छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, असा मजकूर शाळेच्या पाटीवर लिहीत एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपतगाव येथे उघडकीस आली.घटनेनंतर मराठा समाजाच्या बांधवांची एकच गर्दी झाली होती.जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र नातेवाईकांनी घेतला. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,गणेश काकासाहेब कुबेर (वय २८, रा.आपतगाव चित्तेपिंपळगाव) असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गणेशाच्या घरी दुपारच्या सुमारास कोणी नसताना त्याने स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये पाटीवर लिहिले की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत माझ्यावर…
Author: Kishor Koli
नागपूर : वृत्तसंस्था शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी एकेरी उल्लेख करत वकील गुणरत्न सदावर्तेे यांच्या गाड्यांच्या तोडफोडीवर बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.“गुणरत्न सदावर्तेेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी झाली. त्यांना संपवायला हवं होतंं”, असे मत संजय गायकवाडांनी व्यक्त केले.ते गुरुवारी (२६ ऑक्टोबर) मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर माध्यमांशी बोलत होते. संजय गायकवाड म्हणाले,“गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षण हिसकवाले गेले. त्यांनी न्यायालयात प्रखरपणे मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडली. यावेळी ते सुडाने पेटले होते, जसं काय मराठा आरक्षणामुळे यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे सदावर्तेंना गाडी फोडण्याची शिक्षा कमी आहे, त्यांना संपवायला हवं होतंं. “गुणरत्न…
बीड : वृत्तसंस्था चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे आष्टी फाटा(ता.आष्टी)येथे घडली तर भरधाव रुग्णवाहिका मालमोटारीवर आदळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. दोन्ही अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.गुरुवारी पहाटे दोन अपघातांच्या वृत्ताने जिल्हा हादरला आहे.दरम्यान घटनास्थळी आमदार सुरेश धस यांनी भेट देऊन माहिती घेतली असून जखमींना उपचारासाठी पाठविले. बीड जिल्ह्यातील अंभोरा(ता.आष्टी)हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ मालमोटार ( क्र. २१ ८६००) हा धामणगाव (ता.आष्टी) कडून अहमदनगर दिशेने जात होता.बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या…
पुणे : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठ्यांना सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल (२५ ऑक्टोबर) अचानक दिल्ली दौरा केला. या दिल्ली दौऱ्यावरूनही अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपातील काही खासदारांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक वेळा मराठा आरक्षणाविषयी संसदेत प्रश्न मांडला आहे. आम्ही सातत्याने संसदेत बोललो आहेत.आमची लाईन महाराष्ट्रात आणि दिल्लीतही आहे पण भाजपा म्हणजे भारतीय जुमला पार्टी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड रेकॉर्ड रचत वर्ल्ड कपमध्ये एक नवा इतिहास लिहिला आहे. ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात सर्वात जलद शतक झळकावण्याचा मान आपल्या नावावर केला. डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला चांगलीच उभारी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ३९९ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ ९० धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने ३०९ धावांनी मोठा विजय साकारला. वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाची नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मिचेल मार्श चौथ्या षटकात बाद झाला. पण त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी भागिदारी केली. स्मिथने ६८ चेंडूत ७१ धावा केल्या.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये सलग पाच विजय मिळवले आहेत. आतापर्यंत एकाही संघाला ही कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ सध्याच्या घडीला १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे पण या पाच विजयांनंतर भारतीय खेळाडूंंवर ेकींगसाठी बंदी आणली आहे. भारतीय संंघाने या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांंगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या पाच संंघांवर विजय मिळवले आहेत. भारताने धरमशाला येथे झालेल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. भारताचा हा वर्ल्ड कपमधील पाचवा विजय ठरला. या विजयानंतर भारताचे १० गुण झाले आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पण अव्वल स्थान पटकावल्यावर भारतीय खेळाडूंवर एका गोष्टीसाठी बंदी आणण्यात आली आहे. भारतीय संघातील खेळाडूंना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार रावची नियुक्ती नॅशनल आयकॉन म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर २०२३ या दिवशी त्याची नियुक्ती नॅशनल आयकॉन म्हणून करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राजकुमार राववर खास जबाबदारी टाकण्याचे ठरवले आहे. २५ ऑक्टोबरला याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारतातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीलाच ही घोषणा केली. आता विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करताना अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. राजकुमार राव हा त्याच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देत असतो. त्याचप्रमाणे तो ही नवी जबाबादारीही चोखपणे पार पाडेल असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो आहे. विधानसभेची…
जळगाव : प्रतिनिधी एल.के.फाऊंडेशनतर्फे शहरातील मेहरुण चौपाटीवर काल सायंकाळी विजया दशमीनिमित्त ५१ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. ‘बोलो सियावर रामचंद्र की जय…’असा जयजयकार यावेळी करण्यात आला. रावणदहन पाहण्यासाठी जळगावकरांची अलोट गर्दी झाली होती. याप्रसंगी मेहरुण तलाव चौथाऱ्यावर रावणदहनाप्रसंगी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,एल.के.फाऊंडेशनचे ललित कोल्हे आदींची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीरामाच्या प्रतिमेला मार्ल्यापण करीत तसेच दिपप्रज्वलन करीत रावणदहन सोहळ्याला सुरुवात झाली. यंदा मेहरुण तलावावर दसऱ्यानिमित्त गुरुवारी ५१ फुट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.याप्रसंगी रावण दहनपूर्वी आतषबाजी करण्यात आली. शुभेच्छांचा वर्षाव…. विजयादशमीनिमित्त काल सायंकाळी आपट्याची पाने थोरामोठ्यांना, लहानग्यांना…
सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला आहे. राजकारणात आता मन रमत नाही, असे सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले आहे. एक्स या समाजमाध्यमातून याबाबतची पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे. निलेश राणे यांनी पोस्टवर म्हटले आहे की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्यासोबत राहिलात,त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. “मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी…
पुणे : प्रतिनिधी युवा संंघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे.तरूणांना नवा विश्वास,आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे.कंत्राटी भरतीचा मुद्दा युवा संघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला.सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे दिला. युवकांच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ आज (मंगळवारी) शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला.यानिमित्ताने टिळक स्मारक मंदिरात पवार यांची सभा झाली.त्यावेळी ते बोलत…