जळगाव शहर महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींची पाच वर्षाची मुदत संपल्याने आता मनपावर प्रशासक राजवट सुरु झाली आहे.विद्यमान आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचीच प्रशासकपदी नियुक्ती झाली असून त्यांच्याकडून जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यांनी आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळतांना एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली प्रतिमा तयार केली आहे. मनपा प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम करतांना,शहरातील अतिक्रमणालाही आळा घालण्याचे काम त्यांनी केले.विशेष म्हणजे कर्जामुळे मनपाची गेलेली पत पुन्हा प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली.कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार नियमित व दरमहा करण्यावर त्यांनी भर दिला मात्र मध्यंतरी त्यांचीही अचानक बदली करण्यात आली.हा त्यांच्यासह जळगावकरांनाही धक्का होता.एका चांगल्या अधिकाऱ्यावर हा अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली गेली.स्वतः विद्या गायकवाड यांनी या बदलीला…
Author: Kishor Koli
वरणगांव : प्रतिनिधी परिसरात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर यावेळी वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या सुसरी येथील दोन महिला जागीच ठार झाल्या तर दोन जण थोडक्यात बचावले. ही घटना वेल्हाळे शिवारातील शेतात दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली . भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील तुकाराम शामराव तळेले यांनी आपले वेल्हाळे शिवारातील शेत गावातीलच रविंद्र तळेले यांना नफ्याने पेरणीसाठी दिले आहे. त्यानुसार रविंद्र तळेले हे मंगळवारी आपल्या पत्नीसह इतर दोन महिलांना शेती कामासाठी घेवून गेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने ममता विनोद पाटील (वय ३३ ), मिनाक्षी रविंद्र तळेले (वय२८) या महिला शेतातील निंबाच्या…
अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मंगळवारी २१ व्या दिवशी मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला होता. उपोषणकर्त्यांनी राज्यसरकारला आता ठोस निर्णयासाठी ५० दिवसांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणासाठीच्या ४० दिवसांच्या मुदतीसारखीच धनगर उपोषणकर्त्यांपुढेही वेळ देण्याचा आग्रह राज्यसरकारने धरला होता. अहमदनगरमधील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतील (एसटी प्रवर्ग) आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी सातत्याने सकल धनगर समाजाच्या वतीने केली जात आहे. दरम्यान, सरकारच्या वतीने…
हांगझाऊ : वृत्तसंस्था कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांच्या हॅटट्रिकच्या जोरावर विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भार२तीय संघाने मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकी स्पर्धेत सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला होता. जागतिक क्रमवारीत सिंगापूर ४९व्या स्थानावर असलेल्या आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतासोबत हा सामना झाला. भारताला आता गतविजेत्या जपानशी २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूल ए च्या पुढील साखळी सामन्यात खेळायचे आहे. भारतासाठी हरमनप्रीतने चार (२४व्या, ३९व्या, ४०व्या, ४२व्या मिनिटाला), मनदीपने तीन (१२व्या, ३०व्या आणि ५१व्या मिनिटाला), वरुण कुमारने दोन (५५व्या मिनिटाला), अभिषेकने दोन (५१व्या आणि…
मुंबई : प्रतिनिधी आमदार अपात्रतेप्रकरणी विधीमंंडळात सुनावणी झाली. आज दोन्ही गटाने युक्तिवाद केला. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुरावे सादर करण्यावरुन दोन गटांमध्ये मतभेद होते. त्यावर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आजचा निकाल राखून ठेवला आहे.आता पुढची सुनावणी वेळापत्रक ठरवून १३ ऑक्टोबरला होणार आहे. शिंदे गटाचे वकील अनिल साखरेंनी बाजू मांडली तर ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामतांनी बाजू मांडली. दोन्ही गटाचा युक्तीवाद याचिका एकत्र करा अशी आमची मागणी आहे,ते का केले जात नाही,दाखल झालेल्या याचिकांचा विषय एकच आहे. त्यामुळे त्यावर सुनावणी घेणे सोपे होईल असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांंनी केला.