साओ पावलो : वृत्तसंस्था तीन विश्वचषक विजेते आणि फुटबॉलपटूमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या पेले यांना मागे टाकून नेयमार ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल झळकावणारा खेळाडू बनला आहे. बोलिव्हियाविरुद्ध विश्वचषक पात्रता सामन्यातील नेयमारने दोन गोल नोंदवले यापैकी पहिल्या गोलसह नेयमारने ब्राझीलकडून सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला. नेयमारचे एकूण ७९ गोल बेलेम येथे झालेल्या या सामन्यात ३१ वर्षीय नेयमारने आपला पहिला गोल ६१ व्या मिनिटाला गोल झळकावला. हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७८ वा गोल होता. यामुळे त्याने पेले यांच्या ७७ गोलचा विक्रम मोडीत काढला. ब्राझीलने या विश्वचषक पात्रता सामन्यात ५-१ असा विजय नोंदवला. नेयमारने या सामन्यात संघासाठी चौथा व पाचवा गोल झळकावला.…
Author: Kishor Koli
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी खेळला गेला. या सामन्यात कांगारू संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आले.त्यांनी यजमान आफ्रिकेला चांगलीच धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर १२३ धावांनी मोठा विजय नोंदवला. कांगारू संघाचा अनुभवी आणि स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठीही हा सामना खूप खास ठरला आहे. कारण या सामन्यात त्याने अशी कामगिरी केली आहे की, खुद्द सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार शतक झळकावले. ११३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना वॉर्नरने ९३ चेंडूत १०६ धावा केल्या ज्यात त्याच्या बॅटमधून १२ चौकार आणि ३ षटकार पाहायला मिळाले.वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीतील हे वे…
कोलंबो : वृत्तसंस्था आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना हा आज १० सप्टेंबरला होणार आहे पण कोलंबो येथे १० सप्टेंबरला ९० टक्के पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर आशिया कपमधील सुपर ४ चे समीकरण नेमकं काय असेल, हे आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान आता आशिया कपच्या सुपर ४ फेरीत दाखल झाले आहे.या फेरीत पाकिस्तानचा पहिला सामना झाला आहे.पाकिस्तानचा पहिला सामना बांगलादेशबरोबर झाला होता.या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर विजय साकारला होता. दुसरीकडे भारताचा सुपर फेरीत पाकिस्तानबरोबर पहिला सामना असणार आहे.त्यानंतर भारताचा संघ श्रीलंका आणि पाकिस्तान यांंच्याबरोबर दोन हात…
मारकेश ः वृत्तसंस्था मोरोक्को देश भूकंंपाने हादरले आहे. मोरोक्कोला ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंंपाचे धक्के बसले आहेत.त्यात इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ६३२ जणांंचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास मोरोक्कोत भूकंपाने हाहाःकार माजवला. पहाटे ६.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के मोरोक्कोत बसले.यानंतर मोरोक्कोत अनेक इमारती कोसळल्या. यामध्ये ६३२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपानंतर प्रशासनाकडून बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते…
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपेतर विरोधकांंच्या ऐक्याची पहिली कसोटी मानल्या गेलेल्या सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी ४ तर भाजपने ३ जागांवर विजय मिळवला. उत्तर प्रदेशातील विजय ‘इंडिया’ आघाडीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. उत्तराखंडमध्ये ‘इंडिया’ला संयुक्त उमेदवार देता आला नाही.पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष वेगवेगळे लढूनही तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली.उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्ये मात्र ‘इंडिया’च्या ऐकीचा भाजपला मोठा फटका बसला. केरळमध्ये भाजप स्पर्धक नसल्याने काँग्रेस व ‘माकप’ एकमेकांविरोधात लढले. उत्तर प्रदेशमधील घोसी मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे बलाढ्य नेते व आमदार दारासिंह चौहान यांनी ‘सप’ला रामराम करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे पोटनिवडणूक झाली. दलबदलू नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या…
