जळगाव : प्रतिनिधी: सागर पार्क मैदानावर सोमवारी लेवा पाटीदार सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक अंतर्गत लेवा पाटीदार प्रीमियर लिगला दुसऱ्या दिवसी एकूण 8 सामने झाले. दुसरा दिवसही फलंदाजांनी गाजला. सोमवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य अस्मी एकर्स संघाने ठेवलेले 166 धावांचे लक्ष्य सोयो सनरायडर्स संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत आव्हान कायम ठेवून जिंकले. जयेश नारखेडे याने शेवटच्या शतकात सलग तीन षटकांर लगावत हा सामना जिंकल्याने तो सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात भूमी वॉरियर्स संघाने दिलेले 124 धावांचे लक्ष्य धनंजय ॲग्रो संघाने नवव्या षटकांतच पूर्ण केले. तिसऱ्या सामन्यात एकनाथ ऑटो रायडर्स संघाने दिलेले 129 धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी पंकज भुसावळ संघाने नवव्या षटकांतच…
Author: Saimat
भुसावळ ः प्रतिनिधी: येथील जळगाव नाक्या जवळील सरदार वल्लभभाई पटेल पुतळा परिसरात रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप तर्फे रक्तदान व रक्तगट नोंदणी शिबीर घेत शिवजयंती साजरी करण्यात आली. रक्तदान व रक्तगट नोंदणी शिबीराचे उद्घाटन पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या शिबीरामध्ये 29 पुरुष व 5 महिला असे एकुण 34 रक्तदाते यांनी रक्तदान केले. तसेच नवीन 114 रक्तदात्यांनी रक्तगट नोंदणी केली. या ग्रुप जवळ एकुण 234 रक्तदात्यांची सुची आहे. भविष्यात ज्यांना रक्ताची गरज असेल त्यांनी 8857070444 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी आयोजिकांनी…
सावदा ता. रावेर : प्रतिनिधी:राज्यकर्त्याकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव दिला जात नसेल तर, किमान शेतमालाचे संरक्षण तरी करावे.अशी संतप्त प्रतिक्रिया सावदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रोझोदा येथील कामसिद्ध महाराज मंदिरावरती परिसरातील शेतकरी शेतमाल व शेत सामग्री चोरांच्या विरुद्ध शेतकरी मोठ्या प्रमाणात एकवटला होता. यावेळी रोझोदा येथील रमेश महाजन, चिमण धांडे, मिलिंद वायकोळे, रवींद्र चौधरी, विजय महाजन, दीपक धांडे (रोझोदा उप सरपंच ) चीनवलं येथील गोपाळ नेमाडे, श्रीकांत महाजन, दामोदर महाजन, योगेश बोरोले, (चीनवलं सरपंच ) सावखेडा येथील प्रमोद महाजन, हेमंत महाजन, भागवत महाजन, नामदेव महाजन, हिरामण महाजन खिरोदा येथील किशोर चौधरी कोचूर येथील कमलाकर पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था: मार्च महिना सुरू होण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकांची सुट्टीची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्यांसह महाशिवरात्री आणि होळीच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार मार्च 2022 मध्ये बँका 13 दिवस बंद राहतील. आपल्या देशात प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि तिथले सणही वेगळे आहेत. यावेळी मार्च महिन्यात अनेक स्थानिक सण येत आहेत. मात्र, या कालावधीत ऑनलाइन सेवा सुरू राहतील. मार्च 2022 मध्ये पहिल्याच दिवशी महाशिवरात्री आहे आणि 17 आणि 18 मार्चला होळी आहे. या निमित्ताने सुट्टी असेल. यासोबतच अनेक राज्यांतील स्थानिक सणांच्या दिवशी बँकाही…
ठाणे : वृत्तसंस्था:एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना उद्या कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करताना खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या नवी मुंबईतल्या बारचा परवाना रद्द केला होता. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी वानखेडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.…
मुंबई : प्रतिनिधी: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस प्रकरणी मोठी अपडेटसमोर येत आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना अटक केली. वर्सोवा येथून एका आरोपीला तर बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एक कास्टिंग डायरेक्टर आहे, आणि बाकीचे 3 त्याचे सहकारी आहेत. वर्सोवा येथून एक आणि बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून चौघेही फरार होते. या आरोपींवर मॉडेल्सना पॉर्न फिल्म शूट करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे समोर आली आहेत. नरेशकुमार रामावतार पाल (29), सलीम गुलाब सय्यद (30), अब्दुल गुलाब सय्यद (24), अमन सुभाष बरनवार…
रांची : वृत्तसंस्था:उत्तराखंडमधील कुमाऊं येथे एका रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व लोक लग्न समारंभातून परतत होते. यादरम्यान कार दरीत कोसळल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ ग्रामस्थ आणि पोलिस दाखल झाले. त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 13 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीतील सर्व प्रवासी हे टनकपूर येथील पंचमुखी धरमशाळा येथे लग्नासाठी गेले होते. लग्न सोहळा…
लिसबोन : वृत्तसंस्था:पोर्तुगालच्या अझोरेस बेटांच्या किनार्याजवळ गेल्या आठवड्यात 4 हजारांपेक्षा जास्त लक्झरी कार घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग लागली होती. या आगीत रसेल ग्रुपच्या अंदाजानुसार सुमारे 401 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या कारचे नुकसान झालं आहे. आगीमुळे जहाजावरील जवळपास सर्व वाहनांचं नुकसान झाल्याचा सांगण्यात येत आहे. पोर्शे, ऑडी आणि बेंटले आणि लॅम्बोर्गिनी या फोक्सवॅगन ग्रुपच्या जवळपास 4 हजार कार या जहाजात होत्या. वाहनांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीला अंदाजे 155 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे तर, इतर ऑटो कंपन्यांनी सुमारे 246 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची वाहने गमावली आहेत. जहाजाला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही. फेलिसिटी एस हे जहाज दाजे तीन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था: रशिया-युक्रेन संकट अधिक गडद झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील वातावरण खराब झाले आहे. आशिया, युरोपपासून रशियापर्यंतच्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर एक्सचेंज लिमिटेडमध्ये निफ्टी 175 अंकांनी घसरला आहे. तर डाऊ फ्युचर्स सुद्धा 500 अंकांच्या आसपास खाली आहे. दरम्यान, युक्रेन-रशिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सध्या, निफ्टी 234.10 अंकासह 16,972.55 च्या पातळीच्या आसपास दिसत आहे. त्याच वेळी, सेन्सेक्स 1001.61 टक्क्यांनी घसरून 56,681.98 च्या पातळीवर आहे. रशियाने दोन फुटीरतावादी प्रांतांना मान्यता दिली आहे. त्याचवेळी रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. या कीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. भारतीय शेअर…
सोलापूर : वृत्तसंस्था :सोलापुरात एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेश करण्यासाठी या भाजपा नेत्याला तब्बल पाच तास वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश पार पडला आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले. सोलापुरातील बाळे येथे हा…