Author: Sharad Bhalerao

उपक्रमाचे कौतुक करुन ग्रामस्थांनी मानले आभार साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एल.एच.व्ही.श्रीमती जयश्री वसंत कुलकर्णी यांच्यावतीने चिंचखेडा बु.येथील ४८ गरजू मुलांना विजयादशमीनिमित्त शनिवारी कपडे वाटपासह मिठाईचे वाटप करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानण्यात आले. यांची हाेती उपस्थिती याप्रसंगी श्याम कुलकर्णी, लमेश कुलकर्णी, रवींद्र सूर्यवंशी, वैशाली पाटील, दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

११ कुमारिकांचे पूजन, ‘नामस्मरण महात्म्य’वर प्रबोधन साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा येथील गट नं. ३८६, सद्गुरू धाम, सद्गुरू पादुका व कल्पवृक्ष शिवमंदिर, पुरुषोत्तम पाटील नगरात सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज यांचा १५ वा पुण्यतिथी महोत्सव आश्विन शुद्ध अष्टमी शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी पाद्यपूजन, अभिषेक, दासबोध वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित भगिनी यांच्या हस्ते ११ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. तसेच सत्संग करण्यात आला. ‘नामस्मरण महात्म्य’ याबाबत जगदीश देवरे यांनी प्रबोधन केले. महाआरती, पुष्पवृष्टी व प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विजय ढाके, धनराज सावदेकर, डी. के.चोपडे, श्री. काळे, मनोज राजपूत, भगवान पाटील, भागवत पाटील, भागवत चौधरी, केशव पेंटर,…

Read More

उसनवारी पैसे देणे भोवले : डोक्यात हातोडा घालून केला खून; “कॉल डिटेल्स” वरून लागला छडा ; महिलेसह तीन जणांना घेतले ताब्यात साईमत/जळगाव/न.प्र. शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये व्यापाऱ्याच्या पत्नीचा डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान, उसनवारी दिलेले पैसे संशयित आरोपींकडे मयत महिलेने वारंवार मागून तगादा लावला म्हणून एका महिलेसह तिघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक यांनी २० तासात याचा उलगडा करून तिघांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की, शहरातील गणेश वाडी परिसरातल रणछोड नगर मध्ये दाणा बाजार…

Read More

भावी लोकप्रतिनिधींची उपस्थिती लाभणार साईमत/यावल/प्रतिनिधी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे रावेर विधानसभा मतदार संघातील सर्व भावी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी, १२ रोजी सायंकाळी ६ :३० वाजता रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. येथील व्यास मंदिराजवळ सालाबादप्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम आ.शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका सौ.केतकीताई पाटील, यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचालक पांडुरंग सराफ, एनएसयुआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी आदी भावी लोकप्रतिनिधीसह आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे.…

Read More

लाडक्या बहिणींची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहून मंत्री अनिल पाटील यांनी मानले मनापासून आभार साईमत/अमळनेर/प्रतिनिधी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या’ लाभार्थी सन्मान सोहळा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांच्या मेळावा व एक हजार ७६० कोटी रुपयांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाला महिलांची रेकॉर्डब्रेक गर्दी होती. कार्यक्रमात पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही कार्यक्रमाला सर्वांचा उत्साह दिसून आला. एवढ्या पावसातही तुम्ही मंडपात उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो, असे उद्गार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी काढले. खासदार स्मिताताई…

Read More

जामनेरातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार साईमत/जामनेर/प्रतिनिधी गेल्या ३० वर्षात जामनेर तालुक्याचे खरे ‘शिल्पकार’ ना. गिरीष महाजन यांनी शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय ते स्वस्त बसत नाहीत. त्यासाठी वाट्टेल ते परिश्रम घेण्याची आणि कामास तडीस नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे जामनेर तालुक्याचा सर्वांगिण विकास होतांना दृष्टीक्षेपास पडत असल्याचे गौरवोद्गगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीचे आणि भुसावळ चौकात घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भीमसृष्टीचे लोकार्पण राज्याचे…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ऑनलाईन उपस्थिती मुंबई । न.प्र. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील ४४ विधानसभा मतदारसंघातील १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीची एक हजार ४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पध्दतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बृजेळ दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता…

Read More

महिला सशक्तीकरण मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी राज्य शासनाने अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केले. अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे शुक्रवारी, १० रोजी महिला व बाल विकास कार्यालयामार्फत आयोजित महिला सशक्तीकरण मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला खासदार स्मिता वाघ, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरु केली आहे. या…

Read More

शिवसेना उबाठाकडून उन्मेष पाटील तर रा.काँ.कडून तिघांचा समावेश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठाकडून तिकीट मिळाले तर उन्मेष पाटील हे उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून तीन जणांची नावे पुढे आली आहेत. त्यात माजी आमदार राजीवदादा देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतिश दराडे ह्या तिघांपैकी एक उमेदवार असण्याची शक्यता आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांची नुकतीच उमेदवार निवडीसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात तिघांच्या मुलाखती घेण्यात आल्या. माजी आमदार राजीवदादा देशमुख आमदार असतांना त्यांनी केलेली विकास कामे, तालुक्यातील पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लावला. एमआयडीसीत उद्योग आणले. शहर व ग्रामीण भागाचा गोपनीय सर्व्हे…

Read More

डॉ. कुंदन फेगडेंनी युवकांना केले लोकल कलेकडे वळण्याचे आवाहन साईमत/यावल/प्रतिनिधी आजच्या पिढीतील युवकांना कलाक्षेत्रात प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्यासाठी आश्रय फाउंडेशनच्यावतीने आणि अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या संकल्पनेतून खान्देशी अहिराणी सुपरस्टार्सचा ‘खान्देशी धमाका’ कार्यक्रम नुकताच यावल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला.यावेळी खान्देशी सुपरस्टार्सला बघण्यासाठी यावल परिसरातून गर्दी जमली होती. कार्यक्रमाला खान्देशी सुपरस्टार सचिन कुमावत, आबासाहेब चौधरी, पुष्पाताई ठाकूर, भैय्या मोरे, मेघा मुसळे, प्रशांत देसले, धिरज चौधरी, अशोक वानरसे, दीपक देवराज, कावेरी पाटील, विनोद कुमावत आणि विलास वाघ यांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचा नागरिक, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योगपती कै. रतन टाटा यांना…

Read More