संविधान स्पर्धेत मयुरी कोळी, गिरीश पाटील प्रथम साईमत/जळगाव/प्रतिनिधी शासनाच्या भारतीय संविधान अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत कै. सुनिता जगन्नाथ वाणी- भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये ‘घर घर संविधान’ कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. त्यानिमित्त शाळेत संविधान उद्देशिकेचे पठण, वर्गावर्गात वाचन, संविधान उद्देशिकेची सामूहिक शपथ, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, संविधानाची निर्मिती व संविधानातील विविध मूल्यांची माहिती देणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यात शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. उपक्रमशील शिक्षक आर.डी. कोळी उपक्रमाचे प्रमुख आयोजक होते. याप्रसंगी घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण अशोक पारधे व वैशाली बाविस्कर यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी,…
Author: Sharad Bhalerao
परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रासह पुष्पगुच्छ देऊन गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचा अखंड १४ वर्षापासून सलग १०० टक्के इंग्रजी ग्रामर परीक्षेचा निकाल लागलेला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी ज्युनियर, इंग्रजी सिनीअर, इंग्रजी ग्रामरच्या परीक्षा घेतल्या जातात. सर्वात विशेष बाब म्हणजे शाळेचा निकाल १४ वर्षापासून १०० टक्के लागत आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक किशोर पाटील, किरण पाटील १४ वर्षापासून शाळेव्यतिरिक्त सकाळी ११ ते १२ व प्रत्येक रविवारी सकाळी १०ते १२ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन केले जाते. त्याचेच चांगले परिणाम म्हणजे इंग्रजी ग्रामर परीक्षेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.…
अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, सचिवपदी विठ्ठल पाटील बिनविरोध साईमत।भडगाव।प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या भडगाव तालुका पत्रकार संघाची बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुनील पाटील, सुधाकर पाटील, सोमनाथ पाटील, संजय पवार, सुनिल कासार, सागर महाजन यांच्या उपस्थित एकमताने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, सचिवपदी विठ्ठल पाटील तर उपाध्यक्षपदी पुरूषोत्तम महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच धनराज पाटील, सहसचिव एस.डी.खेडकर, कार्याध्यक्ष जावेद शेख, प्रसिध्द प्रमुख नितिन महाजन, कायदेशीर सल्लागारपदी भरत ठाकरे, ज्येष्ठ सल्लागार परमेश्वर मोरे, सुरेश कोळी, सदस्यपदी लिलाधर पाटील, भास्कर शार्दुल, आर.के. मिर्झा, सुभाष ठाकरे यांची निवड करण्यात आली. बैठकीत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर…
महाविद्यालयाचे मैदान ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांची काढली रॅली साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ अंधशाळा, प्रियदर्शनी वनश्री दादासाहेब डी.डी.चव्हाण बहुविकास कृषी संस्था संचलित डी.डी.चव्हाण मूकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा हिरापूर रोडवरील नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे मैदान ते श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात…
तहसिलदारांसह पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन साईमत/भडगाव/प्रतिनिधी बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांनी हिंदू आणि गैर-मुस्लिमांवर कहर सुरू केला आहे. जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरवादी संघटनांवरील बंदी हटवून कट्टरवाद्यांना मुक्त हात दिल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत.गेल्या २ महिन्यांपासून हिंदू मंदिरे आणि वस्त्या जळून खाक झाल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना घेरून मारले जात आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात १० डिसेंबर रोजी सकाळी १० वा. भडगाव येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने भडगाव तहसिल कार्यालय प्रांगणात ठिय्या आंदोलन करुन दुपारी तहसीलदार शीतल सोलाट व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन देण्यात आले. समस्त हिंदू…
