यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चितोडा, अट्रावल, चिखली ,अंजाळे ,दुसखेडा या १४ किलोमिटर रस्ता कामाची वर्क ऑर्डर देऊनही ठेकेदार वाय.एम.महाजन यांनी ते वेळेत पूर्ण न केल्यामुळे यावल सार्वजनिक बांधकाम उपविभागातर्फे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आपण सदर काम तत्काळ सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा आपण अटी, शर्थींचा भंग केल्याप्रकरणी आपल्याविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले आहे. तालुक्यातील चितोडा, अट्रावल, चिखली ,अंजाळे ,दुसखेडा या १४ किलोमिटर रस्त्याचे कामाचे आदेश सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तर्फे जळगाव येथील कॉन्ट्रॅक्टर वाय.एम.महाजन यांना ४ ऑगस्ट २०२१ रोजी देण्यात आले होते. ते काम ३ ऑगस्ट २०२२ अखेर पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ते…
Author: Kishor Koli
बीड : वृत्तसंस्था येत्या २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी बीडमध्ये आयोजित इशारा सभेत केली. मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ यांच्या सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे,…
चाळीसगाव : प्रतिनिधी येथील जळगाव जनता सहकारी बँकेतील चाळीसगाव शाखेत सहाय्यक पदावर असलेल्या कर्मचाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले, तसेच बनावट मुदत ठेव पावती करून २६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बँक कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नामांकित बँक असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेमध्ये २६ सप्टेंबर २०२० ते १२ मे २०२३ या कालावधीमध्ये बँकेतील सहाय्यक देविदास खंडू थोरात यांनी या काळात बँकेचे खातेदार सुमन भिकन कोतकर, उज्वला जयवंत कोतकर, जयवंत भिकन कोतकर यांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले व तेथेच बनावट मुदत ठेव…
जळगाव : प्रतिनिधी शहरात सर्वसुविधायुक्त एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा स्व.सौ.वनिता लाठी यांचा मानस होता.हा मानस प्रत्यक्षात साकारण्यासाठी ॲड. नारायण लाठी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शनेश्वर हेल्थकेअर प्रा. लि.जळगाव यांच्या माध्यमातून वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी रिंगरोडवर करण्यात आली आहे. आज रविवार दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे. वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व विकारांवरील उपचारांसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व चाचण्या उपलब्ध होणार आहेत. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान शनेश्वर हेल्थकेअर प्रा. लि.चे अध्यक्ष ॲड. नारायण लाठी हे भूषविणार आहे तर उद्घाटक पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील,…
मुंबई : प्रतिनिधी ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानपरिषदेच्या सभागृहात याची गंभीर दखल घेण्यात आली होती. या मुद्यावरुन भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरील चर्चेअंती सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला होता. त्यामुळे सुषमा अंधारे या सगळ्यावर काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर सुषमा अंधारे यांनी एका जाहीर पत्राद्वारे आपली…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाला आता सर्वात मोठा धक्का बसला आहे कारण आता भारताचा टी-२० कर्णधार संघाबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना सूर्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचे वाटत होते पण या सामन्यानंतर सूर्या चालत आला होता आणि आपली दुखापत गंभीर नसल्याचे सूर्याने सांगितले होते. पण ही दुखापत गंभीर असल्याचे आता समोर आले आहे. कारण सूर्याच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो आता तब्बल सात आठवडे तरी क्रिकेट खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सूर्याला किमान दोन महिने…
नांदेड : वृत्तसंस्था भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे.अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेडमध्ये सुपर वॉरियर्सशी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडिया आघाडीतील मतभेद मिटवण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये जागावाटपावरून नेत्यांनी एकमेकांना निर्वाणीचा इशारा दिल्यामुळेही राहुल गांधी व शरद पवार यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये ‘इंडिया’तील खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे महाआघाडीतील नेत्यांचे संयुक्त आंदोलन झाल्यानंतर शरद पवार व राहुल गांधी दोघेही एकाच गाडीमधून रवाना झाले. जंतर-मंतरवरून दोन्ही नेते थेट पवारांचे ‘६ जनपथ’ या निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. या मध्ये…
धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर शेतातील कूपनलिकेसाठी मोटारीच्या वीजजोडणीकरीता तीन हजारांची लाच स्वीकारताना धानोरा (ता. चोपडा) येथील वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अनिल राठोड (२८, लक्ष्मीनगर, धानोरा, चोपडा) असे या वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव आहे. जळगाव येथील ५० वर्षाच्या तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने देवगाव (ता. चोपडा) शिवारात शेत आहे. या शेतात थ्री फेजच्या कूपनलिका मोटारीसाठी तक्रारदारांनी वीजजोडणी घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल राठोड यांना भेटले. त्यांनी या कामासाठी चार हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती तीन हजार रुपये ठरले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक सुहास…
धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार डी एस अहिरे यांची कन्या वर्षा जीवन पवार या रस्ते विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पण असं असूनही त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्या शेतात विहीर घेण्यासाठी तीन लाख रुपयांचे अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण स्वतः रोजगार हमी योजनेचे मजूर असल्याचे बनावट जॉब कार्डही बनवून घेतले. साक्री तालुक्यातील छेडवेल कोरडे या गावातील २०१६ – १७ सालातील प्रकार सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला असल्याची माहिती समोर आलीये. वर्षा पवार ह्या नाशिक येथे रस्ते विकास महामंडळाच्या…