जळगाव : प्रतिनिधी सी.एम.व्ही.रोगामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी लवकरच सीएससी केंद्रावर केवायसी करून व्हीआर कोड जनरेट करावा असे आवाहन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले आहे. कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी खासदार श्र रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर आपली केवायसी करून व्हीआर कोड जनरेट करावयाचा आहे. केवायसी व व्हीआर कोड मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत मागविण्यात येत…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यात आले असून राज्यात २० लाख ८५ हजार पदसिद्ध पदाधिकारी यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या आग्नेय सीमेलगतच्या तेलंगणा राज्यात ‘बीआरएस’ सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित केले आहे. आज या पक्षाचे राज्यातील १७ हजार गावांत पदाधिकारी आहेत. ‘पुढच्या दोन महिन्यात आमची पक्ष सदस्य नोंदणी २ कोटीच्या पुढे जाईल’, असे भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक समन्वयक नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे टॅब देण्यात आला…
हैदराबाद : वृत्तसंस्था अकबरुद्दीन ओवैसी हैदराबाद येथील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगरच्या एका पोलीस निरिक्षकाने नेत्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली. यामुळे एमआयएमचे नेते प्रचंड संतापले. भरसभेतच त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले आहे. पोलिसांनी वेळेत सभा बंद करण्याची सूचना केल्याने त्यांनी पोलिसांनाच दम भरला. तेलंगणात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अकबरुद्दीन ओवेसी तेलंगणातील चंद्रयानगुट्टा येथून निवडणूक लढवत आहेत. “चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमजोर झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी…
नागपूर : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर दबाव निर्माण केला असताना व त्याखाली सरकार झुकत आहे,असे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी शनिवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सरकारने ओबीसींना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी, अशी मागणी केली. सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. त्याच धर्तीवर ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या सरकार एका समाजाची बाजू घेत…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या पाच दिवसांपासून सोन्याचे भाव पुन्हा वधारू लागले असून मंगळवार, 21 नोव्हेंबर रोजी भावात 300 रुपयांची वाढ होऊन सोने 61 हजार 800 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तसेच चांदीच्या भावात सोमवारी 300 रुपयांची झालेली वाढ मंगळवारीही कायम असल्याने चांदी 74 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 250 रुपयांची घसरण होऊन ते 60 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा 200 रुपयांची घसरण झाली होती. मात्र 16 नोव्हेंबारपासून सोन्याचे भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली व ते 61 हजार रुपयांवर पोहचले. दुसऱ्या दिवशी 17 रोजी पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली व सोने…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी कालपासून पुन्हा सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीस वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षांकडून आता मॅरेथॉन सुनावणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक समोर आले आहे. विधानसभेत काल आमदार अपात्रता सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. मंगळवारी दिवसभरातील सुनावणी संपली असून बुधवार, 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. आजच्या कामकाजात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. शिंदे गटाचे वकील ॲड. महेश जेठमलानी यांनी…
धनबाद : वृत्तसंस्था भारताचे दिवंंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ‘आदिवासी पत्नी’ अशी ओळख असलेल्या बुधनी मांझियाइन यांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी घडलेली एक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंडित नेहरुंच्या एका कृतीमुळे बुधनी मांझियाइन यांना आदिवासी समाजातून वाळीत टाकण्यात आले होते. नेमकी काय होती ती घटना. बुधनी मांझियाइन यांचा धनबादच्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या (डीव्हीसी पंचेत प्रकल्प) निर्मितीत मोठा वाटा होता. बुधनी यांच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु यांनी डॅमचे उद्घाटन केले आणि त्यांना हार घालून त्यांचा सन्मान केला. ज्यानंतर आदिवासी समाजाने बुधनी मांझियाइन यांना वाळीत टाकले होते मात्र जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा बुधनी मांझियाइन यांंना…
पुणे : प्रतिनिधी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी आतापर्यंत एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. ललित पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून ससूनमधील वॉर्ड क्रमांकमध्ये बंदोबस्तास असलेले पोलीस कर्मचारी काळे आणि जाधव यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने दोघांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. काळे आणि…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. अशात भाजपाचे खासदार वरुण गांधी हे मोदी सरकारविरोधातच तिखट प्रश्नांच्या फैरी झाडत आहेत. एकीकडे भाजपा २०२४ मध्ये पीलभीतमधून वरुण गांधींना तिकिट देणार का? याच्या चर्चा रंगलेल्या असताना वरुण गांधी हे मात्र मोदी सरकारला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारताना दिसत आहेत. भाजपाच्या घोषणा, सरकारी नोकरी, योजना या सगळ्यावरच वरुण गांधी यांनी प्रश्न विचारले आहेत.त्यामुळे त्यांना बहुदा तिकिट दिले जाणार नाही असेच दिसत आहे. कदाचित ते वेगळी चूल मांडू शकतात अशीही चर्चा आहे. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर टोकाची टीका केली आहे काय म्हणाले वरुण गांधी? वरुण गांधी म्हणाले, “मी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांमध्ये बिगर भाजपा राज्य सरकारे व तेथील राज्यपाल यांच्यात विसंवाद निर्माण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, पंजाब अशा काही राज्यांमध्ये हा संघर्ष मागील काळात झाल्याचे दिसून आले आहे. सध्या यातल्या काही राज्यांमध्ये राज्यपालांंनी महत्त्वाची विधेयकं जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्या त्या राज्य सरकारांनी केला असून त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. यासंदर्भात तामिळनाडूच्या राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी प्रलंबित विधेयकांवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आता पुन्हा एकदा न्यायालयाने या राज्यपालांना फटकारले आहे. नेमकं प्रकरण काय? तामिळनाडू, केरळ, पंजाब या राज्यांमध्ये राज्यपालांकडून अनेक महत्त्वाची…