तर याचिका एकत्र घ्यायला शिंदे गटाचा विरोध आहे. सर्व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रस्त्यांची दुर्दशा ही मुख्य समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारकडून पुरेसा निधी आणला व तो प्रश्न मार्गी लावला आहे.पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला गती प्राप्त होईल,अशी ग्वाही आ.राजूमामा भोळे यांनी दिली असून,महानगरपालिका कर्जमुक्ती करणे व व्यापाऱ्यांशी निगडीत गाळे प्रश्नाची सोडवणूक ही आपली मुख्य कामे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जनतेचा आर्शिवाद माझ्या पाठीशी असून त्या जोरावर मी विजयाची हॅटीक साधणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. दैनिक साईमतच्या एमआयडीसी परिसरातील मुख्य कार्यालयात श्री गणेशाची आरती करण्यासाठी काल सायंकाळी आ.राजूमामा भोळे हे आले असतांना ‘साईमत’ शी बोलतांना त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी साईमतचे संपादक प्रमोद बऱ्हाटे व…
जळगाव : प्रतिनिधी शरद पवारांची साथ सोडण्यासाठी मला दोन बड्या नेत्यांनी विचारले होते तसेच भाजपामधल्या लोकांनी तर थेट ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांंनी केला.राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी शरद पवार यांना घट्ट पकडून ठेवावे, भाजपात येण्यासाठी हातपाय जोडू नये असे वक्तव्य भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केले होते त्यावर विचारले असता एकनाथराव खडसेंनी हा गौप्यस्फोट केला आहे. मला अजित पवारांचा फोन आला होता.अमोल मिटकरींमार्फत त्यांंनी बरोबर येण्यासाठी ऑफर दिली होती मात्र ती ऑफर मी नाकारली. मी शरद पवारांसह आहे आणि त्यांच्याच बरोबर राहणार आहे असे मी मिटकरींना सांगितले. मला या दोन्ही नेेत्यांनी ऑफर दिली होती…
जळगाव : प्रतिनिधी मागील काळात तोट्यात गेलेल्या दुध संघाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी कोणत्याही तडजोडी करणार नाही. असा इशारा जिल्हा दुध उत्पादक संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिला.मागील संंचालकांच्या कार्यकाळात दूध संघास झालेला तोटा गेल्या तीन महिन्यापासून भरून काढत असल्याचा दावा करीत भेसळयुक्त दुधाचा जर कोणी पुरवठा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा दूध संघाची सर्वसाधारण सभा रविवारी घेण्यात आली.ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.या सभेच्या व्यासपिठावर ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन,जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,दुध संघाचे चेअरमन आ.मंगेश चव्हाण,जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार,माजी आमदार दिलीप वाघ,स्मिताताई वाघ,दिलीप निकम यांच्यासह…
पुणे : प्रतिनिधी गेल्या वर्षभराहून अधिक काळ महाराष्ट्रात शिवसेनेतील पक्षफुटीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. कायदेशीर लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालही राज्याने पाहिला. आता तशाच काहीशा घडामोडी राष्ट्रवादी कांँग्रेसमधील फुटीबाबतही घडू लागल्या आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांना लक्ष्य केले जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या सगळ्या घडामोडींच्या मागे दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा दावा केला आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते मात्र चार महिन्यांनंतरही त्यावर निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले. त्यानंतर दोनच दिवसांत विधानसभा अध्यक्ष दिल्लीत दाखल झाले.कायदेतज्ज्ञांशी…
मुंबई : प्रतिनिधी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.यंदा भारताकडे स्पर्धेचे यजमानपद आहे. 29 सप्टेंंबरपासून सराव सामने सुरू होणार आहेत. 2011 नंतर पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची संधी भारताला आहे. 2011 मध्ये भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भारतात येणाऱ्या सर्व संघांना व्हिसा मिळाला आहे पण बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी संघाला अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर करण्यात आलेला नाही त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाने दुबईला जाऊन सराव करण्याचा प्लान रद्द केला आहे. ईएसपीएनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुबईत सरावाला जाणार होता. तिथून पाकिस्तानी संघ हैदराबाद…