विद्यार्थी सहायक समितीतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जगापुढे पर्यावरणीय बदल ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत आवश्यक तेवढी जनजागृती होत नाही. उत्तराखंड राज्यात केदारनाथ भागात शास्त्रज्ञांनी बांधकाम करू नका, असे सांगितले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तेथे पुराने मोठे मानवी हानीचे नुकसान होत आहे. अनेक माणसे मारली जात आहे. निसर्गाचे मनुष्य अमाप नुकसान करीत असल्याने व पर्यावरणीय बदल होत असल्याने मानवाला धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खा. कुमार केतकर यांनी केले. येथील विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहायक समिती, जळगावतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील…
Author: Sharad Bhalerao
तीन लाख ग्राहकांकडे ५३७ कोटींची थकबाकी, महावितरणकडून वीजबिल वसुली मोहीम सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे ५३७ कोटी रुपयांचे वीजबिल थकित आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील तीन लाख १६ हजार ६८१ ग्राहकांकडे ५३७ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात घरगुती वर्गवारीतील दोन लाख ८५ हजार ६०७ ग्राहकांकडे ६९कोटी ५५ लाख, व्यावसायिक वर्गवारीतील १९ हजार ३२४ग्राहकांकडे ११ कोटी ४१ लाख,…
नवउद्योजकांना प्रामाणिकपणा-संयमाचे बाळकडू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नवसंशोधन,नवोपक्रम व साहचर्य मंडळातर्फे (केसीआयआयएल) आयोजित तीन दिवसीय स्टार्टअप अंतर्गत विशेष कौशल्य शिबिराचा (स्टार्टअप बुटकॅम्प) प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी मंचावर जळगाव येथील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल लि.चे चेअरमन व मुख्य कार्यकारी संचालक दीपक चौधरी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, केसीआयआयएलचे संचालक प्रमोद संचेती, नवसंशोधन,नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे, संचालक डॉ. राजेश जवळेकर, समन्वयक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे उपस्थित होते. शिबीरात कोल्हापूर, यवतमाळ, पुणे यासह विविध भागातून ३० नवउद्योजक सहभागी झाले होते. याप्रसंगी दीपक चौधरी म्हणाले की, अथक परिश्रमातूनच यशस्वी उद्योजक होता येते. व्यवसायाचे नितीसूत्र प्रामाणिकपणे अवलंबल्यास यशस्वीतेकडे वाटचाल…
माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यावर ॲड.पियूष पाटील यांचा आरोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या प्रभागातील नावे पहिल्या प्रभागात अशा पद्धतीचे घोळ झाल्याचे बघायला मिळाले आहे. यासोबतच शहरातील दुबार नावांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या कुटुंबातील सदस्य असलेले त्यांचे बंधू सुनील भंगाळे यांचे एकाच यादी भाग क्रमांकमध्ये परंतु वेगवेगळ्या बुथवर दोन मतदान कार्ड असल्याचे समोर आलेले आहे. त्यांचे पुतणे आकाश भागवत भंगाळे यांचे शहरातील वेगवेगळ्या यादी भाग क्रमांक मध्ये ३ वेगवेगळ्या बूथवर मतदान आढळून आले आहे. यासोबतच इतर सदस्यांचेही २…
जळगाव विद्यापीठासह भारतीय सर्व्हेक्षण विभागात सामंजस्य करार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग, पुणे यांच्यात २१ नोव्हेंबर रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. करारावर भारतीय सर्व्हेक्षण विभाग, महाराष्ट्र व गोवा जी.डी.चे संचालक डॉ. ए. के. सिंग आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. एन. पाटील, प्रा. एस. आर. थोरात, प्रा. व्ही. एम. रोकडे, प्रा. के. पी. दांडगे उपस्थित होते. सामंजस्य करारामुळे भूस्थानिक माहिती व तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण तांत्रिक क्षेत्रात दोन्ही संस्थांमध्ये…
जळगाव शहर पोलीस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला बनावट महिला उभी करून आणि खोटी कागदपत्रे वापरून शेतजमीन विक्रीच्या नावाखाली तब्बल ७ लाख ७४ हजार ७८६ रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, भगवान काशिनाथ सोनवणे (वय ४२, रा. धनाजी काळे नगर, जळगाव) या रिअल इस्टेट व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, २० जानेवारी २०२५ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्यात राजपूत नावाच्या एका महिलेसह, असलमखान अशरफखान (रा. जळगाव), हुसेन मर्चट…
विद्यापीठ, जिल्हास्तर अशा दोन टप्प्यात स्पर्धा ; बक्षिस रक्कम वाढ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित आविष्कार-२०२५ स्पर्धेकरीता प्रवेशिका नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आविष्कार-२०२५ स्पर्धेचे आयोजन दोन टप्प्यात करणार येणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्रशाळेंसाठी ४ डिसेंबर आणि ८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा जळगाव जिल्ह्याकरीता पी.आर. हायस्कूल सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे, धुळे जिल्ह्यासाठी झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी विद्यापीठ संचलित कला विज्ञान महाविद्यालय, मोलगी व आदिवासी अकादमी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी अकादमी, नंदुरबार येथे आविष्कार -२०२५ जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर…
एमआयडीसी पोलिसांचे यश, गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : एमआयडीसी परिसरातून ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणात चोरी करणारे दोन आरोपी त्यांच्या गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह गजाआड केले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून रिफिलिंग केलेले ३४२ नग सिलेंडर एका ट्रक वाहनात भरून एमआयडीसी परिसरात पार्किंग केले होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी वाहन जागेवर दिसले नाही. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनातून ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत…
एमजेतील कार्यशाळेत आवाजासह सूत्रसंचालनावर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या सूत्रसंचालन कार्यशाळेत जळगाव आकाशवाणीच्या माजी ज्येष्ठ निवेदिका डॉ. उषा शर्मा यांनी आवाजाचे विविध पैलू आणि सूत्रसंचालनाच्या बारकाव्यांवर मार्गदर्शन केले. डॉ.शर्मा यांनी सहभागी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ‘आवाजाचे चढ-उतार, माधुर्य आणि आवाजाची घ्यायची विशेष काळजी’ अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती दिली. सूत्रसंचालनासाठी आवश्यक असणारे भाषिक कौशल्य आणि सादरीकरणाच्या विविध पैलूंवर त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. शमा सराफ आणि केसीई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी संदीपकुमार केदार यांची उपस्थिती होती. दोन महिने चालणाऱ्या सूत्रसंचालन वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार…
विद्यापीठात आयोजित स्टार्टअप बूट कॅम्पमध्ये प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ध्येयाचा मार्ग कधीच सरळ नसतो. परंतु अडथळ्यांवर मात करून जिद्दीने प्रयत्न केले तर निश्चित यश मिळते, असे उद्गार जळगावचे उद्योजक तथा वेगा केमिकल्सचे संचालक भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळातर्फे (केसीआयआयएल) आयोजित तीन दिवसीय स्टार्टअप बूटकॅम्प शिबिराचे उद्घाटन २० नोव्हेंबर २०२५ रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, केसीआयआयएलचे संचालक प्रा. अरुण इंगळे व नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर उपस्थित होते. स्वतःचा ‘इन्स्पिरेशन व मोटिव्हेशन ग्राफ’…