टाकळी फाट्याजवळील घटना साईमत/सोयगाव/प्रतिनिधी शिक्षक दुचाकीने शाळेतून घरी जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी झाले. ही घटना टाकळी फाट्याजवळील मोताळा येथे घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सविस्तर असे की, मोहन त्र्यंबक सालवे हे शाळेतून दुचाकीने (क्र.एम.एच.२८ बी.झेड.५२४६) घरी जात असताना समोरून येणारी अज्ञात वाहनाच्या (क्र.एम.एच.१२ जी.एफ.४४३९) चालकाने जोरदार धडक दिल्याची घटना गेल्या २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता टाकळी फाटा, मोताळा येथे घडली होती. अपघातात शिक्षकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागेवरच जखमी अवस्थेत पडून…
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी.बी.जगत्पुरिया यांचा नागपूर येथे दि.२८ व २९ डिसेंबरला होणाऱ्या ‘अक्षरक्रांती’ आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मान होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षानी कथाकार सुरेश पाचकवडे तर उद्घाटक म्हणून कन्हेरे फाउंडेशनचे किशोर कन्हेरे असतील. विशेष पाहुणे म्हणून ९७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, टोकियो, जपान येथील कादंबरीकार उर्मिला देवेन उपस्थित राहतील. साहित्य संमेलन नागपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, येथे होईल. डी.बी. जगत्पुरिया यांच्या नावावर मराठी, हिन्दी कविता संग्रह, सत्त्वसार, मूल्याक्ष, दस्तऐवज असे पाच समीक्षा ग्रंथ सामाजिक वैचारिक गंध, दौलत हा कथा संग्रह, नाटक, एकांकिका असे लेखन प्रकाशित आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील…
दहा वर्षांपासून संस्था राबवतेय स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी समाज चिंतामणी प्रतिष्ठान या शासन मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेतर्फे उनपदेव येथील आदिवासी पाड्यावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी. बी. महाजन, ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण, कवी अशोक पारधे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांच्या हस्ते नवे- जुने ड्रेस, साड्या, पंजाबी ड्रेस, कोट,स्वेटर, कानटोप्या, शाली अशा विविध एक हजार वस्त्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुलांना लाडू वाटप करण्यात आले. त्यामुळे पाड्यावरील अबालवृद्ध आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. गेल्या दहा वर्षापासून समाज चिंतामणी प्रतिष्ठान वस्त्रदानाचा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. त्यामुळे शेकडो आदिवासी, गरजूंना उपक्रमाचा लाभ झाला आहे. त्याबद्दल प्रतिष्ठाचे सर्वत्र कौतुक होत आहे.…
अ.भा.ग्राहक पंचायततर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनीधी- जिल्हाभर जनहितासाठी प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २४ डिसेंबर रोजी ग्राहकदिन साजरा करण्यात यावा, अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख यांनी ९ डिसेंबर रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुषमा मेघश्याम उरकुडे यांना दिले आहे. याप्रसंगी पाचोरा तालुकाध्यक्ष संजय पाटील, तालुका संघटक ॲड. निलेश सूर्यवंशी उपस्थित होते. २४ डिसेंबर ग्राहकदिन साजरा करतांना कार्यक्रमास रेशन दुकानदार, व्यापारी, गॅस एजन्सी डीलर्स, वजनमाप निरीक्षक, प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी, पंचायत समिती, नगरपालिका, भुमापन, पोलीस अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, मोबाईल कंपनी प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी, किराणा व भुसार माल विक्रेते, हॉटेल चालक,…
वेळेवर लागणारे लग्न लागतेय उशिरा तुळशीचे लग्न झाले आणि लग्नाचा बार उडाला. परंतु, आधुनिकतेच्या नावावर दिवसेंदिवस विवाह सोहळ्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण बिघडत आहे. वेळेवर विवाह पार पडत नाही, मग मुहूर्त काढतातच कशाला, असा प्रश्न वऱ्हाडी मंडळींकडून उपस्थित केला जातो आहे. विवाह समारंभात येणाऱ्या बँड, बाजा आणि डी.जे. मुळे विवाह सोहळे उशिरा पार पडत आहेत. विवाह सोहळा म्हणजे दोन कुटुंबाचा एकत्र येण्याचा एक शुभ क्षण होय. त्यामुळे लग्नकार्यात नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रांसह अनेक जण एकत्र येतात. हल्लीच्या लग्न सोहळ्यात लावण्यात येणारे डी. जे. ऑक्रेस्ट्रा यांचा गोंधळ वाढत चालला आहे. परिणामी लग्न विधीला कमालीचा विलंब होत असल्याने वेळेवर लागणारे…