संपूर्ण जिल्ह्याभरात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम सुरू साईमत/यावल/प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवार आपआपल्या पक्ष ध्येय, उद्दिष्ट, धोरणानुसार तसेच अपक्ष उमेदवार आपल्या नियोजनानुसार प्रचार करीत असले तरी शासनातर्फे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी तसेच मतदार जनजागृती करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम आयोजित केले आहे. अशा सर्व उपक्रमात यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांचे नि:पक्षपणे मतदार जनजागृती अभियान लक्षवेधी व कौतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे नक्कीच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार असल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिकच्या कल्पना चव्हाण यांच्या…
Author: Sharad Bhalerao
विद्यार्थ्यांनी नेहरुविषयी व्यक्त केली मनोगत साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे विद्यार्थी छायेंद्र पाटील, रुद्र शिंपी होते. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. यावेळी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छायेंद्र पाटील याने नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तसेच त्यांच्या राजकीय जीवनाविषयी आपले मत व्यक्त केले. रुद्र शिंपी याने नेहरूजींची मुलांविषयी असलेली भूमिका, त्यांना लहान मुले व फुले आवडत होती. म्हणून त्यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे सांगितले. सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ प्रमुख संतोष कचरे तर आभार…
सावदाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची माहिती साईमत/सावदा,ता.रावेर/प्रतिनिधी विविध कारणावरून सध्याच्या काळात दोन समाज, दोन धर्म, दोन जात, तसेच जातीय, धार्मिक, राजकीय, भावनिक तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर काही व्हीडीओ, मजकुर असे प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या समाजमाध्यमावर कुठल्याही जातीचा, धर्माचा पंथाचा अवमान होणार नाही अथवा राजकीय भेद निर्माण होवून आपापसात वाद होणार निर्माण होणार नाही. त्याची खबरदारी घेऊन कुणीही समाज माध्यमांवर व्हिडीओ, मजकुर प्रसारित करु नये शांतता राखावी, असे सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले. आपल्याला आलेले व्हिडीओ किंवा मॅसेज खात्री केल्याशिवाय प्रसारित, फॉरवर्ड करु नये. सोशल मीडियावरील एखाद्या पोस्टमुळे किंवा व्हिडीओद्वारे…
रथोत्सवाची डॉ. अमित हिवराळे यांच्या हस्ते सपत्नीक होणार महापूजा साईमत/फैजपूर/प्रतिनिधी येथे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला त्यामागचा इतिहास व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. पांडुरंग रथोत्सवाला १७६ वर्षाची परंपरा कायम आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या स्वयंभू श्री पांडुरंगाचा रथोत्सव शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता साजरा होत आहे. महाआरतीचे यजमान फैजपूर सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ. अमित हिवराळे व यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मृणालिनी हिवराळे या दाम्पत्याला मान मिळाला आहे. यावेळी परिसरातील प.पू. महामंडलेश्वर सर्व संत, महंत, कथा कीर्तनकार पंचकोशातील सर्व भाविक भक्तगण, सर्व धर्म पंथ समाज ट्रस्टी यावल- रावेर तालुक्यातील सर्व वारकरी, टाळकरी, भजनी मंडळ व इस्कॉन भक्तवंद यांची उपस्थिती…
सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन साईमत/भुसावळ/प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार भुसावळ शहरात पहाटेच्या सुमारास ‘रन फॉर डेमोक्रसी’ उपक्रम राबविण्यात आला. भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र हॉल येथून तापी नगर, आरपीडी रोड, कंडारीसह परिसर या भागात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. हा उपक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी डॉ. सचिन पानझडे, नायब तहसीलदार डॉ. अंगद असटकर, स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप सहाय्यक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक अधिकारी प्रमोद आठवले, शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांच्यासह भुसावळ स्पोर्ट्स…
हिरवी झेंडी दाखवून तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याहस्ते प्रारंभ साईमत/मलकापूर/प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, सर्व कामे बाजुला सोडुन शंभर टक्के मतदारांनी निवडणुकीत मतदान करावे, हा भव्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वीप नोडल अधिकारी एन.जे.फाळके, सहा.नोडल अधिकारी एन.बी.शिंदे, आर.एम.वाघमारे यांच्यामार्फत मलकापूर शहरात १४ नोव्हेंबर रोजी तालुकयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याहस्ते तहसील कार्यालय येथुन सकाळी आठ वाजता रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन प्रारंभ झाला. रॅलीत मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेतील कार्यरत सर्व शिक्षिका, मलकापुरमधील नूतन विद्यालय,…
उपक्रमात मानवी साखळी, रांगोळी, पालक संकल्प पत्रांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी मतदानाचा टक्का वाढावा त्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यातील एक म्हणजे शाळा महाविद्यालयांमधून जनजागृती हे लक्षात घेता प्रगती विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक शाळेत मतदार जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. त्यात मानवी साखळी, रांगोळी, पालक संकल्प पत्र अशा उपक्रमांचा समावेश होता. मतदानाविषयी जनमानसात जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी विविध रांगोळ्यामध्ये घोषणाचा वापर केला. “ ना जातीवर ना धर्मावर, मतदान करा कार्यावर” अशा विविध घोषणा होत्या. जनमानसात मतदानाविषयी जागृतता व्हावी, या हेतूने उपक्रम हाती घेतले. मतदान जनजागृतीपर उपक्रमासाठी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव…
जळगावातील कार्यक्रमात संघातील खेळाडूंचे स्वागत साईमत/जळगाव/प्रतिनिधी जालना येथे येत्या ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होत असलेल्या सब ज्युनियर राज्य डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून जळगाव जिल्ह्याचा संघ जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी जाहीर केला. जळगाव येथे घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संघातील खेळाडूंचे महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदीप तळवलकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार्थी किशोर चौधरी, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, जिल्हा सेपक टकारो असोसिएशनचे…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रसाद’ ठरला प्रेरणादायी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथील बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद पवारने युपीएससी संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) आणि AFCAT परीक्षेत यश संपादन केले आहे. तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयातर्फे प्रसादचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. काटे, उपप्राचार्य आवटे, प्रा. पंकज वाघमारे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. टाकळी (प्र) गावातील प्रसाद संजय पवारने युपीएससीच्या (सीडीएस) २०२४ परीक्षेत संपूर्ण भारतात नववा क्रमांक (AIR-9) मिळवून भारतीय हवाई दलात स्थान मिळविले आहे. त्याआधी AFCAT २०२३ परीक्षेत त्याने ४४ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती. प्रसाद…
राज्यस्तरीय कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातून डॉ. जगदीश पाटील यांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी एकविसाव्या शतकातील कौशल्यांची रूजवणूक व्हावी, म्हणून स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथमच हॅकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी १५ विषयांवर आधारित प्रतिकृती करणे अपेक्षित आहे. स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विचार करावा, असा उपक्रमाचा उद्देश आहे. ‘हॅकेथॉन’ उपक्रमाची सक्षमपणे कार्यवाही होऊन प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे नुकतीच राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यात बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातून सहभागी झाले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण…