पिंपरी- चिंचवड : पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकते. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही.अचानक मार्च २०२१ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बंँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत. हे सिरम कडून आलेले कमिशन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, पैसे कसे ढापायचे…
Author: saimat
हिंगोली : जिल्ह्यातील डिग्रस वाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सख्ख्या मुलानेच आई, वडील आणि भावाचा खून केला असल्याने या घटनेला नवीन वाचा फुटली आहे. मृत आई-वडील आणि भाऊ हे सतत बदनामी करत आहेत, हा राग मनात धरून त्याने तिघांचा खून केला असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. बासंबा पोलिसांनी आरोपी मुलगा महेंद्र जाधव याला अटक केली आहे. डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी (११ जानेवारी) सकाळी आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला होता. कुंडलिक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलिक…
लातूर : लातूरमध्ये एका शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने एकजण ठार व तीन जखमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील लामजना पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. लातूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतले आहे. शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झाले आहे. निलंगा – औसा रोडवरील लामजना पाटीजवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. त्या धडकेत दुचाकी ४० ते ५० फुट लांब फरपटत गेली.…
भागलपूर : एखाद्याचा द्व्ेष कुठल्या थराला जाऊ शकतो याचे एक अत्यंत भयंकर उदाहरण भागलपूरमध्ये पाहायला मिळाले. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरच्यांनी दिड वर्षांच्या चिमुकलीसह जोडप्याला संपवले. ही घटना नवगचिया पोलिसांच्या हद्दीतील गोपालपूरच्या नवतोलिया गावातील आहे. नवतोलिया येथील रहिवासी चंदन कुमार (४०), त्यांची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी रोशनी कुमारी यांची हत्या करण्यात आली आहे. या तिघांची हत्या दुसरं कोणी नाही तर त्यांच्याच नातेवाईकांनी केली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून पिता-पुत्राने मिळून ही हत्या केल्याची माहिती आहे. चंदा कुमारीचे वडील प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग यांनी या तिघांचा अत्यंत निर्दयीपणे खून…
ठाणे : ज्या इंग्रजांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केले. त्या इंग्रजांना रामभक्तांमुळे मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. येत्या पाच वर्षांत ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यावेळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान असतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. ठाण्यातील सरस्वती विद्यालयाच्या प्रागंणात ३८ वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला मंगळवारपासून सुरू झाली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. यावेळी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ श्रीराम पूजा ते राष्ट्र पूजा ‘ या विषयावर व्याखान दिले. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती परंतु ज्या…
मुंबई ः निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन होणार असल्याने शिंदे यांच्यासमोरील आव्हान अद्यापही कायम आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांनी शिंदे यांच्यासह सर्वच आमदारांना पात्र ठरविले तसेच निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला.निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालांमुळे मुख्यमंत्री शिंदे यांना बळ मिळाले आहे. शिवसेना शिंदे यांचीच या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्वाळ्यामुळे भाजपही अधिक आनंदी आहे. कारण उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करून शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडे आहेत हे बिंबविण्याचा सातत्याने प्रयत्न भाजपकडून होत आहे.…
मुंबई : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी कासगंज येथे सांगितले की, संविधान आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी तत्कालीन सरकारने कारसेवकांना पाहताच त्यांच्यावर गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी तत्कालीन सरकारने आपले कर्तव्य बजावले होते. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य मंगळवारी गणेशपूर येथे बौद्ध एकता समितीच्या वतीने आयोजित बौद्ध जनजागृती परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले, त्यावेळी तत्कालीन सरकार आपले कर्तव्य बजावत होते. ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरात…
नगर ः राष्ट्रवादी कांँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद माजी सदस्य राणी लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत आपण किंवा पती आमदार लंके निवडणूक लढवणारच असा मनसुबा जाहीर करत, मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. महायुतीत नगर दक्षिण मतदारसंघात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे सध्या प्रतिनिधित्व करतात. पुन्हा उमेदवारी करण्यासाठी त्यांनी मतदारसंघात गावोगाव साखर आणि चणाडाळ वाटप करत जनसंपर्काची मोहीम सुरू केली आहे. राणी लंके यांनीही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्ष, चिन्ह कोणता याची वाच्यता न करता केवळ कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे. खासदार विखे व आमदार लंके दोघेही महायुतीत असले तरी दोघांतील…
नागपूर : भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामीळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल त्यांना आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते.साधारणपणे समुद्र सपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागातील घनदाट जंगलात २०१३ पासून संशोधनाचे काम चालू होते. या जंगलात अनेक लहानमोठे हिंस्त्र प्राणी आहेत. येथे राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे झाडाखाली राहात जेवढे सामान सोबत नेले, तेवढ्यावरच संशोधकांनी गुजराण केली. २०१५ ला अमित सैय्यद व त्यांच्या चमुला यश आले…
मुंंबई ः प्रतिनिधी येथील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून शिवसेना (ठाकरे गट)नेते,आदेश बांदेकर यांना हटवले आहे.आदेश बांदेकर यांच्याऐवजी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून सदा सरवणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची निवड झाली आहे. याबद्दल सदा सरवणकर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा!, असे प्रसाद लाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला होता…