Author: Kishor Koli

जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवा सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव शहर महानगरपालिका,एकलव्य क्रीडा संकुल,स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय मनपास्तरीय स्क्वॉश स्पर्धा २०२३-२४ उत्साहात झाल्या. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संंचालक प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर सर, मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे,पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे,चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, प्रा.स्वाती बराटे, प्रा.डॉ.निलेश जोशी यांची विशेष उपस्थिती होती. उद्‌‍‍ घाटन प्रत्यक्ष खेळून प्रा.डॉ.बेलोरकर सर यांनी केले.या स्पर्धेमध्ये आठ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला.या स्पर्धेसाठी एकूण ५३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच स्पर्धा प्रमुख प्रा.प्रवीण कोल्हे, शुभम शिसोदे, अनिरुद्ध जाधव ,गजानन खरात, कोमल…

Read More

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील गतउपविजेत्या कॅस्पर रूडला यावेळी दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या झँग झिझेनने ऐतिहासिक विजय नोंदवताना पाचव्या मानांकित रूडला ६-४, ५-७, ६-२, ०-६, ६-२ असे पराभूत केले. ‘एटीपी’ क्रमवारीत अव्वल पाचमध्ये असलेल्या खेळाडूला नमवणारा झँग हा चीनचा पहिला खेळाडू ठरला आहे. पुढील फेरीत झँगचा सामना ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजिकाटाशी होणार आहे. झँगने जूनमध्ये झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतही तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला होता तर रूडने गेल्या सहा ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी तीनमध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळेच झँगची ही कामगिरी उल्लेखनीय ठरते आहे. सातव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासलाही पराभवाचा सामना करावा लागला. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या स्वित्झर्लंडच्या डॉमिनिक…

Read More

लंडन : वृत्तसंस्था कॅनडाची डॅनिएले मगेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू ठरणार आहे.२०२४च्या महिला ट्व्‌ोन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेसाठी मगेहीचा कॅनडाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. २९ वर्षीय मगेही सलामीची फलंदाज असून लिंगबदलाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पात्रता निकष तिने पूर्ण केले आहेत. पात्रता स्पर्धा ४ ते ११ सप्टेंबर या कालावधी लॉस एंजलिस येथे खेळवली जाणार आहे. कॅनडाचा संघ अर्जेटिना, ब्राझील आणि अमेरिका यांच्याविरुद्ध ‘आयसीसी अमेरिकास’ पात्रता स्पर्धेत खेळणार आहे. यातील विजेता संघ जागतिक पात्रता स्पर्धेत खेळेल. “माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. माझ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता,” अशी भावना कॅनडाच्या महिला संघात निवड…

Read More

अलिबाग : वृत्तसंस्था रायगडच्या समुद्रकिनारीदेखील चरस या अंमली पदार्थाचा साठा सापडण्याचे सत्र सुरूच आहे. दिवसभरात अलिबाग, दिघीसागरी आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची पाकीटे आढळून आली आहेत. आत्ता पाच दिवसांत सात कोटी रुपयांची १७६ किलो चरसची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सर्व समुद्र किनाऱ्यांवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. सुरवातीला श्रीवर्धन येथील जिवना बंदर येथे चरसच्या ९ बॅग आढळून आल्या नंतर हरिहरेश्वर येथील मारळ समुद्र किनाऱ्यावर तीस पाकिटे आढळून आलीत. यानंतर सर्वे समुद्र किनाऱ्यावर २४ पाकिटे सापडलीत. तद्नंतर कोंडीवली आणि आदगाव समुद्र किनारी १३ पाकिटे आढळून आलीत. दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर ३३ बॅग आढळून आल्या. कोर्लई…

Read More

कोलंबो : वृत्तसंस्था आधी जागेवरून वाद, मग तारखांवरून संभ्रम, संघाच्या निवडीत सुद्धा अडचणी या सगळ्या अडथळ्यांना पार करून आता अखेरीस भारत विरुद्ध पाकिस्तान २०२३ आशिया चषक सामन्याच्या तारीख व ठिकाणावर शिक्कामोर्तब झाले होते. पण आता क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एक वाईट बातमी समोर येत आहे. कँडीपासून ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच जिथे भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२३ चा पहिला सामना रंगणार आहे तिथे सामन्याच्या दिवशी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता किती? आशिया कप २०२३ मधील अ गटातील एक सामना आस्मानी अडथळ्यामुळे वाया जाणार असल्याची शक्यता तब्बल ९१ टक्के आहे.पल्लेकलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत…

