Author: Sharad Bhalerao

सहा पवित्र स्थळांना देणार भेटी, बुध्दाच्या पवित्र स्थळाचे घेणार दर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील ४२ भीमसैनिकांची भगवान बुध्दाच्या पवित्र स्थळाची धम्मसहल निघाली आहे. सहलीत भीमसैनिक भगवान बुध्दाच्या सहा पवित्र स्थळांना भेटी देऊन भगवान बुध्दाचे दर्शन घेणार आहेत. भीमसैनिक शनिवारी, ९ नोव्हेंबर रोजी भुसावळ ते वाराणसी येथे रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यानंतर बसने सारनाथला भगवान बुद्धची ८० फूट मूर्ती, चौघडी स्तुप, धमेक स्तुप, मुलगंध कुटी विहार, मृगदायन, अशोक स्तंभचे दर्शन घेऊन बोधगयासाठी रवाना झाले आहेत. ११ ते १७ नोव्हेंबरपर्यंत भगवान बुद्धची पवित्र स्थळ राजगिर, नेपाळ, श्रावस्ती येथे दर्शन घेऊन लखनऊहून जळगावसाठी रवाना होणार आहे. दहा दिवसाच्या धम्मसहलीचे आयोजन श्री.पांडव सर भुसावळ यांनी केले…

Read More

गृह मतदानासाठी पात्र उमेदवारांची संख्या १७८ राहणार साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी शहरातील मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी गृह मतदान प्रक्रिया ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांत ८५ वर्ष वयापेक्षा जास्त, दिव्यांग मतदार, दीर्घ आजाराने खाटेवर पडून असलेल्या गृह मतदानासाठी पात्र उमेदवारांची संख्या १७८ आहे. त्यापैकी ८५ वरील वयोवृद्ध मतदार १५२ तर दिव्यांग मतदार २६ असे आहेत. गेल्या दोन दिवसात गृह मतदानाद्वारे मतदारांनी आपल्या मताधिकाराचा हक्क बजाविला आहे. या प्रक्रियेत टपाली मतपत्रिकेवर मत नोंदविले जाते. ८ नोव्हेंबरला ९७+१६ =११३, ९ नोव्हेंबरला ४७+०९ =५६. उर्वरित नऊ मतदारांपैकी चार मयत आहेत तर उर्वरित पाच मतदार यांना पुनश्च १५ नोव्हेंबर रोजी होम वोटिंगचा लाभ…

Read More

डॉ. अमित हिवराळे यांच्या हस्ते सपत्नीक होणार रथोत्सवाची महापूजा साईमत/फैजपूर/प्रतिनिधी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातील खान्देश विभागात येणाऱ्या जळगाव जिल्ह्याला खूप मोठी परंपरा आहे. फैजपूर येथे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला त्यामागचा इतिहास व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. पांडुरंग रथोत्सवाला १७६ वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या स्वयंभू श्री पांडुरंगाचा रथोत्सव येत्या शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता साजरा होत आहे. महाआरतीचे यजमान फैजपूर सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ. अमित हिवराळे व यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मृणालिनी हिवराळे या दाम्पत्याला मान मिळाला आहे. यावेळी परिसरातील प.पू. महामंडलेश्वर सर्व संत, महंत, कथा कीर्तनकार पंचकोशातील सर्व भाविक भक्तगण, सर्व धर्म…

Read More

महिला मंडळाने केले होते कार्यक्रमाचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील दादावाडीजवळील कल्याणी नगर येथे माहेरवाशीण कार्यक्रम अतिशय उत्साहात नुकताच पार पडला. दिवाळी म्हटली की, प्रत्येक मुलीला आपल्या माहेरची ओढ लागते. त्या सासरी कामाने थकुन गेलेल्या असतात. म्हणून माहेरी आराम करण्यासाठी मुली येतात. पण त्या एकत्र येत नाही. त्यांनी एकत्र यावे दंगामस्ती, खेळ खेळुन बालपणात रमावे, म्हणून कल्याणी नगर येथील महिला मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची संकल्पना राधा महाजन, अलका पितृभक्त यांची होती. त्यांना सर्व महिलांनी साथ दिली आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमात प्रथमता लेकींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुमंगल महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला वाणी, ज्योती इंगळे, सुमन बाविस्कर…

Read More

माजी विद्यार्थ्यांनी जुन्या शालेय आठवणींना दिला उजाळा साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडे (मिराचे) येथील निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील १९९२ यावर्षी दहावीच्या उतीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. तब्बल ३२ वर्षांनी माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी भावविवश झाले होते. त्यांनी विद्यालयास प्रत्येक वर्गात ग्रीन बोर्ड सस्नेह म्हणून भेट दिले. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक व इतरत्र बाहेर राज्यात स्थायिक झालेले सर्व मित्र मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. तसेच १९९२ मध्ये माजी मुख्याध्यापक डब्ल्यू.एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षकही मेळाव्यास उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. त्यांनी कृतज्ञता भाव व्यक्त करून मार्गदर्शनही केले. मेळाव्यात डी.एल.पाटील, के.…

Read More

बोदवड तालुक्यातील राजूर गावातील घटना साईमत/बोदवड/प्रतिनिधी मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदिरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी…

Read More

दोघांमधील लढत रंगतदार ठरणार साईमत/जामनेर /प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात जामनेर मतदार संघात दहा उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे सातव्यांदा उमेदवारी करीत असलेले मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या विरूद्ध महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे सर यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते तालुक्यातील वाडीकिल्ला येथील जागृत देवस्थान मंदीर म्हणून परिचित असलेले तथा याच मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष गिरीषभाऊ महाजन यांनी येथे नारळ वाढवून विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी सौ.साधना महाजन, संजय गरूड, ॲड.शिवाजी सोनार, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल, प्रदीप लोढा, नवलसिंग पाटील, विलास पाटील, राजमल भागवत, कैलास पाटील, अशोक भोईटे, डॉ. प्रशांत भोंडे…

Read More

कुऱ्हे (पानाचे) येथे ३३ वर्षानंतर ठरली अविस्मरणीय भेट साईमत/भुसावळ/प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील १९९०-१९९१ मधील दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल ३३ वर्षांनी एकत्रित येत नुकताच उत्साहात घेण्यात आला. स्नेह मेळाव्याला राज्यभरातून विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर होते. त्यांनी लवकरच सर्व सुविधायुक्त ज्युनियर कॉलेज सुरु करण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत वाजत-गाजत जल्लोषात स्वागत केले. त्यात आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष यांचा समावेश होता. याप्रसंगी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनासह सरस्वती पूजन…

Read More

उपाध्यक्षपदी गणेश जाधव तर सचिवपदी अजय जाधव यांचा समावेश साईमत/जामनेर/प्रतिनिधी भटक्या विमुक्त बहुजन महासंघाची जामनेर तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. त्यात जामनेर तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रावण भावडू जाधव (कैकाडी) यांचा समावेश आहे. भटक्या विमुक्त बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुमार जाधव आणि सचिव श्रीकृष्ण बोटुळे यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र श्रावण जाधव यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात म्हटले आहे की, आपण निस्वार्थी भावनेने भटक्या विमुक्त समाजासाठी अविरत कार्य करत आहेत. आपल्या कार्याला पुढे नेण्यासाठी आपली जामनेर तालुका भटक्या विमुक्त बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. श्रावण जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी अशी…

Read More

इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगावने मुला-मुलींसाठी राबविला स्तुत्य उपक्रम साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव यांच्याकडून आहेर ज्युनियर कॉलेजमधील मुला-मुलींसाठी मेंन्टल हेल्थ केअर दिवसाचे महत्त्व साधून ‘मोठं मोठं व्हायचंय’ विषयावर नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका पल्लवी आहेर, उपमुख्याध्यापिका रत्नमाला सोनगिरे यांनी पीडीसी जुलेखा शुक्ल, डाॅ.सुनिता पवार, डाॅ.चेतना कोतकर, विद्या चित्ते, कल्पना महाजन यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पीडीसी जुलेखा शुक्ल म्हणाल्या की, आज मी तुमच्यासमोर ‘मोठं मोठं व्हायचंय’ विषयावर बोलण्यासाठी आले आहे. हा विषय ऐकताच तुमच्या मनात नक्कीच अनेक स्वप्नं, आकांक्षा, ध्येय उभे राहिले असतील. मोठं व्हायचंय म्हणजे नेमकं काय? फक्त वयाने मोठं व्हायचंय का? की विचारांनी, कृतीने, कर्तृत्वाने…

Read More