सोलापूर : वृत्तसंस्था :सोलापुरात एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेश करण्यासाठी या भाजपा नेत्याला तब्बल पाच तास वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश पार पडला आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले. सोलापुरातील बाळे येथे हा…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी: 1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. याबाबत आता प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे.दरम्यान पाचवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होण्याची दाट शक्यता आहे.त्यादृष्टीने पडताळणी करण्यात येत आहे. शाळांसोबत आढावा बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. शाळांकडून आलेल्या प्रतिसादानंतरच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. निर्बंध कमी झाल्यावर हॉटेल, सिनेमागृह खुली झाली आहेत. मात्र शाळांमध्ये उपस्थिती अजूनही ऐच्छिक आहे. तसेच विद्यार्थी संख्येवरही मर्यादा आहे. आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण अधिकारी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून अभिप्राय मागवत आहेत. पाचवी ते…
मॉस्को : वृत्तसंस्था रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून यामुळे तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या…