Read More

मुंबई : प्रतिनिधी विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक आहे. मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. सहा वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयातमध्ये उपस्थित राहतील. २८ राजकीय पक्षांचे ६३ प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षाची ताकद आजच्या मीटिंगच्या निमित्ताने पाहयला मिळेल. ‘इंडिया’ बैठकीसाठी विमानतळ परिसर आणि वाकोला इथल्या ग्रॅण्ट हयात हॉटेल इथं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय, मुंबई पोलिस दलाबरोबरच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात. इंडियाच्या बैठकीसाठी नेते मुंबईत दाखल झालेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन मुंबईत पोहोचलेत. ते इंडियाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. ठाकरे गटाचे नेते सचिन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा उत्सव सर्वदूर उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण लाडक्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊदेखील बहिणीसाठी वेळप्रसंगी कोणताही त्याग करण्यासाठी तयार असल्याचे वचन बहिणीला देतो.पण जळगावमधील एका भावाने आपल्या लाडक्या दोन्ही बहिणींना हेल्मेटची भेट देत त्यांची काळजी असल्याचा जिव्हाळा घट्ट तर केलाच पण नवीन पायंडा समाजासमोर ठेवला आहे येथील ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे यांच्या दोन मुली आणि मुलगा पुण्यात कोथरूड भागात शिक्षणानिमित्त राहतात. मोठी मुलगी धनश्री ही पुणे विद्यापीठात एमएसस्सी बॉटनीच्या फायनल वर्षाला तर दुसरी मुलगी भाग्यश्री अग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंटच्या तिसऱ्या वर्षाला आकुर्डीत आहे. या…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इंडिया’ आघाडीबाबत एक भाकीत वर्तवले आहे. इंडिया आघाडीच्या बैठका केवळ नावापुरत्या आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर त्यांना विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्याही जागा मिळणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. ‘इंडिया’ नावाच्या शब्दात डॉट लावणे योग्य नाही. आघाडीतील पक्षांमध्ये एकमत नाही. हा काही नवीन प्रयोग नाही, यापूर्वी असे प्रयोग झाले. ‘इंडिया’ बॉम्ब फुसका असून त्यातून बारुद कधीच निघालेली आहे, हा बॉम्ब निकामी आहे. अनके नेते दुरावले आहेत, चेहऱ्यावरील उत्साह गेला आहे.…

Read More

मेलबोर्न : वृत्तसंस्था भारतीय वंशाचा लेगस्पिनर तन्वीर संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी दमदार ट्व्‌ोन्टी२० पदार्पण केलं. पदार्पणातच ४ विकेट्‌‍स घेत तन्वीर राष्ट्रीय संघातली निवड सार्थ ठरवली. ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मिचेल मार्शच्या नव्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्व्‌ोन्टी२० सामन्यात चार नवोदितांना संधी दिली. त्यामध्ये तन्वीरचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी एक्सटेन्डेड संघाची घोषणा केली होती. त्यामध्येही तन्वीरच्या नावाचा समावेश होता. तन्वीरआधी भारतीय वंशाचा गुरिंदर संधू ऑस्ट्रेलियाच्याच पुरुष संघासाठी खेळला होता. दिग्गज महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकेर यांनीही प्रदीर्घ काळ ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जेसन संघा, अर्जुन नायर यांच्यासह दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असणारे खेळाडू खेळत…

Read More

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था सात एकेरी ग्रँडस्लॅम विजेती टेनिसपटू व्हीनस विल्यम्सचे अमेरिकन खुल्या स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. व्हीनसला अमेरिकन स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीत सर्वात निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी पुरुषांमध्ये गतविजेता कार्लोस अल्कराझ आणि माजी विजेता डॅनिल मेदवेदेव यांनी मात्र आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली. वयाच्या 43व्या वर्षीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचे धाडस दाखवणाऱ्या व्हीनसला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या बेल्जियमच्या ग्रीट मिन्नेनकडून 1-6, 1-6 अशी हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे व्हीनसने 1997मध्ये कारकीर्दीत प्रथम अमेरिकन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती आणि त्याच वर्षी मिन्नेनचा जन्म झाला होता. ‘‘व्हीनससारख्या महान खेळाडूबरोबर खेळायला मिळणे याचा मला अभिमान वाटतो. तिचाच…

Read More