मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव साईमत/जामनेर/प्रतिनिधी सामाजिक न्याय आणि अधिकारीता, मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभाग भारत सरकार अंगीकृत इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जामनेरातील विश्व शांती दिव्यांग बहुउद्देेशीयचे संस्थाध्यक्ष पवन विश्वनाथ माळी यांना सन्मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी रेडक्राॅस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी घनश्याम महाजन, चेअरमन विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनी मेमन, जि. प.चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. यावेळी मान्यवरांंच्या हस्ते पवन माळी यांना सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. उल्हास…
Author: Sharad Bhalerao
२८ लाख ५५ हजारांचा ऐवज हस्तगत साईमत/भुसावळ/प्रतिनिधी शहरातील सोमनाथ नगरात राहणारा एका ६४ वर्षीय वृध्दाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरटा हा वृद्धाचा जावईच निघाल्याने खळबळ उडाली आहे. राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी ता. भुसावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दरम्यान, कर्जबाजारातून त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली. सविस्तर असे की, भुसावळ शहरातील सोमनाथ नगरमध्ये अनिल हरी बऱ्हाटे (वय ६४) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. सोमवारी, २ डिसेंबर…
एमआयडीसी परिसरात आढळला मृतदेह साईमत/अमळनेर/प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरूणाचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तुषार चिंधू चौधरी (रा.मारवड, ता.अमळनेर, ह.मु. प्रताप मील, अमळनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे. सविस्तर असे की, अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात तुषार चौधरी हा तरूण वास्तव्याला होता. गुरूवारी, ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा बाहेर गेलेला होता. त्यानुसार तो घरी परतला नाही. ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. मृतदेहाजवळच दारूच्या बाटल्या आढळल्या घटनेची…
काकणबर्डी टेकडीवर चंपाषष्टीला भरते खंडोबाची यात्रा आबा सुर्यवंशी/पाचोरा हिवाळ्यात मार्गशिर्ष महिन्यात कार्तिकी एकादशीला पाचोरा नगरीचा सुप्रसिद्ध बालाजी रथोत्सव साजरा होतो. नंतर शहरा पासून दोन ते तीन कि.मी.अंतरावरील गिरड रस्त्यावर असलेल्या काकणबर्डी टेकडीवर चंपाषष्टीला खंडोबा यात्रा भरते. त्यानंतर तालुक्यातील गोराडखेडा येथे अमावस्येला जालंधर-जलालशा उरूस, सावखेडा येथे पाच रविवारी भैरवनाथ यात्रा, कुरंगी जवळील मायजीदेवी यात्रा, सामनेर येथील देवीयात्रा, खेडगाव (नंदीचे) येथे नंदीयात्रा, वडगांव (आंबे) येथील दुर्गादेवी यात्रासह तालुक्याच्या खेडोपाडी अनेक गावांमध्ये प्रथा व परंपरेने चालत आलेल्या नवसाला पावणाऱ्या देव-देवींच्या वार्षिक यात्रा भरायला सुरुवात होते. काकणबर्डी देवस्थानाला पौराणिक आधार पाचोरा शहरापासून अवघ्या २ ते ३ कि.मी.अंतरावर व गिरड रस्त्याच्या कडेला उत्तरेस असलेल्या टेकडीवर…
भगीरथ शाळेत आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक सुदाम निकम यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तके वाचून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारावे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुदाम निकम यांनी केले. जळगाव शहरातील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. त्यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आर. डी. कोळी यांनी ‘उपकार ‘कविता सादर केली. आर. डी.पाटील, ज्येष्ठ शिक्षिका आर. जी.सपकाळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. शाळेची माजी…
परमपूज्य व्यास स्वरूप शास्त्री श्री भक्तीस्वरूपदासजी यांचे प्रतिपादन साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी कृष्णाने कालिया नाग मर्दन केले. त्याआधी स्वतः कद्दू क्रीडा (चेंडू) खेळत होते. शारीरिक क्रीडा खेळण्यामुळे शरीराचा चांगला विकास होत असतो. त्या माध्यमातून मनाचा व बुद्धीचा पण विकास होत असतो. मुलांमध्ये संघटन शक्ती वाढत असते आणि म्हणून प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना जेवढे बनेल तेवढं जमिनीशी जोडून ठेवण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळ खेळण्याचे प्रयत्न करायला पाहिजे, असे प्रतिपादन शास्त्री श्री भक्ती स्वरूपदासजी यांनी श्री स्वामिनारायण मंदिर कोरपावलीद्वारा आयोजित श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायण कथेच्या सहाव्या दिवशी कथेच्या माध्यमातून केले. आज कालची पिढी मैदानी खेळ न खेळता मोबाईलच्या आहारी गेलेली आहे.…
भाजपाला मुख्यमंत्री पद मिळाल्याबद्दल जल्लोष साजरा साईमत/यावल/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी घेतली. याबद्दल यावल शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, बाळू उर्फ हेमराज हेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राकेश फेगडे, पुंडलिक बारी, अरुण पाटील, बबलू घारू, पी.एस.सोनवणे, सागर चौधरी, श्री.पाचपांडे, उमेश पाटील, मुकेश कोळी, वेंकटेश बारी, किशोर कुलकर्णी, विशाल शिर्के, युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज बारी, तेजस पाटील, दीपक चौधरी,…
फैजपूरला नायब तहसीलदारांना हिंदु जनजागृती समिती, इस्कॉन, हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवेदन साईमत/फैजपूर/प्रतिनिधी बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर पाशवी अत्याचार केले जात आहेत. तेथील शासन अन् प्रशासन देखील त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहाय्य करत आहे. आता तर तेथील हिंदू नेते, साधू संत यांनाही खोट्या आरोपात अडकवण्याचे षडयंत्र बांगलादेशात केले जात आहे. याविरुद्ध बांगलादेशला खडे बोल ऐकवून तेथील हिंदूंचे रक्षण भारत सरकारने करावे, अशा मागणीचे निवेदन फैजपूर येथील नायब तहसीलदार जगदीश गुरव यांना इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादीतर्फे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश सरकारवर दबाव आणून इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे…
संत मुक्ताबाई महाविद्यालयात लेवा गणबोली दिन साजरा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी येथील संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त लेवा गण बोली दिन साजरा करण्यात आला. कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर व जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील होते. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने लेवा गणबोली दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला डॉ.संदीप माळी म्हणाले की, बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे आहे. भाषा, समाज आणि संस्कृती हे घटक देशाला एका सामाजिक धाग्यामध्ये बांधून ठेवणारे आहेत.…
दिव्यांग दिनानिमित्त दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन विशेष चर्चासत्राला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी सर्व क्षेत्रात जवळपास दिव्यांगांना संधी उपलब्ध आहेत. शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्या आता दिव्यांग व्यक्तींना संधी देत आहेत. सर्व समावेशकता आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार अनुकूलता आणि सुलभता निर्माण होणे आवश्यक आहे. समाजात विविध इन्फ्रास्ट्रक्चर्स विकसित करणे आवश्यक आहे. अनेक संस्था यासंदर्भात प्रबोधन आणि प्रशिक्षण देत आहेत. ज्यामुळे संधी उपलब्ध होऊ शकतात. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जागरूकता निर्माण होणे, ॲक्सेसिबल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणामुळे दिव्यांगांना अडचणींवर मात करता येईल, अश्या भावना आयुषी (IAS) यांनी व्यक्त केल्या. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे आयोजित ऑनलाईन विशेष चर्चासत्रात आयुषी, प्रज्ञाचक्षू (IAS) यांनी “विविध क्षेत्रांतील…