शिक्षणशास्त्र व अध्यापक विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्सव; ‘झेप’ अंकाचे थाटात प्रकाशन साईमत चोपडा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेचा वर्तमान पिढीला महत्त्व पटवून देणारा जिजाऊ–विवेकानंद जयंती कार्यक्रम प्रताप विद्या मंदिराच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला. मुख्य वक्ते पंकज शिंदे यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले, “राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांच्या रूपाने स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकारले, तर स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा डंका सातासमुद्रापार नेला. आजच्या पिढीला त्यांच्या कर्तव्याची आणि विचारांची नितांत गरज आहे.” कार्यक्रमात शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील, तसेच डॉ. सविता जाधव, सुजय धनगर, महेंद्र पटेल, योगिता बोरसे व…
Author: Saimat
साईमत मुंबई प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा गती मिळाली असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगूल अधिकृतपणे वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होणार असून, २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजेनंतर अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडत विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, “चार-चार दिवस आम्हाला डोळ्याला डोळा लावता आला नाही, जेवणही नीट झालं नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्याने थोडा तरी आराम मिळाला,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये एमआयएमसोबत युती झाल्याच्या आरोपांवर बोलताना गिरीश महाजन यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. “आमची कुठेही एमआयएमसोबत युती झालेली नाही. कोणीही उठून काहीही बोलतं. जळगाव, नाशिक किंवा इतर ठिकाणी युती झाली, याला कोणताही ठोस आधार नाही.…
साईमत प्रतिनिधी ‘विकसित भारत’च्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची दिशा देणाऱ्या Viksit Bharat Young Leaders Dialogue (VBYLD) या महत्त्वाच्या मंचावर देशभरातील युवा नेतृत्वाने अभ्यासपूर्ण, दूरदृष्टीपूर्ण आणि धोरणात्मक मांडणी करत राष्ट्रनिर्मितीबाबतची आपली बांधिलकी अधोरेखित केली. या संवादात सहभागी होताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्यासमवेत युवा नेत्यांच्या ट्रॅकनिहाय सादरीकरणांना उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याची माहिती केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा खडसे यांनी दिली. या संवादात युवकांनी लोकशाही व प्रशासनातील युवकांची भूमिका, महिला-नेतृत्वाधारित विकास, फिट भारत – हित भारत, तसेच भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ उभारणी या महत्त्वाच्या विषयांवर सखोल संशोधनावर आधारित कल्पना मांडल्या. या सादरीकरणांतून तरुणांची स्पष्ट दृष्टी, धोरणात्मक जाण…
साईमत पारोळा प्रतिनिधी पारोळा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाने संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत महत्त्वाची जबाबदारी वाटप प्रक्रिया पूर्ण केली असून नगरसेवक अमृत (नाना) चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आगामी उपनगराध्यक्ष निवडणूक तसेच नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ही निवड राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वी शिवसेना शिंदे गटाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नगरसेवकांच्या एकमताने अमृत चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. याच बैठकीत पंकज मराठे यांची उपगटनेतेपदी तर नितीन सोनार यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणताही मतभेद न होता सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे गटातील एकजूट आणि संघटनात्मक शिस्त अधोरेखित झाली आहे.…
साईमत वृत्तसेवा देशाच्या संसदीय इतिहासात यंदा एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार असून, १ फेब्रुवारी २०२6 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत Budget 2026 मांडणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर होणार असल्याची अधिकृत घोषणा करताच राजकीय व आर्थिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यंदाचा अर्थसंकल्प विशेष महत्त्वाचा मानला जात असून, निर्मला सीतारमण यांचा हा आठवा केंद्रीय अर्थसंकल्प असणार आहे. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या त्या देशातील मोजक्या अर्थमंत्र्यांपैकी एक ठरणार आहेत. दरम्यान, केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय…
साईमत वृत्तसेवा भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरवणारी अत्यंत दु:खद घटना गुरुवारी समोर आली. मिजोरमचे माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरूआटा यांचे स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या ३८व्या वर्षी काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने मिजोरमसह संपूर्ण देशातील क्रिकेट वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वेंगनुआई रेडर्स क्रिकेट क्लबकडून खेळत असलेले लालरेमरूआटा एका स्थानिक स्पर्धेत सहभागी झाले होते. फलंदाजी आटोपल्यानंतर ते पवेलियनकडे परतत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मैदानावरच कोसळले. उपस्थित सहकाऱ्यांनी व आयोजकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका हेच त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात येत…
साईमत अकोला प्रतिनिधी राज्यात एकीकडे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची आकोट तालुक्यातील मोहाळा गावात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कशी घडली थरारक घटना? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने चाकूने पटेल यांच्या पोटात व मानेवर दोन ते तीन गंभीर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि पटेल जागीच कोसळले. या घटनेचा थरारक व्हिडिओही…
साईमत मुंबई प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शिगेला एका धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर अज्ञात इसमाकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना वांद्र्याच्या ज्ञानेश्वर नगरात घडली, जिथून पोलिस आणि शिवसैनिक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे तपशील मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू भोसकला. घटनेनंतर त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना वॉर्ड क्रमांक 92 मध्ये घडली, जिथे महापालिका निवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवार मैदानात आहेत. 92 वॉर्डमधील राजकीय स्पर्धा शिंदेंच्या शिवसेना – हाजी सालिन कुरेशी शिवसेना (ठाकरे गट) –…
साईमत जळगाव प्रतिनिधी पुढील पाच वर्षांत जळगाव शहराचा सर्वांगीण कायापालट करून ते अधिक विकसित, आधुनिक आणि नागरिकाभिमुख शहर म्हणून उभे केले जाईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जळगाव संदर्भातील विविध राजकीय, सामाजिक व वैचारिक मुद्द्यांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. वीर सावरकरांविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांबाबत आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम आहे. वीर सावरकरांचा कोणताही प्रकारचा विरोध आम्हाला मान्य नाही. त्यांच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. अजित पवार यांनी सावरकर विचारांचा विरोध केल्याचे आपल्याला माहित नाही. त्यांनी तसे केले असेल का, याची खात्री नाही; मात्र भाजपची भूमिका याबाबत ठाम आहे. जळगाव…