नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी महत्त्वाच्या निकालाचे वाचन केले. त्यानुसार, ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले असून खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याविरोधात कायदेविषयक लढाई लढण्याकरता त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली असल्याचे वृत्त आहे. मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्व्ेोकर यांच्याकडे सोपवले तसेच मर्यादित कालावधीत याबाबतचा निकाल देण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार या सुनावणीला जून महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्षात सुरुवात झाली परंतु, ही सुनवाणी…
Author: Kishor Koli
इंदोर : वृत्तसंस्था भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे अफगाणिस्तान संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. अक्षरने चार षटकांत १७ धावा देत दोन गडी बाद केले.यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.अक्षरने शेवटच्या टी-२० मध्ये चार षटकात केवळ २३ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या होत्या. यासह त्याच्या टी-२० मध्ये २०० विकेट्सही पूर्ण झाल्या आहेत. अक्षर पटेल ठरला सामनावीर अक्षरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, “छान वाटतंय. मला आत्ताच कळले की, मी…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या …मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती आहे. चार-पाच मुस्लीम व्यक्तींचे संभाषण कानावर पडले.त्यात आपण ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचे ऐकल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.त्याने नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली.संबंधित मुस्लीम तरुण उर्दू भाषेतून हे संभाषण करत असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला.इतकेच नाही, तर संबंधित तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम भाड्याने घेणार असल्याचा दावाही त्याने नियंत्रण कक्षाला केलेल्या…
यावल : प्रतिनिधी वडिलांनी लग्न करून न दिल्याने,तसेच लग्नाला पैसे लावा असे सांगितल्यावरसुद्धा वडिलांनी मुलाचे लग्न लावून न दिल्याने मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि.14 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता मुलाने त्याच्या आई समोरच वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने 2- 3 वार करून जागीच ठार केल्याची घटना यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण ग्रामस्थांंमध्ये मोठी खळबळ उडाली असून यावल पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,रविवार दि.15जानेवारी रोजी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत सौ.सुभाबाई रतन कोळी (वय 60) (व्यवसाय घरकाम) रा.पिळोदा खुर्द ता.यावल.जि. जळगाव यांनी म्हटले आहे की, माझे पती रतन तानसिंग कोळी यांचेसह राहते व…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याचीच देशात आता उत्सुकता लागली आहे. पुढील सोमवारी होणारा राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि १ तारखेला लेखानुदान सादर झाल्यावर कधीही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याचा अंदाज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. यंदा लवकर निवडणुका विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्चला झाली होती तसेच ११ एप्रिल ते १९ मे या काळात सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान झाले होते. यामुळे नियोजित वेळेनुसार निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते पण यंदा लोकसभा निवडणूक मार्च – एप्रिलमध्येच घेतल्या जातील, अशी चिन्हे दिसू…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. मयत तरुण मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे समजते. चाळीसगाव पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा, पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी सायंकाळी शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामग्री व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे रूप पालटून गेले आहे.या सोयीसुविधांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज(रविवारी) प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन जिल्हा रूग्णालयात सर्वसामान्यांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच आग्रही असतात. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ५ कोटी ५७ लाख खर्चातून सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे रूप पालटण्यात आले आहे. या कक्षात नवीन अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. या कक्षाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…
मुंबई : प्रतिनिधी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. त्याने ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावलं. त्यानंतरही तो अनेक चित्रपटात झळकला. आता प्रेक्षकांचा लाडका दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी व्हेलेंटाईन डे च्या दिवशी त्याने एक पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना गोड सरप्राइज दिले. आता त्याने तो साखरपुडा कधी करणार आहे हे सांगितले आहे. प्रथमेश आणि त्याची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकरांनी एक पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची तारीख सांगितली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे काही फोटो…
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर वादांच्या केंद्रस्थानी आहे. २०२१ च्या हंगामानंतर हार्दिक पांड्याला फ्रेंचायझीने पुन्हा एकदा संघात घेतले आहे. पांड्याने गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सने मात्र पंड्याला फक्त परत आणण्याचा निर्णयच घेतला नाही तर त्याला कर्णधार देखील केले आहे. रोहित शर्माला बाजूला करत हार्दिकवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी फ्रेंचायझीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सने केलेल्या एका फोटोमुळे वातावरण आणखी तापले आहे. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय भारतीय संघाची…
जळगांव : प्रतिनिधी येत्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ होणार असल्याने केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील बदलीस पात्र असलेल्या आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रात २८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आयजी बी. जी शेखर यांनी नुकत्याच केल्यात. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे, चाळीसगाव ग्रामीण ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव, रामानंद पोलीस स्टेशन शिल्पा गोपीचंद पाटील यांची जळगाव येथील अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. गृह विभाग जळगाव रामकृष्ण महादू कुंभार यांना अहमदनगर कंट्रोल रूम जळगाव अरुण काशिनाथ धनवडे, पाचोरा राहुल सोमनाथ…