मुंबई : प्रतिनिधी मोहम्मद शमी हा आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. या वेगवान गोलंदाजाने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत अवघ्या चार सामन्यांमध्ये १६ बळी घेतले.सुरुवातीचे काही सामने टीम मॅनेजमेंटने शमीला बाकावर बसवून ठेवले होते, मात्र आता शमीची कामगिरी अशी आहे की, त्याला बाकावर बसवण्याचा विचारही कर्णधार करणार नाही. शमीची गोलंदाजी सर्वोत्तम ठरली आहे. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध त्याने पाच षटकांत १८ धावा देऊन पाच बळी घेतले, तेव्हा तर सर्वजण शमीचे जबर फॅन झाले.शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट फॉर्म भारताच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नाच्या अधिक जवळ नेतो आहे. दरम्यान मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शमीचे वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. आता…
Author: Kishor Koli
जळगाव : प्रतिनिधी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेसह ठिकाठिकाणी होणारी गर्दी व त्यातून होणारे अपघात, या पार्श्वभूमीवर पोलिसांच्यावतीने नाकाबंदी करण्यात येऊन एक हजार ९२४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या ४६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या सोबतच ३३१ वाहनधारकांकडून दोन लाख १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त वाहतुकाचीही कोंडी होवून अपघात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपापल्या क्षेत्रात ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन तपासणीचे निर्देश दिले. यात मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी,…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा कारागृहात असलेल्या मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून दोन हजार रुपयांची लाच घेणारे सुभेदार भिमा उखर्डू भिल, महिला पोलिस पूजा सोपान सोनवणे आणि हेमलता गयबू पाटील यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली. तक्रारदार महिला पहूर येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिला यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत भेटू न देण्याचे सांगितले जात होते. अशाच प्रकारे मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी…
मुंबई : प्रतिनिधी ग्लेन मॅक्सवेलने ऐतिहासिक द्विशतक झळकावले. हा सामना संपल्यवर त्याने आपला राग टीकाकारांवर काढल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्याने ही खंत बोलून दाखवली. ग्लेन मॅक्सवेलने षटकारासह द्विशतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. वर्ल्ड कपमध्ये आता सर्वाधिक धावा या मॅक्सवेलच्या नावावर असतील. अफगाणिस्तानचा संघ त्याच्यापुढे बेचिराख झाल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेल म्हणाला की, ऑस्ट्रेलिया पहिले दोन सामने खेळला त्यामध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. या दोन पराभवानंतर बऱ्याच जणांनी आमच्यावर टीका केली होती. बऱ्याच जणांनी बरंच काही लिहिलं होतं. पण ही टीका करण्यात त्यांनी फार घाई केली. कारण त्यानंतर सहा सामन्यांत आम्ही अशी कामगिरी केली की…
कोल्हापूर : वृत्तसंस्था ऊस दरासाठी उपोषणाच्या राजु शेट्टींच्या भूमिकेवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका करीत व्यवहारी विचार केला तर यामुळे कर्जाच्या ताणाने सहकारी साखर कारखाने रसातळाला जातील , अशी भूमिका घेतली आहे. ऊस दरासाठी आक्रोश पदयात्रा झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऐन दिवाळीत उपोषण करणार आहेत. जयसिंगपूर येथे मंगळवारी झालेल्या २२ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. चालू हंगामात ऊसाला एकरकमी ३,५०० उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही, असा निर्धारही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. राजू शेट्टी यांच्या वक्तव्यावर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी आम्ही राजू शेट्टी यांना सांगितलं होतं…
मुंबई : प्रतिनिधी आरक्षणासाठी अपात्र लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशा दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम राबवला जात आहे, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती देणारी याचिका केली आहे. या याचिकेवरील सुनावणीपूर्वी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी गंभीर आरोप केले. बाळासाहेब सराटे यांनी २०१८ साली ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती. सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या धनगर, वंजारीसारख्या जातींचा ओबीसीतील समावेश बेकायदेशीर आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे पुनसर्वेक्षण करण्यात यावे. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्यावी, अशी…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कौल सोमवारी हाती आले. त्यात अनेकांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. तसेच राज्यभरातील निकालात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. नागपूर, बारामतीसह अनेक गड महायुतीने काबीज केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात १६७ पैकी १५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह ३१ गावांतील रिक्त सदस्यपदाच्या ५१, तर सरपंचपदाच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींत विजय मिळविल्याचा दावा या पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या नव्या कारभारींची निवड करण्यासाठी रविवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर सोमवार (६…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली होती.मुंबईत झालेल्या या लढतीत टीम इंडियाने श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला होता. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला. या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली कारण वर्ल्डकपआधी झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने लंंकेचा ५० धावांवर ऑलआउट केला होता आणि आता ५५ धावांवर, तेव्हा भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंकेच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर देशातील क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी मोठी कारवाई केली. रणसिंघे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट बोर्डावर बरखास्ताची कारवाई केली आहे. रणसिंघे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था भारतात क्रिकेटप्रेमींची संख्या खूप जास्त आहे. भारतात सध्या वर्ल्ड कपचा थरार रंगला आहे. आत्तापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत भारत ८ सामने खेळला असून ८ही सामन्यात भारताने विजय खेचून आणला आहे. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा डंका वाजत आहे. अशातच ट्विटवर एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी व्हायरल होत आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात क्रिकेट आणि क्रिकेटर्स याचे सामान्य नागरिकांना आकर्षण असते. भारतातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्याव्यतिरिक्त आयपीएलमध्येही खेळतात. त्याचबरोबर खेळाडूंच्या लोकप्रियतेमुळे त्यांना अनेक जाहिरातीत कामदेखील मिळते. त्यामुळे त्यांची गणना जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये होते. अलीकडेच भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची एक यादी…
पुणे : प्रतिनिधी राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत निवडणूक. या निवडणुकीत ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. शिंदे गटाने वळसे पाटील यांना धोबीपछाड देत ७३ वर्षांची सत्ता उधळून लावली आहेत्यामुळे वळसे पाटील आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायती यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व दाखवत ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली आहे मात्र दिलीप वळसे पाटील यांना सत्ता राखण्यात यश आलेले नाही. दिलीप…