सोलापूर : वृत्तसंस्था ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे.त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही संताप व्यक्त केला आहे.आज अकलूजमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भूमिकेचा कडाडून विरोध करत सोदाहरण स्पष्टीकरण दिले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय आहे? आपण आपल्या आजोबा-पंजोबांच्या रक्ताचे आहोत की नाही? आपला आजोबा- पंजोबा अडाणी होता बिचारा.…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काल सुनावणी पार पडली. आता पुढची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे. कालच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आली. ३४ वेगवेगळ्या याचिका आता यापुढे ६ याचिकेत मांडल्या जातील. ठाकरेंच्या वकिलांनी पुन्हा एक नवा अर्ज दिला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. २५ ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे २६ ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल. ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सुप्रीम कोर्टातील याचिका वेगळी आहे. इथली…
मुंबई : प्रतिनिधी शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका मांडत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या भरतीला सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केली होती. २००३ साली काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती…
पुणे : प्रतिनिधी पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर भरधाव वेगात वाहन चालवणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडले आहे. एकाच दिवशी दोन वेळा नियमांचे भंग करत भरधाव वेगात कार चालवली आहे.याबाबतची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने ऐन भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना सुरू होण्याच्या दोन तास अगोदर रोहितने ऑनलाइन पद्धतीने दंड भरला. पुण्यात भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होता तेव्हा, भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि वेगमर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले. १७ ऑक्टोबरला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोहित शर्मा त्याच्या निळ्या रंगाच्या वाहनाने पुण्याच्या दिशेने येत होता. भरधाव कारचा वेग हा द्रुतगती महामार्गावर लागलेल्या…
पुणे : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये सभा झाली. जरांगेंचे भाषण संपत असताना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्याला बोलू देण्याची मागणी केली. बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिला.त्यामुळे स्टेजवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मनोज जरांगेंच्या भाषणानंतर राजगुरूनगरच्या सभेत एका तरुणाने चांगलाच राडा केला.जरांगे भाषण आटोपून स्टेजवर उभे असताना अचानक हा मराठा तरुण स्टेजवर आला. त्याने माइक हातात घेतला. मला बोलू द्या, नाहीतर आत्महत्या करेन, अशी धमकीच त्याने माइकवरून दिली. तेव्हा पोलिसांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला.जरांगेंनी या संतप्त तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो जरांगेंच्या पायाही…
जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारात शेतजमिनी आमच्या नावावर असल्या, तरी अवैधरीत्या गौण खनिजाच्या उत्खननाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. यात माझे विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग आहे. १३७ कोटी रुपये दंडासंदर्भात नोटिशीवर अपील करणार आहे. मी सत्तेच्या विरोधात नेहमी बोलतो. आताही भाजपची सत्ता आहे. मी महसूलमंत्री असताना त्यावेळची प्रकरणे ते काढत आहेत. ईडी चौकशीतूनही काही त्यांच्या हाती लागले नाही. तसाच हा एक राजकीय षडयंत्राचा खेळ आहे. वेळ आल्यानंतर योग्य उत्तर देईल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांना दिली. अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांना तब्बल १३७ कोटी १४…
मुंबई : प्रतिनिधी गोवंडी परिसरात सैराटसारखीच घटना घडली. प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाची निर्घृण हत्या केली. कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागात वडिलांनी मुलीसह जावयाला संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडालीआहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक केली आहे. वडिलांनी माहेरी आलेल्या गुलनाज खान या मुलीची दगडाने ठेचून हत्या केली तर जावई करण रमेश चंद्रची चाकूने वार करून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील गोवंडी परिसरात घडला आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून १० पथके तयार करण्यात आली होती.यामध्ये पोलिसांनी वडील गोरा खान,भाऊ सलमान खानसह त्याचा २ अल्पवयीन मित्राला अटक करण्यात आली आहे.यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत…
चंद्रपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.सर्वेोच्च न्यायालयाने १२ मे रोजी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय देण्याचे निर्देश दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप त्यावर निर्णय न घेतल्यामुळे गेल्या आठवड्याभरात दोन वेळा झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलंच फैलावर घेतले आहे. आता अखेरची संधी म्हणून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीसाठी ३० ऑक्टोबरची तारीख दिली असून लवकरात लवकर निर्णय होईल असे सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देेश न्यायालयाने दिले आहेत.आता त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेणार? दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शेवटची संधी म्हणून दिलेला अल्टिमेटम चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे…
जळगाव : प्रतिनिधी एकट्या राहत असलेल्या सपना उर्फ स्वमा जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठल नगर) या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण आली त्या वेळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मजुरी काम करणाऱ्या सपना भोई या हरिविठ्ठल नगर परिसरात एकट्याच राहत होत्या. त्यांनी मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या मागील गल्लीत राहणारी त्याची बहिण मंगलाबाई ढोले या सपनाच्या घरी आल्या. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा ढलताच त्यांना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी…
मुंबई : प्रतिनिधी मुंबई – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केली आहे. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २०…