मुंबई ः प्रतिनिधी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घराबाहेर गुरूवारी आंदोलन केले. भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नसल्याचं सांगत पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन् त्यातील पैसे तुम्हाला देतो, पण अशी जाहिरात करू नका, असे म्हणत बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सचिनच्या घराबाहेरील परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जुगाराची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत सचिनने काम करण्यावर बच्चू…
Author: Kishor Koli
मुलतान : वृत्तसंस्था स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानसमोर नेपाळचे आव्हान होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ १०४ धावांवर गारद झाला. पाकिस्तानने आशिया कप २०२३ची सुरुवात विजयाने केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्यांनी नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ २३.४ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. पाकिस्तानचा पुढील सामना…
जळगाव ः प्रतिनिधी येथील एमआयडीसी पी-15 मधील रहिवासी मीना सुनील बियाणी यांनी विविध झाडांच्या बियांपासून राखी तयार करून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम निसर्गाशी घट्ट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.झाडांच्या उंचीप्रमाणे दिवसेंदिवस प्रगती होवो, जीवनात चहूकडे हिरवळ राहो, फुलांसारखे सुंदर,रंगीबेरंगी प्रेम आपसात राहो,पर्यावरणाच्या सान्निध्यामुळे निरोगी व तंदुरुस्त जीवन लाडक्या भावांना लाभो असा प्रेमळ संदेश त्यांनी राखीच्या माध्यमातून दिला आहे
जळगाव ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीड़ा दिन व राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सॉफ्टफुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, सोलापुर शहर व जिल्हा बेसबॉल असो. व धर्मा भोसले सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुर जिल्ह्यातील क्रीड़ा क्षेत्रातील 93 विविध क्रीड़ा संघटना आणि 28 क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर नामवंत शैक्षणिक संस्था व 14 क्रीडा क्षेत्रातील निवृत्त मान्यवरांचा व क्रीडा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षेतेखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष विनोद भोसले, जिल्हा व राष्ट्रीय संघटनेचे सचिव प्रा.…
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था सर्बियाचा 23 ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी पुनरागमन केले. या विजयासह जोकोविच पुढील आठवड्यात नव्याने जाहीर करण्यात येणाऱ्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येणार हे निश्चित झाले आहे. कोरोनाची लस न घेतल्याने जोकोविच गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेत खेळू शकला नव्हता. अमेरिकेतील र्निबध उठवण्यात आल्यामुळे या वर्षी जोकोविचच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला. जोकोविचने दमदार पुनरागमन करताना सलामीच्या लढतीत फ्रान्सच्या ॲलेक्झांडर मुलरचा 6-0, 6-2, 6-3 असा सहज पराभव केला. कोकोचा विजयासाठी संघर्ष दरम्यान, महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफला पहिल्याच फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. पात्रता फेरीतून आलेल्या जर्मनीच्या लॉरा सिगमंडने कोकोला तीन सेटपर्यंत झुंजवले…
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांविरोधात थेट भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्षफुटीनंतर केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत विधान केले होते. त्यांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे, असेही अजित पवार म्हणाले होते. यानंतर आता सत्तेत सामील होण्याआधी शरद पवारांनी काय सल्ला दिला होता? यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. पक्षफुटीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “पाठिमागच्या काळात देशात अनेक वेळा अनेक गोष्टी घडल्या आहे. काँग्रेसमध्येही फूट पडली होती. बऱ्याच ठिकाणी बरंच काही घडलं आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की, आता असं काही घडू नये, आता काहींनी (शरद पवार) आशीर्वाद देण्याचे काम करावे. आम्ही तर…
कोल्हापूर : वृत्तसंस्था साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आजपासून गाभाऱ्यात जाऊन पुन्हा एकदा घेता येऊ लागले आहे. राखी पौर्णिमेच्या या भेटीमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. आज बुधवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. कोरोनाच्या काळात भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद करून पितळी उंबऱ्यापासून दर्शन दिले जाऊ लागले होते. त्यानंतरही हा निर्णय कायम ठेवण्यात आला होता. अशा दर्शनामुळे भाविकांना समाधान मिळत नव्हते, त्यामुळे त्यांनी पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची मागणी चालवली होती. दरम्यान, आज सकाळपासून…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) मंजूर केलेले कर्ज पाहिजे असेल तर साखर कारखान्यांच्या जागेवर ताबा द्या, अशी अट घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांची कोंडी केली होती पण अजितदादांचा निर्णय फिरवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला धक्का दिल्याचे बोलले जाते आहे. कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामुहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे, कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा आणि गहाणखत व अन्य कागदपत्रांवर सह्यांचे अधिकार राज्य शासनाला देण्याच्या नव्या अटी घालण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात घेतला होता मात्र आठवड्यातच संबंधित निर्णय मागे घेण्याची वेळ महायुती सरकारवर आली आहे. संबंधित निर्णय घेऊन…
पाचोरा : प्रतिनिधी येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाची पाचोरा तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे एस.डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य गणेश देशमुख, कार्यवाह संजय पाटील, वाचनालय संघाचे व्यवस्थापक सागर भगुरे होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ प्रणित पाचोरा तालुका ग्रंथालय संघाची हुतात्मा स्मारक, पाचोरा येथे नुकतीच पुढील तीन वर्षासाठीची कार्यकारिणीची प्रथमतःच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश डी. पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन निवड कार्यकारिणीत पाचोरा तालुका…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी जे.ई.स्कूल आणि ज्यु कॉलेजच्या विद्यार्थिनींनी “धागा प्रेमाचा….राखी अभिमानाची” या उपक्रमाअंतर्गत एनसीसी १८ महाराष्ट्र बटालियन येथील सैनिकी विभागातील सर्व पदाधिकारी तथा सैनिकांना एम.आर.चौधरी आणि व्ही.एम.लोंढे यांच्यामार्फत राख्या व पोस्टाचे पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक एस.आर.ठाकूर यांच्या संकल्पनेतून गेल्या ८ वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम स्वतः पत्र व राख्या आणून स्वखर्चातून ते राबवितात. विद्यार्थ्यांना पत्र लेखन हा भाग प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकविणे आणि देश रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करून वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांंना संदेश पाठविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपक्रम शिक्षक राबवितात. जवळजवळ १०० विद्यार्थिनी यात सहभागी होऊन त्यांनी आपल्या…