संत, महंतांनी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिले आशीर्वाद साईमत/धरणगाव/प्रतिनिधी तालुक्यातील झुरखेडा येथे येत्या २४ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या प.पु. पंडीत धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज (बागेश्वरधाम सरकार) यांच्या मुखातून श्री हनुमंत कथा व दिव्य दरबार कथेचा भुमिपूजन सोहळा महामंडलेश्वर १००८ हंसानंद तिर्थ महाराज (कपीलेश्वर), स्वामी अव्दैतानंदजी चंद्रकिरण सरस्वती (महर्षी कण्व आश्रम कानळदा), महामंडलेश्वर प.पू. महंत स्वामी नारायण (गादीपती, रामेश्वर), महामंडलेश्वर जर्नादन हरीजी महाराज (फैजपूर), प. पु. बालयोगी स्वामी राजेश्वरानंद सरस्वती (शिव-पार्वती आश्रव गादीपती, उत्तराखंड), महंत माणिकलाल पाण्डेय, दग्धेश्वनाथ मंदिर (अध्यक्ष श्री क्षेत्र, रूद्रकाशी), कथावाचक शुभम कृष्ण दुबे (इंदौर हातोड), यज्ञाचार्य पंडीत मनिष शर्मा (इंदौर), ह.भ.प. प्रेममुर्ती सदाशिवजी महाराज (साक्री),…
Author: Sharad Bhalerao
विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विजयासाठी घातले साकडे साईमत/जामनेर/प्रतिनिधी खान्देशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या शेंदुर्णी नगरीत संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे गिरीष महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे हे एकत्र आले. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले. रथाची ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वे गादी वारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत, मंत्री गिरीष महाजन, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, प्रवीण गरुड, भाजपचे नेते संजय गरुड, सरोजिनी…
बोदवड रोडवरील वाहनाची घेतली झाडाझडती साईमत/जामनेर/प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने व सुरक्षा बलाचे जवान यांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम .एम. कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बोदवड रोड येथे नाकाबंदी करून वाहनांची झाडाझडती घेतली होती. तेव्हा त्यामध्ये एका वाहनातून १७ लाख २४ हजार ८०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्या वाहन धारकाचे नाव प्रकाश समाधान पाटील व पठाण (पूर्ण नाव माहीत नाही) यांची असून ते कपाशीचे व्यापारी असल्याचे सांगत आहेत. गुजरातमध्ये कपाशी विकून रक्कम मिळाली, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी ही रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ताब्यात दिली…
पहुरला शिवनगर परिसरात पसरली शोककळा साईमत/पहुर, ता. जामनेर /प्रतिनिधी येथील शिवनगरात राहत्या घरात शेतमजूर तरुणाने गळफास घेऊन ‘जीवन’ संपविल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच वाजेला त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गोकुळच्या अकस्मात मृत्यूमुळे शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, गोकुळ दिलीप सोनार हा २८ वर्षीय तरुण आई आणि मोठ्या भावासोबत शिवनगरात वास्तव्यास होता. गोकुळ सोनार हा दुसऱ्यांची शेती जुपीने करत होता. कपाशीचा हंगाम संपल्याने कपाशी उपटून रब्बी हंगामात ज्वारी पेरण्यासाठी त्याची तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळी आई आणि मोठ्या भावासोबत तो शेतात गेला होता. उपटलेली कपाशी ओली…
सानेगुरुजी स्मारक कर्मभूमीला प्रा. श्याम पवार यांनी दिली एक लाख ११ हजारांची देणगी साईमत/अमळनेर/प्रतिनिधी तालुक्याचे शेतकरी संघाचे अध्यक्ष व मराठी वाड्मय मंडळाचे संचालक प्रा. श्याम पवार यांनी साने गुरुजी स्मारक कर्मभूमीला सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एक लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल साने गुरुजी स्मारक समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे.साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त खान्देशात १२५ प्रबोधनपर उपक्रम आणि स्मारकाच्या स्ट्रक्चरल हॉलच्या उभारणीचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे समाजात साने गुरुजींच्या मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यात मदत होईल. प्रा. श्याम पवार यांचा अनुभव आणि दातृत्व नेहमी स्मारकासाठी लाभदायक ठरला आहे. या कार्यात सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्यातून…
