोन हजार ७० बांधकाम कामगार बंधू, भगिनींना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मोफत गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थी महिला, पुरुष मंडळीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी संजय गरूड, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संजय पाटील, पालक पदाधिकारी सुहास पाटील, उपसरपंच दीपक खरे, विकासोचे चेअरमन प्रभाकर चौधरी, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र बांधकाम कामगार अंतर्गंत मोफत घरगुती भांडे, पेट्यांच्या नोंदणीसाठी भडगाव, चाळीसगाव जावे लागत होते. ती सुविधा लोहारा कुऱ्हाड सर्कलमध्ये भाजपाचे कार्यकर्ते कैलास चौधरी,…

Read More