Author: Kishor Koli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक मोठे पाऊल उचलले आहे. दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. दिनेश कार्तिक ‘भारत अ’ विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड लायन्सचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. डीकेचा कार्यकाळ १० जानेवारी ते १८ जानेवारी म्हणजेच केवळ नऊ दिवसांचा असेल. माजी इंग्लिश फलंदाज इयान बेल हे जानेवारीच्या मध्यापासून कार्तिकच्या जागी फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहतील आणि इंग्लंडचा माजी सहकारी ग्रॅमी स्वान संपूर्ण दौऱ्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. बेल आणि स्वान हे २०१२ मध्ये भारताला एका कसोटी सामन्यात पराभूत करणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होते. मालिका २-१…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंदूरने सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला तर सुरत पहिल्यांदाच अव्वल क्रमांकासाठी संयुक्त विजेता ठरला. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या स्वच्छ शहरांची क्रमवारी जाहीर झाली आहे. हिऱ्यांचे शहर अशी ओळख असलेले गुजरातमधील सुरत २०२० पासून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून नवी मुंबईने तिसरा क्रमांक राखला आहे तर पुण्याने पुन्हा टॉप टेनमध्ये पुनरागमन केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या २०२३ च्या स्वच्छ शहर निकालानुसार, महाराष्ट्रातील सासवडला एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. छत्तीसगडमधील पाटण आणि महाराष्ट्रातील लोणावळा या शहरांनी या यादीत अनुक्रमे दुसरा…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था परिस्थिती अनुकूल असेल, सर्व सुविधा उपलब्ध असेल, प्रशिक्षण देणारे असेल तर स्पर्धेत मिळणारे यश समजण्यासारखे असते. पण परिस्थिती प्रतिकूल असेल, प्रशिक्षण, इतर सुविधा तर सोडाच पण रोज कष्ट करून उदरनिर्वाह करावा लागत असेल तर अशा स्थितीत एका राष्ट्रीय स्पर्धेत एखादी महिला घवघवीत यश संपादित करत असेल तर कौतुकास्पद ठरते. नागपूरमध्ये एका मोलमजुरी करणाऱ्या महिलेने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मिळवलेले यश असेच आहे. ६-७ जानेवारी, २०२४ दरम्यान पोरबंदर (गुजरात ) येथे आयोजित अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत ३० ते ४५ वयोगटात नागपुरातील ४० वर्षीय ईश्वरी वाटकरने ५ किलोमीटर अंतर २ तास ४२ मिनिटांत पूर्ण करुन दुसरा क्रमांक पटकाविला. गौरव…

Read More

मुंबई : प्रतिनिधी पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्ष प्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्याने शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नवीन बांधलेल्या घरासाठी मीटर बसविण्यापूर्वी दिलेली दंडाची रक्कम भरावी, त्यानंतरच मीटर मिळेल, असा निरोप दिल्यानंतर कंत्राटी वायरमनने प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून अटक केली. प्रशांत जगताप (३३, रा. जळगाव) असे लाचखोर कंत्राटी वायरमनचे नाव आहे. शहरातील तक्रारदारांनी घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यांनी घराला मीटर बसविण्यासाठी महावितरण कंपनीकडे यापूर्वीच अर्ज केला होता; परंतु त्यांनी मीटर बसविले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली होती. भेटीनंतर त्यांना आता दंडापोटी चार लाख ६० हजार रुपये भरले तरच वीजमीटर बसवून मिळेल, असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाचा डंपर अडवून ३० हजारांची लाच मागून ती खासगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पोलीस ठाण्याच्या हवालदारासह खासगी व्यक्तीला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. हवालदार घनश्याम पवार आणि खासगी व्यक्ती इम्रानखान पठाण अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून, त्यांचा बांधकाम साहित्याचा व्यवसाय आहे. अमळनेर येथील पोलीस ठाण्याचे हवालदार घनश्याम पवार यांनी सात जानेवारीला तक्रारदारांचा डंपर अडवून त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली. अमळनेर येथील संबंधिताने त्याबाबत धुळे येथील…

Read More

सध्याचा वातावरणात होणारा बदल बॉक्स ऑफिसवरही परिणाम दाखवत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच तिकीट बारीवर येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. परिणामी शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत सातत्याने घट होतांना दिसत आहे. रिलीजच्या १९ व्या दिवशी सोमवारी ‘डंकी’ देशात २ कोटींचा व्यवसायही करू शकला नाही. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या ११ टक्के होती. दुसरीकडे, रणबीर कपूरचा चित्रपट ‘ॲनिमल’ अजूनही ब्लॉकबस्टर आहे. सध्या या सिनेमाच्या शोमध्ये घट झाली असली तरी प्रेक्षकांची पसंती नक्कीच या सिनेमाला मिळत आहे. आता रिलीजच्या ३९व्या दिवशी या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘डंकी’…

Read More

केंद्र सरकारने डिसेंबर २०२७ पर्यंत भारताला डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक तुरीच्या डाळीची लागवड करता यावी यासाठी सरकारनं एक मोठी योजना सुरू केली आहे. सरकारी एजन्सी नाफेड आणि एनसीसीएफ यांनी एक वेब पोर्टल सुरू केले आहे. ज्यावर तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करू शकतात. किमान आधारभूत किंमतीवर तूर डाळ ऑनलाइन विकू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दिले जातील. जानेवारी २०२८ पासून डाळींची आयात होणार नाही सरकारी एजन्सी नाफेड आणि एनसीसीएफ यांनी एक वेब पोर्टल सुरू केले आहे. याचे उद्घाटन गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीच्या मैदानावर होणार आहे.या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाने देखील आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. जर आपण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर या मैदानावर आतापर्यंत ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले आहेत. या कालावधीत लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला तिच्या मुलासह पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव शहरातील एका भागात २६ वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भुषण सुकलाल महाजन याने महिलेचा अंघोळ करताना व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला. जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान त्याने ३ ते ४ वेळा महिलेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव…

Read More