सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय 80) यांचे आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास एका खासगी रूग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शहराच्या पूर्व भागातील विणकर पद्मशाली समाजातून आलेले धर्मण्णा सादूल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. 1989 सालची सार्वत्रिक आणि 1991 सालच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत सादूल हे काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर मतदारसंघातून निवडून आले होते. अलिकडे त्यांनी वृध्दापकाळात प्रकृती साथ देत नसतानाही काँग्रेस पक्षातून बाहेर पडत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला होता मात्र या पक्षातही ते सक्रिय नव्हते. सादूल…
Author: Kishor Koli
मुंबई : प्रतिनिधी सरकारकडून मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप केला जात असल्याच्या कारणावरुन आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मंगळवारी राज्य सरकारने सुनील शुक्रे यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. सुनील शुक्रे यांची नियुक्ती करुन सरकारला मागासवर्ग आयोगाचा मराठा आयोग करायचा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी विचारला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी सुनील शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेलेल्या कायदेतज्ज्ञांच्या शिष्टमंडळात…
मुबई :प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, उद्या शुक्रवारी विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा होणार आहे. अवकाळी पाऊस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी घोषणा करणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या घोषणेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन देखील केले होते. त्यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना, आता शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.…
महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करु लागले आहेत. पुण्यापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे गावातील काठेवाडी येथील आदिवासी शेतकरी रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा पहिल्यांदा प्रयोग केला आणि यश मिळवलं आहे. रमेश बांगर यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी ती कधी खाल्ली नव्हती. बांगर यांना पहिल्याचं प्रयोग केला आणि यश मिळवलं आहे. रमेश बांगर यांनी त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी ती कधी खाल्ली नव्हती. बांगर यांना पहिल्याचं प्रयत्नात यश मिळालं असून २ लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले. रमेश बांगर हे त्यांच्या शेतात भात लावायचे त्यातून त्यांना दरवर्षी ४ हजार रुपये मिळायचे. रमेश बांगर यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केल्यानंतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी पुन्हा खेळण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टसच्या मते, तो कर्णधार म्हणून पुनरागमन करेल, पण मैदानावरील त्याची भूमिका बदलणार आहे. पंत फेब्रुवारीच्या अखेरीस पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी फ्रेंचायझीला आशा आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर २०२३ चा हंगाम तो खेळू शकला नाही. मात्र, पंत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळणार की नाही हे निश्चित झालेले नाही. पंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून मिळाल्याने फ्रेंचायझी खूश असल्याचे समजत आहे. मात्र, तो मैदानावर विकेट कीपिंग करताना दिसणार नाही. पंतचे आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे पहिले संकेत नोव्हेंबरमध्ये आले, जेव्हा तो कोलकाता येथील दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात उपस्थित…
नागपूर : वृत्तसंस्था जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी नागपुरात आंदोलन करत आहेत. १९८२ मध्ये शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली होतीय मात्र महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे. ही पेन्शन योजना सर्वात शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्ववत सुरू करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा नागपूर येथे सुरु असून तो हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. त्याआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली. महाराष्ट्रात कोणताच वर्ग सरकारवर खुश नाही असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. “दीड महिन्यापूर्वी मला आपले नेते भेटले आहेत.…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशनावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज सोमवार ११ डिसेंबर रोजी विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांच्या मुद्द्यामुळे हिवाळी अधिवेशाचे पहिले दोन दिवस…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातून मुलाने पित्याच्या डोक्यात फावडे घालून यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपी मुलाला पोलिसांनी पाचोरा येथून रात्री अटक केली आहे. पहूर पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शेंदुर्णी येथील शेतकरी नाना बडगुजर (वय ८२) हे शनिवारी सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा संशयित कैलास नाना बडगुजर (वय ५६ वर्षे) हा शेतात आला आणि पित्यासोबत वाटणीवरून वाद घालू लागला.पिता नाना बडगुजर यांनी नकार दिला असता त्यांंच्यात शाब्दीक वाद झाला. संतप्त मुलगा कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावड्याने डोक्यात जोरात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील समतानगर येथे आज दुपारी जुन्या वादातून एका तरुणाचा चॉपरने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी)ने संशयीतांना निष्पन्न केले असून त्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत. अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समतानगर जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. समतानगर परिसरात जुन्या वादातून आज सकाळी काही तरुणांसोबत अरुणचा वाद झाला होता. हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी…
जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित नाशिक विभागीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत१४, १७,१९ वर्षे मुलांच्या वयोगटात सिद्धिविनायक विद्यालय विजयी झाले. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ.अमृता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर सर, सॉफ्टबॉल मार्गदर्शक श्रीधर गाडगीळ, किशोर चौधरी, विजय न्हावी, विशाल फिरके, मनपा क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, आर.पी. खोडपे, आनंद पवार,अनिल माकोडे, प्रकाश तायडे हे उपस्थित होते. स्पर्धेेच्या निमित्ताने चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय सिनिअर गट आट्यापाट्या…