वॉशिंग्टन ः वृत्तसंस्था भारताचा आणि जगातला अव्वल दर्जाचा भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आहे. अमेरिकेतल्या यूजीन शहरात खेळवल्या गेलेल्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने 83.80 मीटर लांब भाला फेकला. तर चेक प्रजासत्ताकच्या जेकब वाडलेचने 84.23 मीटर दूर भाला फेकून विजेतेपदाला गवसणी घातली. अवघ्या 0.44 मीटरच्या फरकाने जेकबने नीरजला मागे टाकत विजेतेपद पटकावले. दरम्यान,उपविजेत्या नीरज चोप्राला बक्षीस म्हणून 12,000 डॉलर्स (जवळपास 10 लाख रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. याआधी दोहा येथील डायमंड लीग आणि लॉसन डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपदासह नीरजला प्रत्येकी 10,000 डॉलर्स (जवळपास 8.3 लाख रुपये) मिळाले होते तसेच झ्युरीच येथे खेळवण्यात आलेल्या…
Author: Kishor Koli
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते.दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर खोचक आणि डिवचणाऱ्या शैलीत टीका करत असतात. या सगळ्यातून अनेकदा मजेशीर प्रसंगही उदभवतात.असाच काहीसा प्रकार रविवारी छत्रपती संंभाजीनगर येथे पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला होता.यापैकी एक बछडा दुर्दैवाने दगावला होता मात्र, उर्वरित दोन बछडे हे सुखरुप असून त्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांंच्या हस्ते चिठ्ठी काढून या बछड्यांचे…
कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंंका यांच्यात आज रविवारी (17 ऑक्टोबर ) होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यानंतर श्रीलंकेने सुपरफोरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट मिळवले. आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या दोघांमध्ये 1988 मध्ये पहिला फायनल सामना खेळला गेला होता.ज्यात भारताने बाजी मारली होती. या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 7 फायनलमध्ये भारताने 4 विजेतेपदे जिंकून आघाडी कायम ठेवली आहे तसेच श्रीलंकेने…
कोलंबो ः वृत्तसंस्था आशिया चषकात बांगलादेशने भारताचा अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी पराभव केला.शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना बांगलादेशच्या बाजूने फिरला.अक्षर पटेल बाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला.त्याआधी सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी साकारली पण ही खेळी व्यर्थ ठरली. सलामीला आलेल्या गिलनं १३३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं १२१ धावांची खेळी साकारली. त्याने अनेक महत्त्वाच्या भागिदाऱ्या रचल्या.गिल ४४ व्या षटकात बाद झाला.त्यानंतर अक्षरने किल्ला लढवला पण तो बाद झाल्यानंतर बांगलादेशचा विजय निश्चित झाला. भारताला अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे गिलची शतकी खेळी वाया गेली.त्यामुळे ११ वर्षांनंतर एक अजब योगायोग पाहायला मिळाला. आशिया कपमध्ये भारताचा पराभव आणि त्यात शतक असा योगायोग…
कोलंबो ः वृत्तसंस्था आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात ४२ धावांची उत्कृष्ट खेळी करणारा अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अक्षरला दुखापत झाली होती, मात्र आता अक्षर अंतिम सामन्यासाठी संघासोबत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. अक्षर पटेलचा बदली खेळाडू म्हणून सुंदरला कोलंबोला बोलावण्यात आले आहे. वॉशिंग्टन सुंदर हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचा…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था सिंचन, शिक्षण, आरोग्य,वैद्यकीय सेवा- शिक्षण यासह मराठवाड्यातील सर्वांगिण विकासासाठी ५९ हजार हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही यात समावेश आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये शनिवारी कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे सात वर्षानी ही बैठक घेण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्हाला जे नावं ठेवत आहेत. त्यांना जरा सांगा की आम्ही फाईव्ह स्टार…
जळगाव : प्रतिनिधी शासकीय आणि निमशासकीय जागामध्ये पन्नास टक्के जागा रिक्त आहेत, या जागा कायमस्वरुपी भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, कारण सरकार दिवाळखोरीत गेले आहे. उद्याच्या काळात मंत्रीमंडळही आता कंत्राटी पद्धतीने चालवावे आणि दर महिन्याला नवीन भरती करावी, तसेच कायम स्वरुपी मंत्री मंडळाची पाच आणि तीन वर्षांसाठी गरजच काय? असा सवाल करून एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.या निर्णयाचा फटका हा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेची मुदत संपली असून आता सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी एका आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनपाचे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार आलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.…
जळगाव ः प्रतिनिधी पाचोरा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन होत असलेल्या स्वागताला वैतागून नाराजी व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लगेच ही प्रथा मोडीत काढली आहे. यापुढे शासकीय कार्यक्रमात प्रत्येक मान्यवरांचे स्वागत पुस्तके, ग्रंथ देऊनच करावे, असा आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली केली आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यशदा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी उपयुक्त पुस्तकांची यादी उपलब्ध केली आहे. ती ऐच्छिक आहे. तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे नोडल ऑफिसर म्हणून नेमले आहे. तालुकास्तरील अधिकाऱ्यांनाही उपयुक्त पुस्तक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यापुढे ती भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मान्यवरांसह…
संभाजीनगर : वृतसंस्था राज्य मंत्रिमंडळाची उद्या शनिवारी येथे होत आहे. बैठकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून यंत्रणेची लगबग सुरु आहे. वाहन,हॉटेल्स,विश्रामगृहे आरक्षित करण्यात आली आहे. दरम्यान, या तयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांचे बैठक सत्रही सुरु होते. मंत्रिमंडळासाठी सुमारे ४०० अधिकारी दिमतीला राहणार आहेत. शुक्रवारी काही मंत्री शहरात दाखल झाले आहेत, तर काही मंत्री शनिवारी सकाळी येतील. सात वर्षांनी होत असलेल्या या बैठकीच्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परंपरा मोडायला निघाले आहेत. हॉटेल रामा आणि ताज या पंचतारांकित हॉटेल्समध्ये खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच औरंगाबाद आणि नाशिकहून तिनशे कार भाड्याने घेण्यात आल्या आहेत. जेवणाची थाळी दीड हजाराची असणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची सध्याची स्थिती…