Author: Sharad Bhalerao

सातपुडाचा परिसर भविष्यात नक्कीच नावारुपाला येणार साईमत/रावेर/प्रतिनिधी सातपुडा जंगल सफारीसाठी १२ नोव्हेंबर रोजी न्या.शंकर पवार आणि त्यांचे सहकारी आले होते. तेव्हा त्यांनी सकाळी सात वाजेपासून रावेर वनक्षेत्रातील नियतक्षेत्र गारबर्डी, लोहारा, कुसुंबा क्षेत्रात जंगल सफारीस सुरुवात केली. सुरुवातीलाच मोर, लांडोर यांचा ग्रुप दिसून आला. पुढे शिकारी पक्षी, व्हाईट आय बाजड व सिरकीर मालकोवा पक्षी दिसून आले. त्यानंतर साधारण आठ वाजेच्या सुमारास सफारी रस्त्याने रुबाबात चालत असणारा बिबट्या दिसून आला. त्यापासून पाच ते सहाशे मीटर अंतरावर सातपुडा जंगल सफारीत प्रथमच वाघोबाचे दर्शन घडून आले. दरम्यान, भविष्यात सातपुडा जंगल सफारीचा परिसर नक्कीच नावारुपाला येईल, असे मत न्या.शंकर पवार यांनी व्यक्त केले. जंगल सफारीत…

Read More

शौचालय तात्काळ सुरु करा : रामराज्य फाउंडेशनतर्फे मागणी साईमत/फैजपूर/प्रतिनिधी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील आठवडे बाजारातील सुलभ शौचालय बांधून अद्यापही लोकार्पणाच्या बहुप्रतीक्षेत आहे. त्यामुळे ते तात्काळ सुरु करावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन रामराज्य फाउंडेशनतर्फे बुधवारी, १३ नोव्हेंबर रोजी नगरपालिका प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांच्यावतीने सहायक निरीक्षक संगीता बाक्षे यांनी स्वीकारले. फैजपूर शहरात एक प्राचीन उत्तम बाजार पेठ आहे. येथील बुधवार रोजी भरणारा आठवडे बाजार पंच क्रोशीतील सर्वात मोठा बाजार आहे. त्यानिमित्त येथे भुसावळ, चोपडा, रावेर, यावल या तालुकासह जिल्ह्याभरातून शेतकरी, व्यापारी, उद्योजक, ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन गरजांसाठी येतात. मात्र,येथे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे नगरपालिका प्रशासनाचे गेल्या दोन…

Read More

मलकापुरला नूतन विद्यालयातील मानवी साखळीने वेधले लक्ष साईमत/मलकापूर/प्रतिनिधी येथील निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या आदेशान्वये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे, मुकुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरीता स्विपअंतर्गत विविध कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अशातच मलकापुरातील नूतन विद्यालयात मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी मतदार जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मानवी साखळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी नोडल अधिकारी एन.जे.फाळके, सहाय्यक नोडल अधिकारी एन.बी.शिंदे, आर.एम.वाघमारे, नूतन विद्यालयाचे प्राचार्य अविनाश बोरले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

यावल तालुका मतदान जनजागृती सेलिब्रिटी डॉ.नरेंद्र महाले यांची माहिती साईमत/यावल/प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे, जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम राबविला जात आहे. त्यात प्रामुख्याने रावेर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारास जागृत करतांना, माहिती देतांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती यावल तालुका मतदान जनजागृती सेलिब्रिटी डॉ.नरेंद्र महाले यांनी दिली. विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला असल्याने यावल-रावेर तालुक्यात प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्यावतीने रोज नियोजनबद्ध रितीने होत आहे. त्यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठिकठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले जात आहे.…

Read More

रथाच्या पुजेचा मान मिळणार पाटील परिवारातील नवविवाहित दाम्पत्याला साईमत/पाचोरा/प्रतिनिधी येथील १९० वर्षांची परंपरा लाभलेला श्री बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुध्द चतुदर्शी म्हणजे वैकुंठ चतुदर्शीला असतो. यावर्षी रथयात्रा आणि मिरवणूक उत्सव गुरुवारी, १४ नोहेंबर रोजी आयोजित केला आहे. श्री बालाजी महाराज यांची मूर्ती रथात बसवून ढोल-ताशे, लेझीम यांच्या निनादात ही मिरवणूक रथगल्ली, विठ्ठल मंदीर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड पुन्हा रथगल्ली अशी काढली जाते. ही मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरु होऊन ती रात्री दहा वाजता संपते. बालाजी महाराजांचा रथ हा दोर बांधुन लोकसमुहाद्वारे ‘श्री बालाजी महाराज की जय’ या घोषणेच्या निनादात ओढला जातो. मिरवणुकीत शहरातील तसेच पंचक्रोशीतील…

