Author: Kishor Koli

पुणे : प्रतिनिधी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता, तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक कालेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर…

Read More

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभरात पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भाष्य केलं होते. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला होता. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला भाजपची मदत करायची असेल तर उघडपणे करा असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील…

Read More

लखनऊ : वृत्तसंस्था ट्यूमर शब्द ऐकताच मनात भीती दाटून येते पण तुम्ही कधी अशा ट्यूमरबद्दल ऐकलंय का ज्यामुळे रुग्णाची उंची वाढते? लखनऊच्या लोहिया रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णावर शस्त्रक्रिया केली.त्याच्या पिट्यूटरी ग्रंथीत ट्यूमर झाल्याने त्याची उंची असामान्यपणे वाढली होती. डोळ्यांची समस्या निर्माण झाल्यावर त्याला याबद्दल समजले. ट्यूमरमुळे त्याची उंची इतकी वाढली की, तो राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच माणूस झाला. सीरज कुमार असे तरुणाचे नाव असून तो हमीरपूरचा रहिवासी आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरजला लहानपणापासूनच त्याला ट्युमर होता पण त्याकडे कोणाचं लक्ष गेले नाही.सीरज २३ वर्षांचा झाल्यावर त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. पाहताना समस्या जाणवू लागल्या. ट्यूमर आधी लहान होता. ग्रंथींमध्ये ग्रोथ हार्मोन्सचं…

Read More

मुंबई : प्रतिनिधी गेली तीन वर्षापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना गुरूवारी (१६ नोव्हेंबर ) देवेंद्र फडणवीसांनी पूर्णविराम दिला.आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसून महाराष्ट्रातील राजकारणातच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यांतील प्रचारात फडणवीस सहभागी होत असल्याने ते राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी पार पाडू लागल्याची चर्चा रंगली होती. फडणवीस आगामी काळात दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतील आणि उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढतील, असेही बोलले जाऊ लागले होते. मात्र, गुरूवारी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही शक्यता…

Read More

दौंड : वृत्तसंस्था आरक्षणाचा लढा ७० टक्के जिंकत आला आहे. काही झाले तरी हा लढा जिंकायचा आहे. नोंदी मिळाल्या आहेत. त्या नोंदींचा अहवाल पारित होणार आहे. तो अहवाल स्वीकारत २४ डिसेंबरला सरकार कायदा पारित करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण जाहीर करणार आहे. त्याशिवाय सरकारची सुट्टी नाही. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही, तर २५ डिसेंबरला समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा जाहीर करू. मात्र याबाबत जो काही निर्णय होईल तो शांततेत होईल. मात्र सरकारला तो निर्णय खूप जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात दौंड तालुक्यातील वरवंड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी रखवाली करणाऱ्या रखवालदाराचा (दि. १४) च्या रात्री दोन अज्ञातांनी खून करून ट्रॅक्टर, रोटोव्हेटर हेटर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बिडवाणी या ठिकाणावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील वावळदा ते म्हसावद दरम्यान बिलवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटर हीटर पळवून नेले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, विजयसिंह पाटील , जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप सावडे, ईश्वर पाटील, लोकेश माळी यांचे पथक खून्यांच्या शोधासाठी पाठविले होते. घटनास्थळी मिळालेली माहिती,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशातल्या बहराईचमध्ये असलेल्या रेस्तराँने एक खास ऑफर दिली होती. विराटचे शतक झाल्यानंतर या ठिकाणी इतकी गर्दी झाली की, शेवटी लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बोलवावे लागले.शेवटी रेस्तराँ मालकाने शटर बंद केले. काय घडला हा प्रकार? जाणून घेऊ. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली सेमी फायनल सुरु होण्याआधी बहरइच येथील लखनवी रसोई नावाच्या रेस्तराँ मालकाने घोषणा केली होती की, विराट कोहली सामन्यात जितक्या धावा करेल तितके टक्के बिर्याणीच्या किंमतीवर सूट मिळेल. विराटने १००+ धावांची तडाखेबंद खेळी केली. ज्यानंतर या रेस्तराँ मालकाला ग्राहकांना १०० टक्के सूट देऊन म्हणजेच फ्री बिर्याणी खाऊ घालावी लागली. विराटच्या शतकानंतर बिर्याणी फ्री मिळते आहे हे समजल्यावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हा कार्यालयीन सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते वाय.एस.महाजन सर यांना नियुक्तीपत्र अमळनेर येथे ना.अनिल पाटील यांच्या कार्यालयात देण्यात आले. पक्ष संघटनेच्या दृष्टीने सदर नियुक्तीचे योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण असून महाजन हे त्या पदाला साजेशी कामगिरी करतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिला. याप्रसंगी अशोक पाटील,योगेश देसले,संजय वाघ,ललीत बागुल,अभिलाषा रोकडे,किशोर पाटील,जगदीश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More

मुंबई : प्रतिनिधी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली, त्यावेळी आमचे पाच ते सहा आमदार निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते. तसेच बाळासाहेबांच्या मतदानावर देखील निवडणूक आयोगाने बंदी घातलेली होती मग निवडणूक आचारसंहिता असताना रामलल्लाच्या मोफत दर्शनाचे आमिष दाखवणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवडणूक आयोगाने नियमातून सूट दिली आहे का?“ असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला मतदान केले तर रामलल्लाच्या दर्शनासाठी मोफत अध्योध्यावारी घडवेन, असे आमिष मतदारांना दाखवले. निवडणूक आचारसंहिता असताना मतदारांना अशी ऑफर देणं, आमिष दाखवणे हे कायद्यात बसतं का? यावरून…

Read More

नवीदिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जीवन बीमा पॉलिसी नाही. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीख संपली आहे. पीएम मोदी यांच्या बँक खात्यात हजाराहून कमी म्हणजे केवळ ५७४ रुपये आहेत. ३१ मार्च २०२३ पर्यंत पीएम मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर नाहीत किंवा म्युच्यूअल फंडमध्ये त्यांची गुंतवणूक नाही. इतकेच काय तर पीएम मोदी यांच्या नावावर एकही कार नाही. पीएमओ वेबसाईटवर माहिती ही सर्व माहिती प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या म्हणजे पीएमओच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यावर पीएम मोदी यांच्या सर्व संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटवर…

Read More