पुणे : प्रतिनिधी औंध जिल्हा रुग्णालय येथे एका गर्भवती महिलेने तीन बाळांना जन्म दिला.यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्याने औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेने घरी एका बाळाला, तर रुग्णालयात दोन बाळांना जन्म दिला असून, तिन्ही बाळे सुखरूप असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पोटात किती गर्भ आहेत, याची कल्पना या महिलेला नव्हती. प्रसूतीकळा घरीच सुरू झाल्या आणि महिलेने एका बाळाला घरीच जन्म दिला.महिला २२ ऑगस्ट रोजी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.तिने सायंकाळी ७.५० वाजता दुसऱ्या मुलीला व त्याच्या पाठोपाठ ७.५६ वाजता तिसऱ्या मुलीला जन्म दिला. दोन्ही मुलींचे वजन १४०० व १४५० ग्रॅम…
सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील १५ वर्षीय अंशिता अशोक ताम्हणकर हिने माटुंगा जिमखाना फोर स्टार टूर्नामेंट (वूमन) टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यामुळे साळिस्ते गावाबरोबर जिल्ह्याचीही मान उंचावली आहे. त्यामुळे तिच्या गावासह जिल्ह्यात ताम्हणकर हिचे कौतुक केले जात आहे.अंशिता ही या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक होती. अनेक मातब्बर स्पर्धकांना तिने कडवी झुंज दिली. याबद्दल तिचे साळिस्ते गावातून अभिनंदन केले जात आहे. अंशिता हिची यापूर्वी १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती.त्यावेळी तिने पुणे येथे झालेल्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सिंधुदुर्गातल्या मूळ गाव साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील सहदेव गोपाळ…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र हौशी स्क्वॅश असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ रवाना झाला आहे.पुणे येथे ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान सदर स्पर्धा पुणे येथे होत आहेत.विविध सहा गटात सामने खेळविण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा संघ पुढीलप्रमाणे- ११ वर्ष वयोगट- रणवीर खेडकर, सिध्दांत शर्मा, १३ वर्ष वयोगट – उत्कर्ष वाघ, हेमांशू जावळे,गुरुदीप पाटील,१५ वर्ष वयोगट- दक्षित महाजन, सौम्य जैस्वाल, प्रथमेश महाजन, मुली – आर्या देशपांडे, ईशा देशपांडे, पालवी मांडे,अनुष्का वाणी,१७ वर्ष वयोगट – प्रतिक राजपूत, सारंग वाणी, विवेक कोल्हे, खुश फालक,प्रशिक्षक प्रा. प्रवीण कोल्हे संघ व्यवस्थापक अमोल गोमटे. स्पर्धेतील विजयासाठी खेळाडूंना के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंंडाळे,…
जळगाव : प्रतिनिधी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मनपास्तरीय आंतर शालेय हॉकी क्रिडा स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलला दुहेरी मुकुट प्राप्त झाले. जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय हॉकी स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षातील मुलांच्या व मूलींच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूलने विजेते पद पटकवले. १४ वर्ष मुलांच्या गटात अंतिम सामना गोदावरी स्कूलने अँग्लो उर्दू हायस्कूलला १-० गोल ने पराभूत केले तसेच मूलींचे गटात अंतिम सामना गोदावरी स्कूलने पोदार इंटरनैशनल स्कूलला १-०गोल करुण पराभूत केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था येथे सुरु होत असणाऱ्या जी-२० परिषदेसाठी जगभरातील पाहुणे भारतात दाखल होत आहेत. या पाहुण्यांच्या स्वागताला भारतीय कला व संस्कृतीचे दर्शन घडवणारे खास कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. काल, ६ सप्टेंबरला नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘बोला अहमद टिनुबू’ २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी नवी दिल्ली विमानतळावर टिनुबू यांच्या स्वागताची दृश्य सध्या व्हायरल होत आहेत. याच व्हिडिओची चर्चा रंगण्याचे खास कारण म्हणजे टिनुबू यांच्या स्वागताला चक्क मराठी लावणी सादर करण्यात आली आहे. दूरदर्शनच्या अधिकृत युट्युब अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. टिनुबू यांच्या स्वागतासाठी मराठी लावणीला प्राधान्य देण्यात आले ही जरा अभिमानाची बाब असली…