यावल : प्रतिनिधी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण चितोडा येथे मोफत वाटप करण्यात आले. हे अभियान दाहावे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला चितोडा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या अभियानास एकूण 346 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. यावल तालुक्यातील चितोडा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास दहावे सत्राला सुरुवात करण्यात आली. हे अभियान चितोडा येथील ग्रामपंचायत जवळ घेण्यात आले. यावेळी मोफत ई-श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच…
Author: Saimat
जळगाव : युवा विकास फाउंडेशन व विष्णूभाऊ भंगाळे मित्र परीवार, जळगांव आयोजित केमिष्ट भुषण मा. सुनिलदादा भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे ऑनलाईन व्हीडीओ पध्दतीने हनुमान चालिसा पठण स्पर्धा 2022“ घेण्यात आली.सदर स्पर्धेत 589 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून व्हिडीओ पाठवले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना सोमवार दि. 22 रोजी सकाळी 10:30 वा. सरदार पटेल लेवा भवन, आंबेडकर मार्केटजवळ, जळगांव येथे बक्षीस वितरण समारंभ शासनाच्या नियमानुसार मोजक्या मान्यवर व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी चिमुकले राम मंदिरातील प.पु.दादा महाराज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहूणे प.पु. शास्त्री स्वामी नयनप्रकाश दासजी महाराज स्वामी नारायण…
जळगावः कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्याची निर्घूण हत्या करण्यात आली. ती अतिशन निंदनीय व निषेधार्ह आहे ही हतया विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडेलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे अशी विश्व हिंदु परिषदेची धारणा आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमाँक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरू केले आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे. कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदु परिषद तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पॉपुलर फ्रेंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमाँक्रेटीक पार्टी ऑफ…
चाळीसगाव( प्रतिनिधी)- दिनांक २०फेब्रुवारी (रविवार ) रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे समता शिक्षक परिषदेने आयोजीत कार्यक्रमात मा . नामदार गुलाबराव जी पाटील (पालक मंत्री जळगाव ) यांच्या हस्ते प्रभाकर पारवे सर (राष्ट्रीय विद्यालयाचे पर्यवेक्षक ),व दक्षता समितीचे सदस्य , )व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस . ) यांना महात्मा ज्योतिराव फुले समता पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक कामात उत्कृष्ट काम केल्याबद्दल देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . अण्णासाहेब डी.के. अहिरे (संस्थापक अध्यक्ष समता शिक्षक परिषद ) मा भरत जी शिरसाठ ( राज्य अध्यक्ष ) माध्यमिक समता शिक्षक परिषद मा . डॉक्टर अनिल झोपे (प्राचार्य…
मुंबई : प्रतिनिधी: राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बराच खल सध्या सुरू असताना आता थेट सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा फैसला होणार आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यामुळे 25 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मान्य केला, तर राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सर्वोच्च न्यायालयात याआधी झालेल्या सुनावणीनुसार राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आयोगानं आपला अंतरिम अहवाल सादर करावा, असे देखील…
दीपरंग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र,दीपनगरने राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचा पडदा उघडताच काल संभाजीराजे नाट्यगृहाच्या रंगमंचावर ‘कूस बदलताना` हे शाश्वत प्रेमाचा संदेश देणारे नाटक सादर करण्याचे धाडस केले मात्र विचार व तत्वाची ही कूस बदलताना लाभलेल्या संथगतीमुळे या नाटकाचाही ब्रेकअप होत गेला व रसिकांनाही ही कूस आल्हाददायक वाटण्याऐवजी पदरी निराशा पाडणारी वाटली.असो.असे असले तरी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र राज्य नाट्य स्पर्धेत जी सातत्याने हजेरी लावून प्रयत्नांची शिकस्त करीत आहे ती निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. कथासार जस जसा काळ बदलतो तस तसे माणसाचे आचार विचार व जीवनशैली बदलत जाते आणि त्यात काळानुसार बदल स्वाभाविकच आहे. बदलत्या आधुनिक काळात जीवनशैली मध्ये माणूस जबाबदारी…
जळगाव: रावेर येथील बऱ्हाणपूर रोड वरील आठवडे बाजाराजवळील देसर्डा जीनमधील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडने शिवजन्म साजरा करीत पाळणा म्हणत शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. शिवराय मनामनात…शिवजयंती घराघरात… या जयघोषाप्रमाणे प्रत्येक दारी व शिवजन्मउत्सवाचे ठिकाणीसुध्दा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. व पाळण्यात प्रत्येक्ष लहन मुलाला टाकून दोरीने पाळणा हलवीत गोड आवाजात शिवजन्मावर आधारीत पाळणाही म्हणण्यात आला. सर्व महिलांनी व मुलींनी नऊवारी परिधान करून नाकात नथ घातल्या होत्या. तसेच यावेळी फुगडी देखील खेळण्यात आली. सखुबाई पाटील, उषा पाटील, संगीता महाजन, सविता पाटील, शोभा पाटील, माधुरी पाटील, विमल पाटील, संगीता महाजन, मंगला पाटील, लिना महाजन, नयना पाटील, सुवर्णा पाटील, वेशाली पाटील, आशा पाटील,…
जळगाव : प्रतिनिधी: कणकवलीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान परिवर्तन कला महोत्सव होत आहे. एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला खान्देशचा महोत्सव कोकणात पहिल्यांदा होतो आहे. काही वर्षांपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द होते. राज्यभरातील महोत्सवाची सुरुवात कणकवली येथून होत आहेत. महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार या कार्यक्रमाने 25 फेब्रुवारी रोजी होईल. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन, दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. 26 रोजी श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील नाट्यरूपांतरित योगेश पाटील दिग्दर्शित नली` एकलनाट्य, 27 फेब्रुवारी रोजी…
जळगाव ः प्रतिनिधी: राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांचा ऊहापोह नवी मुंबई येथे झालेल्या एकदिवसीय परिषदेत करण्यात आला. या परिषदेत बँकांच्या अडचणींवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद वाशी (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सभागृहात सोमवारी झाली. देशाचे सहकार नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. पवारांनी जिल्हा बँक कारभारासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत जिल्हा सहकारी बँकेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे या परिषदेचे…
जळगाव : प्रतिनिधी: सर्वसामान्य वंचित समुहांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांना महात्मा फुले समता शिक्षक परिषदेने महात्मा फुले समता पुरस्कार देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षणाधिकारी विकास पाटील,महात्मा फुले समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ, डायट चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे,सिव्हील राईट प्रोटेक्शन् सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण,रविकिरण बिऱ्हाडे,डॉ.सत्यजित साळवे,विश्वास पाटील,शैलेश दखणे, खलिल शेख,मुकुंद नन्नवरे,अनिल सुरळकर आदी उपस्थित होते. म.फुले समता परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रास्ताविक करताना सत्यशोधक विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा संघटनेचा…