मॅरेथॉन स्पर्धेत ६७ तरुणांनी नोंदविला सहभाग साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन शासन स्तरावरून केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर झि.तो.महाजन माध्यमिक आणि ना.भा.पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा विद्यालयात मुख्याध्यापक के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक नवल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवमतदार व १८ वर्षावरील युवकांची मॅरेथॉन स्पर्धा धानोरा विद्यालयामार्फत आयोजित केली होती. मतदार जनजागृती मॅरेथॉन रॅलीचे आयोजन विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून जळगाव रस्त्यावरून यावल-चोपडा महामार्गाने मोहरद रस्त्यावरून पुढे करण्यात आले. उपमुख्याध्यापक नवल महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेचे नियोजन क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांनी केले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ६७ तरुणांनी सहभाग नोंदविला. त्यात प्रथम वैभव प्रवीण पाटील बीडगाव, द्वितीय गौरव प्रकाश माळी…
मतदानाचे महत्त्व सांगून सेल्फी काढण्यास केले प्रोत्साहित साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकनिमित्त मतदार जनजागृतीसाठी ८ ते १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात जिल्हा आणि मतदारसंघ स्तरावर मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर धानोरा झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्युनिअर कॉलेजच्यावतीने चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य योगेश पाटील, मुख्याध्यापक के.एन.जमादार, उपमुख्याध्यापक नवल महाजन यांच्या उपस्थितीत गावातून मुख्य रस्त्याने प्रभात फेरी मार्गावरून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी विद्यालयाच्यावतीने सेल्फी पॉईंट शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आला होता. तसेच गावातील चौकाचौकात सेल्फी पॉईंट ठेवून मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगून सेल्फी काढण्यास प्रोत्साहित केले. मतदानाच्या जागृतीसाठी लोकांना विविध घोषवाक्य, घोषणांनी…
श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी/ येथील श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवारी, २९ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे. विवाहेच्छुकांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे शारदा एज्युकेशनल फाउंडेशन आयोजित श्री संत जगनाडे महाराज महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात घेण्यात येणार आहे. विवाहेच्छुक तरुणांनी, समाजबांधवांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असून नोंदणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तेली समाजाची वधू-वर परिचय पुस्तिका ही पूर्ण राज्यात व देशातील काही भागातदेखील वितरित…
भाविकांनी विष्णू, महादेवाची तुळशी, बेल वाहून केली पूजा साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळ्यातील सोनी नगरातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता ‘हरिहर भेट’ कार्यक्रम पार पडला. महादेवाला तुळशीपत्र आणि विष्णुची सहस्त्र नावे घेऊन विष्णू देवाला बेल वाहून पूजा करण्यात आली. हरिहर भेट पूजेला विशेष महत्त्व असल्याने त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासात विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू…
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा केला संकल्प साईमत/जामनेर/प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी खुर्दचे माजी सरपंच बाळू हरी चवरे यांची आत्या आणि विजय मगन माळी (सुरत) यांच्या काकू चंद्रकलाबाई अर्जुन माळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निसर्ग विलीन झाले होते. त्यांचा दशक्रिया व गंधमुक्तीचा कार्यक्रम महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सत्यशोधक पद्धतीने एरंडोलचे शिवदास महाजन यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली. सत्यशोधक समाजास कार्यास एक हजार १०० रुपये निधी दिला. तसेच टाकळी खुर्दच्या जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास सत्यशोधक समाजाचे प्रचारक रमेश वराडे, माजी सरपंच सारंगधर अहिरे, अ.भा.माळी समाजाचे अध्यक्ष डॉ.विरेंद्र अहिरे, उपाध्यक्ष…