Read More

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू साईमत/मलकापूर/प्रतिनिधी तालुक्यातील विवरा शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांना घेऊन जात असलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याची घटना घडली. त्यात १३ शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील झोडगा येथील शेतमजूर महिलांचा एक गट विवरा येथील वासुदेव किसन भोगे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेला होता. दिवसभर कापूस वेचून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या घराकडे परत येत होत्या. दरम्यान, विवरा येथील प्रल्हाद बोरले यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. अपघातात ट्रॅक्टर चालक प्रवीण वासुदेव भोगे यांच्यासह १३ अपघातातील जखमी महिलांमध्ये संगीता गजानन मोरे (वय ४०), प्रमिला…

Read More

पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्माईलिंग स्टोन फाउंडेशनतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी येथील पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्माईलिंग स्टोन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्यासह रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाआरोग्य शिबिरात तब्बल १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. त्यात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थमा, अस्थिरोग तपासणी यासोबतच दंतचिकित्सेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.शिबिरात विशेषतः ५० रक्तदात्यांनी रक्तदान तर ९० रुग्णांची नेत्र तपासणी केली. तपासणीदरम्यान ३८ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे. या रुग्णांची शस्त्रक्रिया लवकरच स्माईलिंग स्टोन फाउंडेशनमार्फत केली जाणार आहे. डोळ्यांच्या ऑपरेशनवर विशेष सवलत देण्यात आली. ज्याचा लाभ अनेक रुग्णांना मिळाला. अशा आरोग्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा आधार मिळाला…

Read More

चार अधिकारी, ३० जवानांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली इंडो तिबेटीयन फोर्स व सावदा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त सावदा शहरातून ‘रुटमार्च’ काढण्यात आला. पोलिसांकडून पथसंचलन विधानसभा निवडणुकीत गैरवर्तणूक तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सावदा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी, इंडो तिबेटियन पोलीस फोर्स यांनी संयुक्तपणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावदा शहरातील शस्त्रधारी कर्मचाऱ्यांसह ‘रुटमार्च’ काढण्यात आला. हे पथसंचालन पोलीस…

Read More

स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा साईमत/मलकापूर/प्रतिनिधी तालुक्यातील दुधलगाव बु. येथील जीवन विकास विद्यालयातील २०१० मधील इयत्ता दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देऊन तब्बल १४ वर्षांनंतर भेट झाली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शाम नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नाफडे, श्री.शिरसाट, एन. डी. नारखेडे, श्री.चोपडे, लिपिक पाटील तसेच कर्मचारी निनाभाऊ पाटील, रामभाऊ धाडे, पिंटूभाऊ ठोसर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक शाम नारखेडे यांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी राहण्यासाठी मित्र किती महत्त्वाचे आहेत, यावर आपले विचार व्यक्त केले. इतर उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या…

Read More

बोरखेडे बु. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यातील बोरखेडा बु.पिराचे येथील माध्यमिक विद्यालयाच्या २००७ च्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. हा मेळावा बोरखेडा जवळील ऋषीपांथा येथील निसर्गरम्य परिसरात घेण्यात आला. प्राथमिक शाळा ते माध्यमिक विद्यालयात २००७ पर्यंतचे माजी विद्यार्थी जवळपास १७ वर्षांनंतर प्रथमच मेळाव्यात एकत्र सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी श्री. भवर, श्री. ठाकुर होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री शिक्षकवर्ग श्री.बागुल, श्री.महाजन, शालिग्राम पाटील, रेखा पाटील, विजय चौधरी, श्री. सोनवणे,श्री. गवळी, बी.जे.पाटील, रमेश सोनवणे, श्री.पवार आदी उपस्थित होते. तसेच रायबा आबा, सुनील तात्या यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची…

Read More