Author: saimat

कामावरून परतत असताना पाय घसरून तरुणाचा मृत्यू साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील ४५ वर्षीय कष्टकरी संजय मणिलाल पाटील यांचा ३ मार्च रोजी गिरणा नदीत पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली, ज्यामुळे संपूर्ण आव्हाणे गावावर शोककळा पसरली आहे. संजय पाटील हे एका मिस्तरीकडे कामाला होते. मंगळवारी धरणगाव तालुक्यातील काम आटोपून ते पायी आव्हाणे गावाकडे परतत होते. दुपारी नदीतून जाताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात बुडाले. नदीकाठी उपस्थित नागरिकांनी तातडीने धाव घेत संजय यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आव्हाणे परिसरात गिरणा नदीत…

Read More

भुसावळात गुरुद्वारासमोर घडली घटना; बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/भुसावळ /प्रतिनिधी: शहरातील संगतसाहेब गुरूद्वारा समोर दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका कापड व्यापाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३ मार्च) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनुसिंग दिपसिंग बावरा (वय ४२), रा. भुसावळ, हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या कामानिमित्त गुरुद्वाराजवळ आले होते. त्यांनी आपली दुचाकी संगतसाहेब गुरुद्वारासमोर पार्क करून उभी केली. याच कारणावरून संशयित भुषण मिस्तरी उर्फ बॉबी, प्रसाद किनगे उर्फ खब्या व त्यांच्या सोबत असलेल्या १० ते १५ जणांच्या जमावाने संताप व्यक्त करत सोनुसिंग बावरा यांना…

Read More

पोलिसांवरही दगडफेक; वाहन जप्त, गुरे गोशाळेत दाखल साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात अवैध गुरे वाहतूक प्रकरणावरून निर्माण झालेल्या तणावात थार गाडीची तोडफोड करत दोन तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी संबंधित वाहन जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी रात्री मास्टर कॉलनी परिसरात गुरांची वाहतूक करणारी एक गाडी अडवली. अवैध तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी विरोध केला. यानंतर गुरांची वाहतूक करणारे आणि विरोध करणारे तरुण यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. संतप्त जमावाने थार गाडीची…

Read More

वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी जळगाव शहरातील आशाबाबा नगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत बंद घर फोडून तब्बल ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोपाळ दिनकर चौधरी (वय ५१, रा. आशाबाबा नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून हॉटेल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ३ मार्च रोजी रात्री साडेबारा ते पहाटे दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात कोणतीही परवानगी…

Read More

शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक भयग्रस्त; प्रभाग ७ मध्ये कुत्र्यांचा टोळक्याचा प्रादुर्भाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ७ मधील विविध वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने नगरसेविका अंकिता पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याबाबत निवेदन सादर केले आहे. नगरसेविकांच्या निवेदनानुसार, प्रभागातील शिवकॉलनी परिसरातील गट क्रमांक ६० व १४, वर्धमान हावट्स परिसर, आशाबाबा नगर आणि आर.एम.एस. कॉलनी येथे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक दररोज भीतीच्या वातावरणात राहावे लागत असून रस्त्यावरून ये-जा करताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः  शाळेत जाणारी लहान मुले, सकाळ-संध्याकाळ फिरणारे ज्येष्ठ…

Read More

महानगरपालिकेच्या यंत्रसामग्रीत भर; नगरपालिकेची क्षमता वाढली साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहराच्या स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापन कार्यात मोठा टप्पा घेऊन महानगरपालिकेच्या ताफ्यात सोमवारी नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण उत्साहात पार पडले. यामध्ये अग्निशमन विभागासाठी दोन उच्च क्षमतावाले वाहन आणि आरोग्य विभागासाठी तीन नवीन जेसीबी वाहनांचा समावेश आहे. जेसीबी वाहनांचे लोकार्पण महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते आकाशवाणी चौकात करण्यात आले. लोकार्पणानंतर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वेस्ट मटेरियल उचलण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. महापौर काळे यांनी सांगितले की, “या यंत्रसामग्रीच्या मदतीने महामार्गाची स्वच्छता नियमित आणि चकाचक राखणे सोपे होईल.” नवीन जेसीबी वाहनांच्या मदतीने महामार्गावरील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून लगेचच साफसफाईस…

Read More

अजित पवारांचा बाजार समितीत मार्चमध्ये अनावरण होणार महाराष्ट्रातील पहिला शेतकरी पुतळा साईमत/अमळनेर/प्रतिनिधी: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारला जाणार असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले की, मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुतळ्याचे अनावरण होईल. या निर्णयामुळे अमळनेर तालुक्यात राजकीय तसेच सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांचे अमळनेरशी विशेष नाते आहे. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या सहकार्याने तालुक्यातील विकासाला गती मिळाली. बाजार समितीच्या आर्थिक शिस्त आणि…

Read More

धरणगाव तालुक्यात ‘जलसंकल्प’ अभियानाचा जोरदार शुभारंभ साईमत/पाळधी/धरणगाव /प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाई आणि पुराच्या धोके टाळण्यासाठी “जलसंकल्प धरणगावचा : पाणी अडवा–पाणी जिरवा, शेती समृद्ध करा” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील नाले, नदीपात्र आणि बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच जमिनीची सुपीकता आणि भूजल पातळी सुधारण्याचे काम सुरू होणार आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करत सांगितले, “आज मी पालकमंत्री म्हणून नाही, तर शेतकरी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. पाणी म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आहे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा.” महत्त्वाचे मुद्दे आणि…

Read More

चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली सुनील पाटील (वय ४०) या १ मार्च रोजी दुपारच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकावरून प्रवासासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. गर्दीमुळे चोरी नेमकी कधी आणि कशी झाली हे त्यांना तत्काळ समजू शकले नाही. काही वेळानंतर…

Read More

सकाळी कीर्तन, सायंकाळी महाआरती अकलूद शिवारात धार्मिक उत्सवाची शोभा साईमत/फैजपूर/ पाडळसे/ /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावदा–फैजपूर रोडवरील पाडळसे येथील अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुमारे दहा लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा असून, परिसर आधीपासूनच भक्तिमय उत्साहाने न्हालेला आहे. स्थानिक आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांनी पांडाल उभारणी, आकर्षक मंच सजावट, अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था तसेच मोठ्या एलईडी स्क्रीनची सोय पूर्ण केली आहे. तसेच सर्व सुविधा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि विस्तीर्ण वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत पार पडावे यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षही…

Read More